Kumar Vishwas: "आरएसएसवाले आडाणी, फक्त वेदांचे दाखले देतात"; कुमार विश्वास यांच्या टीकेमुळं वाद

भाजपनं शेलक्या शब्दांत केला पलटवार
Kumar Vishwas
Kumar Vishwasesakal
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आडाणी असून ते फक्त वेदांचे दाखले देतात पण त्यांनी प्रत्यक्षात वेद वाचलेले नाहीत, अशा शब्दांत कवी आणि आपचे माजी सदस्य कुमार विश्वास यांनी टीका केली आहे. त्यांच्या या विधानानंतर भाजपनं त्यांच्यावर पलटवार केला आहे. राम कथा सांगायला आलात तर ते काम करा आणि निघा, अशा शब्दांत भाजपनं त्यांना सुनावलं आहे. (Kumar Vishwas RSS is uneducated Controversy due to Kumar Vishwas criticism)

Kumar Vishwas
Sanjay Raut: "शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील"; राऊतांचा भाजपला टोला

उज्जैन इथं कुमार विश्वास यांनी रामकथेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमात एका प्रसंगाचा उल्लेख करताना ते म्हणाले, या देशात दोनच लोकांचं भांडण सुरु आहे. यांपैकी एक कम्युनिस्ट आहेत ज्यांनी बरंच वाचलंय पण चुकीचं वाचलंय. तर दुसरी आहेत आरएसएसवाले ज्यांना काही वाचलेलंच नाही, ते फक्त वेदांचे दाखले देतात पण कोणीही ते पाहिलेले नाहीत. विश्वास यांच्या या विधानानंतर भाजपनं त्यांच्यावर पलटवार केला आहे.

Kumar Vishwas
Sanjay Raut: आम्हाला गुवाहाटीची अन् रेड्यांची गरज नाही, कारण आमच्याकडे आहे 'हे' देवस्थान; राऊत जोरात

कुमार विश्वास यांच्या या विधानानंतर वाद सुरु झाला आहे. त्यांच्याविधानावर भाजपनं आक्षेप घेतला असून पक्षाचे प्रवक्ते राजपाल सिसोदिया यांनी ट्विट करुन म्हटलं की, तुमचं स्वागत करायला आम्हाला यावं लागेल. उज्जैनमध्ये रामकथा करायला आला आहात तर तेच काम करा. कोणालाही प्रमाणपत्र वाटू नका. रामकथा करायची सोडून इतर सर्वकाही करता तु्म्ही अर्धवट शिकलेले लोक. त्यापेक्षा आमचे आडाणी लोक कितीतरी पटीनं चागलेत.

हे ही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

कुमार विश्वास नक्की असं का म्हणाले?

रामकथे दरम्यान कुमार विश्वास यांनी म्हटलं की, एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेला असून तो आमच्यासोबत काम करत आहे. त्यानं मला म्हटलं की बजेट येतंय, तर ते कसं असायला हवं. त्यावर मी त्याला म्हटलं की तुम्ही रामराज्याचं सरकार बनवलं आहे तर रामराज्याचं बजेट यायला हवं. त्यावर त्यानं म्हटलं की, रामराज्यात बजेट कुठं होतं? त्यावर मी त्याला म्हटलं तुमची अडचण हीच आहे.

एक कम्युनिस्ट आहेत ज्यांनी काहीतरी वाचलंय पण चुकीचं वाचलंय. तर दुसरीकडं हे लोक आहेत ज्यांनी काहीही वाचलेलच नाही आणि फक्त म्हणतात आमच्या वेदांमध्ये हे लिहिलं आहे. जे त्यांनी कधीही पाहिलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.