नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या एका पॅनलने (centre panel) काही तासांपूर्वी लसीकरणासंदर्भात एक महत्वाची शिफारस केली आहे. त्यानुसार, कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसचा (Covishield Second Dose) कालावधी १२ ते १६ आठवड्यांचा असायला हवा असं म्हटलं आहे. मात्र, काँग्रेसने (Congress) सरकारच्या या शिफारशीवर आक्षेप घेतला असून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश (Jayaram Ramesh) यांनी लसीकरण मोहिमेत पारदर्शकता (transparency in vaccination) हवी अशी मागणी केली आहे. (lack of vaccines increase gap between the second dose of Covishield questioned Congress)
जयराम रमेश म्हणाले, "सुरुवातीला दुसऱ्या डोससाठी ४ आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर ६ ते ८ आठवड्यांचा कालावधी निश्चित केला गेला. त्यानंतर आता आपण १२ ते १६ आठवडे हा दुसऱ्या डोससाठीचा नवा कालावधी आणू पाहत आहात. सध्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने आपण हा निर्णय घेतला आहे? की तज्ज्ञ वैज्ञानिकांनी हा कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला आहे? आम्ही मोदी सरकारकडून पारदर्शकतेची आशा करावी का?" असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
NTAGI नं केल्या विविध शिफारसी
नॅशनल टेक्निकल अॅडव्हाझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या सरकारी पॅनलनं गुरुवारी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करण्यात यावं, अशी शिफारस केली आहे. सध्या या लसीच्या दोन डोसमधील अंतर ८ आठवडे आहे. पण त्याचवेळी कोव्हॅक्सिन या लसींच्या दोन डोसमधील अंतरामध्ये कोणताही बदल या पॅनलनं सुचवलेला नाही. सरकारी पॅनलनं असंही सुचवलं आहे की, जे लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांनी बरं झाल्यानंतर कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत लस घेऊ नये. तसेच गर्भवती महिलांना कोणतीही लस निवडण्याचं स्वातंत्र्य असेल तसेच डिलिव्हरीनंतर स्तनपान करणाऱ्या महिला कधीही लस घेऊ शकतात असंही NTGI नं म्हटलं आहे.
दरम्यान, ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) कालच कोव्हॅक्सिन लसीच्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी दिली आहे. यासाठी त्यांना ५२५ आरोग्यदायी स्वयंसेवक मुलं मिळाली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.