RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन खून केल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता.
RG Kar Medical College Student Agitation
RG Kar Medical College Student Agitationsakal
Updated on

कोलकात्यातील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टर तरुणीवर अत्याचार करुन खून केल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता. महिन्याभरापूर्वी घडलेल्या या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. यानंतर आता या डॉक्टरांना शांत करण्यास ममता बॅनर्जींच्या सरकारला यश आलं आहे. या संपकरी डॉक्टरांनी संप मागे घेतला असून ते लवकरच कामावर परतणार आहेत.

RG Kar Medical College Student Agitation
Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

डॉक्टरांची सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यानं त्यांनी कामावर परतावं यासाठी सुप्रीम कोर्टाकडून आणि ममता बॅनर्जींच्या सरकारकडून अनेक प्रयत्न झाले. पण डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन आर जी कर वैद्यकीय महिवाद्यालयातील डॉक्टर संपावर ठामच होतं. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर कोर्टानं संवेदनशीलतेनं या प्रकरणाचं गांभीर्य आणि अडचण समजून घेतली. तसंच डॉक्टरांना पुन्हा कामावर परतण्याचं आवाहन केलं होतं. इतकंच नव्हे तर संप केल्याप्रकरणी सरकारनं त्यांच्यावर कुठलीही कारवाई करु नये असे निर्देशही दिले होते.

RG Kar Medical College Student Agitation
Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

दरम्यान, आज सरकार आणि संपकरी डॉक्टरांमध्ये झालेल्या चर्चेनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर ठोस उपयोजनांची खात्री पटल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं आता उद्या शुक्रवारी ज्युनिअर डॉक्टर्स कोलकात्यातील स्वास्थ भवन ते सीबीआय कार्यालयापर्यंत निषेध आंदोलन करणार आहेत. त्यानंतर शनिवारपासून ते कामावर परतणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.