Lakhimpur scandal : आशिष मिश्रा तुरुंगातून बाहेर, १२८ दिवसांनंतर सुटका

Tihar Jail
Tihar Jail
Updated on

टीम ई सकाळ

लखीमपूरच्या टिकुनिया प्रकरणातील मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मंगळवारी दुपारी तुरुंगातून बाहेर आला. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयातून त्यांची सुटका करण्याचे आदेश मंगळवारी सकाळी कारागृहात पोहोचले. त्यानंतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून आशिषला सोडण्यात आले. आशिष १२८ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आला आहे. (Ashish Mishra out of jail)

आशिषला मुख्य गेटऐवजी मागच्या दाराने बाहेर काढण्यात आले. यामागे सुरक्षेचे कारण सांगण्यात आले. यादरम्यान मीडियानेही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तो गाडीतून निघून गेला. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवारी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात जामीनपत्रे दाखल करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश मुकेश मिश्रा यांनी संबंधित एसएचओ आणि तहसीलदार यांना दोन जामीनदार आणि त्यांच्या जामीनात ठेवलेल्या मालमत्तेची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते.

Tihar Jail
सोने ५१ हजारांच्या उंबरठ्यावर; चार महिन्यांनंतर ५० हजारांच्या वर

तीन ऑक्टोबर रोजी झालेल्या टिकुनिया घटनेत चार शेतकरी, एक पत्रकार, एक चालक आणि दोन भाजप कार्यकर्ते ठार झाले होते. एका पत्रकाराच्या मृत्यूप्रकरणी एसआयटीने आशिष मिश्रा उर्फ ​​मोनूसह १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. त्यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी आशिष मिश्रा हा १० ऑक्टोबरपासून जिल्हा कारागृहात आहे.

जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लखनौ उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी जामीन अर्ज मंजूर करून जामीनचा आदेश जारी केला. जामिनाची रक्कम निश्चित करण्यासाठी सोमवारी जिल्हा न्यायाधीश न्यायालयात अर्ज केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यावर जिल्हा न्यायाधीशांनी प्रत्येकी तीन लाखांचे दोन जामीन आणि त्याच रकमेचे वैयक्तिक बाँड आणि हमीपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.