Lal Bahadur Shastri : जय जवान जय किसान चा नारा देणाऱ्या शास्त्रीजींनी चक्क पंतप्रधान भवनात केली होती शेती..

आज लाल बहादुर शास्त्रीजींची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी त्यांचा गुढरीत्या मृत्यू झाला
Lal Bahadur Shastri
Lal Bahadur ShastriEsakal
Updated on

आपल्याला नेहमीच प्रथम कोण आहे हे लक्षात राहते. पण, दुसरा नंबर कोणाचा हे मात्र विसरून जातो.भारताचे पहिले पंतप्रधान कोण असे विचारले तर पटकन तूम्हाला उत्तर सांगता येईल. पण, तेच जर भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते, हे सांगणे अवघड वाटेल. लोक गोंधळून जातील उत्तर देताना.  तर, स्वातंत्र्य भारताच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांना स्थानापन्न झालेल्या नेत्याचे नाव होते, लाल बहादुर शास्त्री.

आज लाल बहादुर शास्त्रीजींची पुण्यतिथी. आजच्याच दिवशी त्यांचा गुढरीत्या मृत्यू झाला. शास्त्रीजींच्या साधेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.त्यापैकी एक म्हणजे ते शेतकरी होते. तूम्ही म्हणाल यात काय खास. तर, यात अशी गोष्ट खास आहे की, शास्त्रीजी पंतप्रधान भवनातही शेती करत होते. आणि त्या शेतात एक पीक असे आले जे लावले शास्त्रीजींनी पण काढणी मात्र शास्त्रीजींच्या पत्नी ललितादेवी यांना करावी लागली. काय होता तो किस्सा पाहुयात.

लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान बनले होते. पंडीत जवाहरलाल नेहरूंच्या निधनामुळे शास्त्रीजींना 9 जून 1964 रोजी या पदावर बसवण्यात आले.  गांधीजींच्या विचारांचा पगडा मनावर असल्याने शास्त्रीजींनी बापूंच्या मार्गावर चालत जीवन व्यतीत केले. शास्त्रीजी इतके साधे होते की, पंतप्रधान असतानाही ते शेती करत होते. (Lal Bahadur Shastri : lal bahadur shastri birthday wife lalita shastri had to cut the crop sowed by him)

Lal Bahadur Shastri
Royal Farmer : शेतकऱ्याचा नाद खुळा! 6 लाखाच्या गाडीवर जातोय दूध घालायला

शास्त्रीजींच्या या शेतीच्या आवडीमुळेच त्यांच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी त्यांची पत्नी ललितादेवी शास्त्री यांना केलेल्या शेतीतील पिकाची कापणी करावी लागली. आजच्या युगात एखाद्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या पत्नीने असे करणे आश्चर्यकारक वाटेल. पण त्या युगात ललिताजींनी शास्त्रीजींचे आणखी एक अपूर्ण काम पूर्ण केले.

Lal Bahadur Shastri
Husband Wife Age : नवऱ्याचे वय बायकोपेक्षा जास्त का असावे?

शास्त्री भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा देश एका कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी चीनने भारतावर अचानक हल्ला केला होता. हा हल्ला आणि पंडित नेहरूंचा मृत्यू या धक्क्यातून सावरणे देशवासीयांसाठी कठीण काम होते. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तेव्हा शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला होता. त्याकाळात देशात अन्नधान्याचा तुटवडा ही मोठी समस्या बनत चालली होती.

ती समस्या लक्षात घेऊन शास्त्रीजींनी स्वतः या शेतीतून अन्नधान्य उगवण्याची तयारी केली. त्यासाठी जनपथ येथील पंतप्रधान निवासाच्या आवारातच त्यांनी शेती केली. पण दुर्दैवाने स्वतः शास्त्रीजी या पिकाचा आस्वाद घ्यायला जिंवत राहिले नाहीत.

Lal Bahadur Shastri
Lal Bahadur Shastri: लाल बहादूर शास्त्रींची हत्या की?.. विवेक अग्नीहोत्रींनी असा घेतला शोध..

पाकिस्तान युद्धानंतर 1966 मध्ये जेव्हा शास्त्री ताश्कंदला गेले. तेव्हा ते जिवंतपणी देशात परत येऊच शकणार नाहीत, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. पण, तसेच झाले. ताश्कंदमध्येच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

Lal Bahadur Shastri
Lal Bahadur Shastri : मूर्ती लहान पण कीर्ती महान, लहान वयातच..

या घटनेला तीन महिने उलटून गेल्यावर एप्रिलमध्ये ते पिक काढणीला आले. तेव्हा शास्त्रीजींचे ते काम पूर्ण करण्यासाठी ललिताजी स्वत: हातात खुरपे घेऊन जनपथवर जाऊन हे पीक स्वत: काढले होते.

Lal Bahadur Shastri
Lal Bahadur Shastri : केवळ १२ हजार रूपयांच्या कार खरेदीसाठी पंतप्रधानांना घ्यावे लागले होते कर्ज

1965 मध्ये संध्याकाळी 7.30 वाजता पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला. या स्थितीत अध्यक्ष सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी बैठक बोलावली. या बैठकीत तीन संरक्षण विभागांचे प्रमुख आणि शास्त्रीजी उपस्थित होते.

Lal Bahadur Shastri
लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ सांगणारा 'The Tashkent Files'

चर्चेदरम्यान शास्त्रीजींनी “तुम्ही देशाचे रक्षण करा आणि मला सांगा की आम्हाला काय करायचे आहे?” अशा प्रकारे भारत-पाक युद्धाच्या काळात शास्त्रीजींनी प्रशंसनीय नेतृत्व देऊन “जय जवान जय किसान” चा नारा दिला ज्यामुळे देशात एकता निर्माण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.