Ram Mandir : अयोध्येमध्ये कामगारांचा तुटवडा; राम मंदिर पूर्ण होण्यास होतोय विलंब
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जायला पुढील वर्षीचा सप्टेंबर महिना उजाडू शकतो. याआधी हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जून-२०२५ची डेडलाईन निश्चित करण्यात आली होती.
अयोध्या - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचे काम पूर्णत्वास जायला पुढील वर्षीचा सप्टेंबर महिना उजाडू शकतो. याआधी हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जून-२०२५ची डेडलाईन निश्चित करण्यात आली होती. बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनीच ही माहिती दिली.