कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आलेल्या डॉक्टर तरुणीच्या आईनं शिक्षक दिनानिमित्त एक खुलं भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व शिक्षकांचे आभार मानलेत तसंच आपल्या मुलीच्या स्वप्नांचा कसा चुराडा झाला याचं कथन केलं आहे.