Lalit Modi : थेट परदेशातून ललित मोदींची सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना धमकी

धमकी देताना मोदींकडून सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची तुलना मुंंगीशी करण्यात आली आहे.
Lalit Modi
Lalit ModiSakal
Updated on

Lalit Modi : आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून परदेशातून पळून गेलेल्या ललित मोदींनी थेट सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांना धमकी दिली आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Lalit Modi
Ola Layoff : दिग्गज कंपन्यांनंतर ओलामध्ये होणार इतक्या कर्मचाऱ्यांची कपात

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना धमकी दिल्यामुळे ललित मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मोदींनी ही धमकी त्यांच्या इन्टा अकाउंटवरून रोगतगी यांचा फोटो आणि लांबलचक पोस्ट करत दिली आहे.

या पोस्टमध्ये मोदींकडून रोहतगी आपल्यासमोर एका मुंगीसारखे असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, मी तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो.

तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात. मात्र, तुमचं नशीब चांगले की मला मुंग्या आवडतात. त्यामुळे मी तुम्हाला चिरडणार नाही.

आपल्यापैकी कोणीही पूर्णपणे सुरक्षित नाही. मला नुकतीच बसची धडक बसल्याचे नमुद करत जीवन खूप छोटे असल्याचे मोदींनी म्हटले आहे. तुमच्यात माणुसकी असेल तर माझ्याबद्दल विनम्रपणे बोला.

Lalit Modi
IND vs SL : भारतीय संघाला मोठा धक्का; द्रविडची तब्येत बिघडली, चेकअपसाठी बेंगळुरूला रवाना

पण, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांत तुम्ही माझ्याबद्दल काही बोलल्याचं कळलं, तर मी तुमच्या मागोमाग न्यायालयात येणार. जय हिंद,” अशी धमकीच ललित मोदींनी दिली आहे. दरम्यान, ललित मोदी यांच्या या धमकीवर अद्यपपर्यंत सु्प्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि अॅटर्नी जनरल असलेल्या मुकुल रोहतगींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()