Lakshmanrao Kirloskar : सायकलचं दुकान ते कोट्यवधींची उलाढाल; लक्ष्मणरावांचं आयुष्य म्हणजे मॅनेजमेंटचा कोर्सच!

लक्ष्मणरावांना चित्रकलेची आवड होती. पण आपल्याला रंगहीनता असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर त्यांना आपला हा छंद जोपासता आला नाही.
Laxmanrao Kirloskar
Laxmanrao KirloskarSakal
Updated on

प्रसिद्ध उद्योगपती आणि किर्लोस्कर समुहाचे संस्थापक लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म २० जून १८६९ मध्ये बेळगावमधल्या गुरुलाहूर या छोट्याश्या गावामध्ये झाला.

लक्ष्मणरावांना चित्रकलेची आवड होती. पण आपल्याला रंगहीनता असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर त्यांना आपला हा छंद जोपासता आला नाही. त्यानंतर त्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यांनी बेळगावमध्ये एक छोटंसं सायकलचं दुकानही सुरू केलं आणि तिथूनच त्यांच्या आय़ुष्याने कलाटणी घेतली.

जगभरात आहे किर्लोस्कर समुहाचा डंका

सायकलच्या दुकानानंतर त्यांनी शेतीसाठी लागणारी उपकरणं तयार करण्यास सुरुवात केली. आधी तर शेतकऱ्यांनी त्यांच्या उपकरणांबद्दल शंका उपस्थित केली. किर्लोस्करांची लोखंडाची उपकरणं शेतीसाठी वापरल्याने शेताचं नुकसान होईल, असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. हे पहिलं उपकरण विकण्यासाठी किर्लोस्करांना जवळपास दोन वर्षे लागली.

सायकलचं दुकान ते कोट्यवधी डॉलर्सपर्यंतचा प्रवास

किर्लोस्करांचा प्रवास हा १८८८ साली सुरू झाला. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि बेळगावात सायकलचं दुकान सुरू केलं. ते मुंबईतून सायकल खरेदी करून ते बेळगावला पाठवत होते आणि त्यातून कमवत होते. इथूनच भारतातल्या पहिल्या ग्रामीण औद्योगिक कंपनीची सुरुवात झाली, याचं नाव किर्लोस्करवाडी असं ठेवण्यात आलं.

लक्ष्मणरावांनी युरोप आणि अमेरिकेत टाऊनशीपबद्दल समजावून घेतलं.यामध्ये उद्योगांचे मालक आपल्या कर्मचाऱ्याठी वेगवेगळे समुदाय स्थापन करतात. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचा उद्योग आणि एक समुदाय निर्माण करण्याचं किर्लोस्करांचं स्वप्न होतं. त्यातूनच किर्लोस्करवाडी शहर उभं राहिलं. औंध संस्थानाचे प्रशासक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी फॅक्टरी आणि या शहराच्या स्थापनेसाठी लक्ष्मणराव किर्लोस्करांना जमीन दान केली. कारखान्यांच्या आसपास बनलेलं शहर आजही किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या (Kirloskar group of Companies) माध्यमातून चालतं.

किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड भारतातली सर्वात मोठी पंप निर्माती कंपनी आहे. सर्वात जास्त पंप निर्माण करण्याची या कंपनीची ख्याती आहे.

Laxmanrao Kirloskar
Business Idea : SBI सह कमी पैशांत हा बिजनेस करा, कमीशनसह बक्कळ कमाईही होईल..जाणून घ्या प्रोसेस

फक्त उद्योजक नाही, समाजसेवकही!

लक्ष्मणराव किर्लोस्कर हे फक्त एक व्यापारीच नव्हते तर समाज सुधारकही होते. समाजातली अस्पृश्यता संपवण्यासाठी किर्लोस्करांनी(Laxmanrao Kirloskar) किर्लोस्करवाडी भागात अस्पृश्यता बंद केली.

इंग्लंडच्या तेल कंपनीशी केला होता करार

लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी आपली कंपनी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचा करार इंग्लंडच्या असोसिएटेड ब्रिटीश ऑईल इंजिन एक्सपोर्ट्स लिमिटेडसोबत केला. किर्लोस्करांची ही कंपनी परदेशी कंपनीसोबत करार करणारी पहिली कंपनी ठरली. १९४६ मध्ये या कंपनीने देशातलं पहिलं हायस्पीड इंजिन बनवलं.

Laxmanrao Kirloskar
MS Dhoni Business : आंतरराष्ट्रीय शाळा ते फूटवेअर ब्रँड... धोनी नुसती शेती नाही तर करतो अनेक व्यवसाय

किर्लोस्करांच्या स्मरणार्थ भारत सरकारने २० जून १९६९ रोजी लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या १०० व्या जन्मदिनानिमित्त एक पोस्टाचं तिकीटही जारी केलं होतं.

२.५ बिलीयन डॉलर्सची उलाढाल

आज या कंपनीची २.५ बिलियन डॉलर्सची उलाढाल आहे. यामध्ये आठ मोठ्या इंजिनियरींग आणि मॅनेजमेंटच्या शाखा आहेत. तसंच ही कंपनी टेक्नोलॉजी, दूरसंचार क्षेत्रातही काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.