पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता सर्वांनाच माहीत आहे.
कुल्लू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लोकप्रियता सर्वांनाच माहीत आहे. पीएम मोदींच्या अधिकृत हँडलवरून (फेसबुक, ट्विटर) सोशल मीडियावर जेव्हा-जेव्हा एखादा व्हिडिओ अथवा चर्चा होते, तेव्हा त्यावर खूप प्रतिक्रिया उमटत असतात.
मोदींनी शेअर केलेला नवा व्हिडिओ हिमाचल प्रदेशातील कुल्लूचा (Himachal Pradesh Kullu) आहे. पंतप्रधान मोदींनी हेलिकॉप्टरमधून हा व्हिडिओ शूट केला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. मोदींनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, कुल्लूचं सौंदर्य नजरेसमोर सतत येत असतं. आतापर्यंत 32 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदींनी दिल्लीहून सर्वप्रथम बिलासपूर गाठलं आणि 1470 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या एम्सचं उद्घाटन केलं. इथं जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर, मोदी बिलासपूरहून हेलिकॉप्टरनं कुल्लू येथील भुंतर विमानतळावर पोहोचले. दरम्यान, वाटेतच त्यांनी हा व्हिडिओ बनवला. त्यानंतर मोदींनी अटल सदनच्या प्रांगणातून देवतांचं आशीर्वाद घेतलं. यावेळी पंतप्रधानांनी प्रोटोकॉल तोडून रघुनाथजींच्या रथाचे देखील आशीर्वाद घेतले. कुल्लू दसरा उत्सवात सहभागी होणारे मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत. कुल्लूमध्ये 47 मिनिटं घालवून ते दिल्लीला परतले. 5 ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय कुल्लू दसरा महोत्सव (Kullu Dasara Festival) सुरू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.