काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या हिंसाचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तसंच आधी केंद्रीय मंत्र्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली.
प्रगतशील समाजवादी पार्टीचे लीडर शिवपाल यादव सिंग यांनाही लखीमपूरकडे जाण्याआधी लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लखीमपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा श्रावस्ती आणि बहराईच जिल्ह्याचा दौरा रद्द केला आहे.
प्रियांका गांधीवर उत्तर प्रदेशातील मंत्री सिद्धार्थ नाथ सिंग यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, याआधीही प्रियांका गांधी यांनी राजकीय पर्यटन केलं आहे. लोकांची मते बदलण्यासाठीचा हा प्रयत्न आहे पण हे होणार नाही. मृतदेहांवरून राजकारण करणाऱ्यांना २०२२ मध्ये उत्तर मिळेल असंही सिद्धार्थ नाथ यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागवलं जात आहे त्यातून मानसिकता दिसून येत आहे. जर तुम्ही सरकारच्या विरोधात उभा राहिलात, विरोध केलात तर तुम्हाला चिरडून टाकण्यात येईल असाच इशारा एकप्रकारे दिला जात असल्याची भावना छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बागेल यांनी दिली.
लखीमपूर खिरी इथं झालेल्या हिंसाचारानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्यानंतर लखनऊमध्ये याचे पडसाद उमटले आहेत. अखिलेश यांच्या घराबाहेर असलेल्या पोलिसांच्या गाडीला आग लावण्यात आली आहे.
अखिलेश यादव यांनी लखीमपूर घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, शेतकऱ्यांवर इतका अत्याचार तर इंग्रजांच्या राजवटीतसुद्धा झाला नाही.
रविवारी नेमकं काय घडलं?
मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.