Cheetah Death : दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना
Cheetah Death
Cheetah DeathEsakal
Updated on

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल (रविवारी) चार वाजण्याच्या सुमारास या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

या चित्त्याचं नाव 'उदय' असून, तर त्याचं वय सहा वर्ष होतं. मागील दोन महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी कुनो पार्कमध्ये मादी चित्ता साशा हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता उदय या चित्त्याचा मृत्यू झाला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, काल (रविवारी (23 एप्रिल)) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चित्ता उदय मान खाली घालून जमिनीवर पडलेला दिसला. त्याच्याजवळ गेल्यानंतर तो लंगडत चालताना दिसला. त्यानंतर याची सूचना वन्यप्राणी चिकित्सकांना देण्यात आली, त्यानंतर उदयची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचे आढळुन आले.

Cheetah Death
Pune Accident: किंचाळण्याचा एकच कल्लोळ अपघातात जखमी महिलेने सांगितला थरारक अनुभव

उदयवर उपचार सुरु केले होते. मात्र, उदयची प्रकृती पाहून त्याला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी आयसोलेशन वार्डात ठेवलं होतं. मात्र रविवारी चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या चित्त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची माहिती मिळेल असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. आत्तापर्यंत यातील दोन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.

Cheetah Death
Shivsena: पक्ष संपवण्यासाठी NCPची सुपारी; ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाचा राजीनामा देत गंभीर आरोप!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.