लखीमपूर खेरी येथील घटनेत आणि त्यानंतरच्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील घटना नियोजित असल्याचा अहवाल SIT ने बुधवारी दिला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मारण्याच्या उद्देशाने कार चालवल्याचे एसआयटीने (SIT) म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडत, या प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी (Ajay Mishra) यांना बर्खास्त करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे.
सभागृहात चर्चेची मागणी
एसआयटीच्या अहवालानंतर काँग्रेसने (Congress) सरकारवर हल्लाबोल करत दाखल करण्यात अहवालावर सभागृहात चर्चा व्हायला हवी, तसेच सरकारने केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून वगळावे, अशी मागणी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यावेळी केली. राहुल गांधी यांनी लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सरकारने मंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांना हटवावे अशी आमची इच्छा असल्याचे मत अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले.
अहवालानंतर मोदींना उद्देशुन राहुल गांधी यांचे ट्वीट
राहुल गांधींनी एसआयटीच्या अहवालावर आधारित ट्विटमध्ये (Rahul Gandhi Tweet On Lakhimpurkheri) लिहिले की, “मोदी जी, पुन्हा माफी मागण्याची वेळ आली आहे. मात्र आधी आरोपीच्या वडिलांना मंत्रीपदावरून हटवा. सत्य बाहेर आले आहे!" असे सूचक ट्वीट केले आहे.
नेमकी घटना काय
केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा मोनू आणि त्यांच्या 13 सहकाऱ्यांवर 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा आरोप करण्याता आला आहे. या घटनेत आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.