ममतांच्या मुख्य सल्लागाराला जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक

ममतांच्या मुख्य सल्लागाराला जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक
Updated on

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal chief minister Mamata Banerjee) यांचे मुख्य सल्लागार अलपन बंदोपाध्याय यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आज मंगळवारी तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून या तिघांचीही सध्या चौकशी सुरु आहे. 27 ऑक्टोबर रोजी काही अज्ञातांनी अलपन बंदोपाध्याय (Alapan Bandopadhyay) यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बंदोपाध्याय यांच्या पत्नीकडे जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र या आरोपींकडून पाठवण्यात आलं होतं.

ममतांच्या मुख्य सल्लागाराला जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक
जबरदस्त! अंध व्यक्तीने सर केलं हिमालयातील १७ हजार फूट उंचीचं शिखर

पोलिसांनी सांगितलं की, एका गुप्त माहितीच्या आधारे बालीगंज भागामधून एका टायपिस्टला काल सोमवारी अटक करण्यात आली. त्याने मान्य केलंय की हे पत्र त्याच टाईपरायटरने टाईप केलं होतं. या टायपिस्टकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी शहरातील मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर अरिंदम सेन यांनाही अटक केली आहे. याशिवाय डॉक्टरच्या ड्रायव्हरला माणिकतला भागातून अटक करण्यात आली आहे.

तुमच्या पतीला मारण्यात येईल

अलपन बंदोपाध्याय यांची पत्नी सोनाली चक्रवर्ती या कोलकाता युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर आहेत. त्यांना एक पत्र मिळालं होतं, ज्यामध्ये त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहलं होतं की, मॅडम, तुमच्या पतीला मारण्यात येईल. त्यांचा जीव कुणीही वाचवू शकत नाही. या पत्रानंतर सोनाली चक्रवर्ती यांनी कोलकाता पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

ममतांच्या मुख्य सल्लागाराला जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक
म्हैस, घोडीच्या शोधानंतर यूपी पोलिसांवर आमदाराचं 'मांजर' पकडण्याची जबाबदारी

कोण आहेत अलपन बंदोपाध्याय?

अलपन बंदोपाध्याय हे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार बनण्याआधी ते राज्याचे मुख्य सचिव देखील राहिले आहेत. अलपन बंदोपाध्याय यांनी कोरोना महासाथीच्या दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधला दुवा म्हणून काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.