La Nina 2024: यंदाचा ऑगस्ट-सप्टेंबर अति पावसाचा! यावर्षीच्या मान्सूनबाबत IMD ने काय काय सांगितले?

Monsoon 2024: जून 2024 मध्ये संपूर्ण देशात सामान्य पावसाची शक्यता आहे, म्हणजेच पाऊस LPA च्या 92 ते 108 टक्के असू शकतो. जूनमध्ये, दक्षिण द्वीपकल्पातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
La Nina |Monsoon 2024| Dr. Mrutyunjay Mohapatra
La Nina |Monsoon 2024| Dr. Mrutyunjay MohapatraEsakal
Updated on

केरळमध्ये यंदाचा नैऋत्य मान्सून कधीही सुरू होऊ शकतो, चार महिन्यांच्या मुख्य पावसाळी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांत ला निनाच्या विकासामुळे या वर्षी चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सूनच्या पावसावर परिणाम करणारे मान्सून कमी दाब प्रणाली आणि डिप्रेशन यासारखे इतर अनेक घटक असले तरी, ला निना हा प्रमुख घटकांपैकी एक आहे. ला निना वर्षात, कोणीही नियमित होणाऱ्या सामान्य पावसापेक्षा जास्त पावसाची अपेक्षा करू शकतो.

यावर्षी, ला नीना परिस्थितीमुळे, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस पडू शकतो,” असे भारतीय हवामान विभाग आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी सांगितले.

भारतीय हवामान खात्याने (IMD) नुकताच जून ते सप्टेंबर दरम्यान असणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने जून 2024 मध्ये पाऊस आणि तापमानाचा अंदाजही जाहीर केला आहे.

यावेळी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, देशभरात नैऋत्य मोसमी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 106 टक्क्यांपर्यंत असू शकतो. त्यामुळे संपूर्ण देशात यंदा दरवर्षी पडणाऱ्या पावसापेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

La Nina |Monsoon 2024| Dr. Mrutyunjay Mohapatra
राम रहीमसह पाच जण दोषमुक्त; माजी व्यवस्थापकाच्या हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल

नैऋत्य मान्सून हंगामात, मध्य भारत आणि भारताच्या दक्षिण द्वीपकल्पात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच LPA च्या 106 टक्क्यांपर्यंत पाऊस पडणे अपेक्षित आहे. त्याच वेळी, उत्तर-पश्चिम भारतात पाऊस सामान्य म्हणजेच एलपीएच्या 92 ते 108 टक्के अपेक्षित आहे आणि ईशान्य भारतात एलपीएच्या 94 टक्के म्हणजेच सामान्य पावसापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

'रेमल' चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनची प्रगती होण्यास मदत झाली आहे, असे मोहपात्रा यांनी सांगितले.

La Nina |Monsoon 2024| Dr. Mrutyunjay Mohapatra
Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

जूनमध्ये कसे असेल तापमान?

यंदा जून महिन्यातील तापमानाचा अंदाज पाहिल्यास, भारताच्या दक्षिण द्वीपकल्पातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, देशाच्या बहुतेक भागांमध्ये मासिक कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे.

जून महिन्यातील किमान तापमान उत्तर-पश्चिम भारतातील सुदूर उत्तरेकडील भागात आणि पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे, तर मासिक किमान तापमान बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त असेल.

जून 2024 मध्ये, वायव्य भारताच्या बहुतेक भागांमध्ये आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या सामान्यपेक्षा जास्त असेल .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.