तीरथसिंह रावत पुन्हा बरळले; 'कुंभमेळ्यामुळं नाही, मरकजमुळं कोरोना पसरेल'

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सध्या हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा आणि निजामुद्दीन मरकज आयोजनाची तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलंय. मरकजचे आयोजन हे बंद जागेमध्ये केले जाते तर कुंभमेळा खुल्या जागेमध्ये केला जातो
tiratsingh ravat kunbhmela
tiratsingh ravat kunbhmelaSakal Media
Updated on

देहरादून- उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सध्या हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा आणि निजामुद्दीन मरकज आयोजनाची तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलंय. मरकजचे आयोजन हे बंद जागेमध्ये केले जाते तर कुंभमेळा खुल्या जागेमध्ये केला जातो. त्यामुळे याची तुलना करणे योग्य नसल्याचं रावत म्हणाले. कुंभमेळा आणि निजामुद्दीने आयोजन यांना सारख्याच दृष्टकोणातून का पाहिलं जाऊ नये, असा प्रश्न रावत यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ''कुंभ आणि मरकजमध्ये तुलना होऊ शकत नाही. कारण, मरकज बंद जागेमध्ये केले जाते आणि कुंभ मोकळ्या जागेत गंगेच्या काढावर आयोजित केले जाते. आशिर्वाद घेऊन गंगेच्या पाण्यात डुबकी मारा, काही होणार नाही. कुंभमेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो. हा लाखो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे.''

tiratsingh ravat kunbhmela
कुंभमेळा म्हणजे कोरोनाचा बॉम्ब; दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची पोस्ट

कुंभमेळा आयोजित करताना सर्व कोरोना नियमांचे पालन केले जात आहे. लोकांचे आरोग्य महत्त्वाचं आहे. पण, श्रद्धा किंवा विश्वासाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करु शकत नाही. कुंभमेळ्याच्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. यंत्रणा पूर्णपणे सक्रिय असून रात्रंदिवस काम करत आहेत. हरिद्वारमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकांची तपासणी केली जात आहे. तसेच रँडम चाचणीही घेतली जात आहे, अशी माहिती रावत यांनी दिली आहे.

हरिद्वार इथं कुंभमेळा सुरु असून शाही स्नान होत आहेत. यामध्ये लाखो साधू, महंत आणि भाविक सहभागी होताहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघनही होत आहे. गेल्या वर्षी कमी रुग्ण संख्या असतानाही मरकजच्या आय़ोजनावरून बराच गोंधळ झाला होता. त्यामुळे देशातील कोरोनाचा संसर्ग आणि मरकज, कुंभमेळा यांची तुलना केली जात आहे.

tiratsingh ravat kunbhmela
कुंभ मेळ्यासाठी 1.22 लाख स्वच्छतागृहे; 'स्वच्छ कुंभ'साठी जोरदार तयारी 

रावत यांनी म्हटलं की, कुंभमेळ्यात सहभागी होणारे भाविक हे बाहेरचे नाहीत तर आपलेच आहेत. तर मरकज झाला तेव्हा कोरोनाबाबत कोणतीही जनजागृती झाली नव्हती. तसंच त्यावेळी कोणतीही नियमावली नव्हती. तेव्हा मरकजमध्ये सहभागी झालेले लोक किती काळ बंद जागी होते हेसुद्धा माहिती नव्हतं. आता कोरोनाबाबत लोकांना माहिती आहे आणि त्यापासून सुरक्षित कसं रहायचं यासाठीची नियमावलीसुद्धा माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.