वर्क फ्रॉम होमसाठी नवे नियम लागू होणार! सरकारने आखली मोठी योजना

तिसऱ्या लाटेची भीती यामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची चर्चा जोर धरू लागली आहे.
work from home
work from homesakal
Updated on

नवी दिल्ली : कोविड महामारीमुळे (Covid Pandemic) केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. ओमिक्रॉनची (Omicron) वाढती रूग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेची (Covid Third Wave) भीती यामुळे पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची (Work From Home) चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्यान, आता केंद्र सरकार असे नियम आणण्याचा विचार करत आहे, ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय निवडण्याची संधी मिळेल. कामगार मंत्रालयाने यासाठी मसुदाही जारी केला आहे. या मसुद्यात खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या हालचालींमुळे कार्यालयांच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल होणार आहे. (Labor Ministry Working For New Work From Home Policy)

work from home
पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर

कामगार मंत्रालयाने (Labor Ministry) जारी केलेल्या वर्क फ्रॉम होम मसुद्यानुसार, नवीन नियमांमध्ये आयटी (IT Sector) क्षेत्राला विशेष सूट मिळू शकते. आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेतही सुविधा मिळणार आहे. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही विचार करण्यात आला आहे. क्षेत्राच्या गरजेनुसार हे विशेष मॉडेल प्रथमच तयार करण्यात आले आहे. कामगार मंत्रालयाने नव्या मसुद्यांवर सर्वसामान्यांकडून सूचनाही मागवल्या असून एप्रिलमध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्याता आहे.

work from home
मुंबईतील नववीपर्यंतच्या शाळा 'या' तारखेपर्यंत राहणार पुन्हा बंद

वर्क फ्रॉम होम’साठी कायदा आणणार

सध्या बहुतांश कार्यालयांमध्ये कोरोना (Corona) विषाणूच्या संसर्गामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधाही दिली जात आहे. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये घरून काम करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता केंद्र सरकार असे नियम आणण्याचा विचार करत आहे, ज्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय निवडण्याची संधी मिळेल. कामगार मंत्रालयाने यासाठी मसुदाही जारी केला आहे. या मसुद्यात खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे कार्यालयांच्या कार्यसंस्कृतीत मोठा बदल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.