Kulgam Encounter: काश्मीरमध्ये चकमकीत ५ दहशतवादी ठार, 'ऑपरेशन काली' अंतर्गत दुसरे मोठे यश

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरू झाली असून, त्यात त्याला मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते.
Kulgam Encounter
Kulgam EncounterEsakal
Updated on

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरू झाली होती, यामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. गुरुवारी दुपारी ही चकमक सुरू झाल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. डीएच पोरा भागातील सामनो पॉकेटमध्ये ही चकमक झाली. त्यात राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचा देखील समावेश होता.दहशतवाद्यांना घेरल्यानंतर सुरक्षा दलांनी गावाभोवती दिवे लावण्यात आले होते. जेणेकरून ते पळून गेल्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवता येईल.(Latest Marathi News)

घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान हे दहशतवादी मारले गेल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. याआधी 15 नोव्हेंबरलाही सुरक्षा दलांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता.घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन काली' सुरू केले होते. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बशीर अहमद मलिकसह दोन जण ठार झाल्याचे लष्कराने सांगितले होते. हे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत होते.

Kulgam Encounter
शाळा सोडल्यापासून गरबा खेळलो नाही...; PM मोदींनी डिपफेक व्हिडिओवरून फटकारले, ChatGpt ला दिले 'हे' आदेश

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की, 'कुलगाम पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने 5 दहशतवाद्यांना ठार केले आहे. शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. सध्या संपूर्ण परिसराचा शोध सुरू आहे.सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराचे छावणीत रुपांतर केले असून कडक पाळत ठेवली जात आहे. ही कारवाई कालच सुरू झाली होती, मात्र रात्री काही काळ थांबवण्यात आली. सुरक्षा दलांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी गोळीबार सुरू असताना दहशतवादी तळ ठोकून असलेल्या घरात आग लागली'. (Marathi Tajya Batmya)

Kulgam Encounter
MP Assembly Election: भोपाळमधला 'मराठी माणूस' भाजपच्या पाठी; सुमारे दीड लाख मतदार

घराला आग लागल्यानंतर दहशतवाद्यांना बाहेर पडावे लागले आणि सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला. 13 सप्टेंबर रोजी अनंतनागमधील गरोल येथे झालेल्या चकमकीत तीन अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले होते. या मोठ्या घटनेनंतर लष्कर आणि पोलिसांनी मिळून कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करून घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. ऑपरेशन काली अंतर्गत, 15 नोव्हेंबर रोजी उरी सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.