Fake Kidnapping: दहावी परीक्षेत कमी मार्क्स मिळाले; मुलीनं रचला अपहरणाचा बनाव! वडिलांकडं खंडणीही मागितली

पालकांच्या भीतीमुळं मुलांनी अनेक टोकाची पावलं उचलल्याचं आपण यापूर्वी ऐकलं असेल त्यात आता या नव्या बातमीची भर पडली आहे.
pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
Updated on

कोलकाता : पालकांच्या भीतीमुळं मुलांनी अनेक टोकाच्या गोष्टी केल्याच्या बातम्या आपण यापूर्वी ऐकल्या असतील. त्यात आता एका नव्या बातमीची भर पडली आहे. एका १६ वर्षाच्या मुलीनं परीक्षेत मार्क्स कमी पडल्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. तसेच धक्कादायक बाब म्हणजे आपल्याच वडिलांकडून तीने कोट्यवधी रुपयांची खंडणी देखील मागितली. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Kolkata girl fakes kidnapping after scoring less marks in exam asks Rs 1 cr ransom from parents)

pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीची वज्रमुठ होणार घट्ट?; बडा राजकीय पक्ष मविआमध्ये दाखल होणार?

माध्यमातील वृत्तानुसार, पश्चिम बंगाल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेला दक्षिण कोलकात्यातील बानसद्रोनी भागात राहणाऱ्या एका १६ वर्षाच्या मुलीनं दहावीची बोर्डाची परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर ती आपल्या ६ वर्षीय बहिणीसोबत मार्कशीट डाऊनलोड करण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गेली. पण जेव्हा ती बऱ्याच वेळानंतर घरी परतली नाही तेव्हा तिचे आई-वडील तिला फोन करत राहिले पण तिचा फोन अनरिचेबल येत होता.

pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
Karnataka CM : शपथविधीच्या दोनच तासात होणार निवडणुकीतील आश्वासन पूर्ण! राहुल गांधीची धडाकेबाज घोषणा

यानंतर तिच्या पालकांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि मुलीचं ठिकाण शोधण्यास सुरुवात केली. नंतर पोलिसांना या मुलीची स्कुटी एका मेट्रो स्टेशनजवळ सापडली.

pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
2000 Rupees Note: दोन हजारच्या नोटेवरुन कपिल सिब्बलांचे ट्विट चर्चेत; म्हणाले, मोदींनी भ्रष्टाचार...

दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर एक एसएमएस आला होता यामध्ये त्यांच्या दोन्ही मुलीचं अपहरण झाल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांच्या सुटकेसाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांना या पैशांसह नेपालगंज भागात येण्यासही सांगण्यात आलं होतं.

pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
The Kerala Story show in FTII : विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिल्यानंतरच विरोध करायला हवा, राहुल सोलापूरकर कडाडले

पण एव्हाना पोलिसांना तपासादरम्यान हे जाणवलं होतं की, या दोन्ही मुली कृष्णानगरमधून लोकल ट्रेननं सिलदा रेल्वे स्टेशनला गेल्या असतील. या अंदाजानुसार त्यांनी आरपीएफला अर्थात रेल्वे पोलिसांना याबाबत खबर देत त्यांच्यासोबत या दोन्ही मुलींचे फोटो शेअर केले. त्यानंतर कृष्णनगर पोलिसांना या दोघी नादिया जिल्ह्यातील डिव्हाईन नर्सरी होमच्या समोर आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनी वाचवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

pune amanora park town woman kidnapping fake story Photo Credit : nypost.com
Karnataka : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा बनले कर्नाटकचे मुख्यमंत्री; डीकेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

त्यानंतर त्यांनी कोलकाता पोलिसांशी संपर्क साधत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिच्याकडं अधिक चौकशी केल्यानंतर खळबळजनक खुलासा झाला. मुलीनं सांगितलं की, दहावीच्या परीक्षेत तिला ३१ टक्के मार्क्स मिळाले होते. यामुळं ती मुलगी निराश झाली होती कारण तिनं आपल्या पालकांना वचन दिलं होतं की ती परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून दाखवेल. म्हणजेच मार्क कमी पडल्याच्या भीतीनं तिनं आपल्या ६ वर्षांच्या बहिणीसह शहराबाहेर पळून जात स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.