LK Advani Biography: कराची ते दिल्ली! भाजपला सत्तेत आणणाऱ्या प्रभू रामाच्या सारथ्याचा असा आहे राजकीय प्रवास!

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना मोदी सरकारनं भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे.
L K Advani
L K Advani
Updated on

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना मोदी सरकारनं भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत ही माहिती दिली. सध्या अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदिरासाठी त्यांनीच आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यासाठी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. तेव्हापासूनचा त्यांचा आजचा भारतरत्नपर्यंतचा प्रवास कसा होता? जाणून घेऊयात. (lalkrishna advani karachi to delhi political journey who brought bjp in power)

L K Advani
France Educational Visa: फ्रान्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत महत्वाची माहिती; "पैसा नसला तरी..."

PM मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

मला आनंद होतोय की लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. मी त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असून यासाठी त्यांचं अभिनंदनही केलं. आडवाणी हे आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकीय नेते होते. भारताच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे. तळागळातील देशसेवेपासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या देशाचे उपपंतप्रधान म्हणूनही काम केलं. तसेच देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिलं. (Latest Marathi News)

L K Advani
Lal Krishna Advani: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर; PM मोदींनी दिली माहिती

जन्म आणि शिक्षण

पाकिस्तानातील कराची इथं लालकृष्ण आडवाणी यांचा ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्म झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात दाखल झालं. पण तत्पूर्वी त्यांचं प्राथमिक शिक्षण लाहोर इथं झालं. त्यानंतर मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. लालकृष्ण आडवाणी यांच्याच काळात पहिल्यांदा भाजपचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर २५ फेब्रुवारी १९६५ मध्ये त्यांचा कमला आडवाणी यांच्यासोबत विवाह झाला, त्यांना दोन मुलं आहेत. (Marathi Tajya Batmya)

L K Advani
Pune Traffic: राजभवनजवळ कंटेनर पलटला; बाणेर, औंध रोडवर सकाळीच वाहतूक कोंडी

राजकीय जीवन

जेव्हा पूर्वीचा भाजप अर्थात जनसंघाची सन १९५१ मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून १९५७ पर्यंत त्यांनी जनसंघाचे सचिव म्हणून काम पाहिलं. त्यानंतर ते जनसंघाचे अध्यक्षही बनले. पुढे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८६ पर्यंत ते पक्षाचे सरचिटणीसपदी होते. त्यानंतर १९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी अध्यक्षपदही सांभाळलं. (Latest Maharashtra News)

L K Advani
France Educational Visa: फ्रान्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत महत्वाची माहिती; "पैसा नसला तरी..."

रथयात्रा अन् जनतेचा पाठींबा

दरम्यान, १९९० मध्ये भाजपनं लालकृष्ण आडवाणींच्या पुढाकारानं अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन सुरु केलं. यासाठी आडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. त्यांच्या या यात्रेला हिंदु समुदयाचा मोठा पाठिंबा मिळाला. या यात्रेदरम्यान त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली पण त्यामुळं त्यांचं राजकीय वजन अजूनच वाढलं.

L K Advani
Old Age Pension: वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सरकार बांधील नाही! सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी

राजकीय कारकीर्द

लालकृष्ण आडवाणी तीन वेळा भाजपचे अध्यक्ष राहिले तर चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिले. १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले, यावेळी त्यांच्याकडं माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार होता. त्यानंतर १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री बनले तर २९ जून २००२ मधील दुसऱ्या वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान बनले.

L K Advani
Pune Traffic: राजभवनजवळ कंटेनर पलटला; बाणेर, औंध रोडवर सकाळीच वाहतूक कोंडी

मोदींचं केलं होतं कौतुक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या गोध्रा हत्याकांडावेळी वाजपेयींच्या विरोधात भूमिका घेत आडवाणींनी मोदींना पाठींबा दिला होता. त्यानंतर मोदी २०१४ मध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान बनले त्यानंतर अडवाणी म्हणाले होते की, "नियतीने ठरवले होते की अयोध्येत श्री रामाचे मंदिर निश्चितच बांधले जाईल. 'प्रभू श्रीरामांनीच आपल्या भक्ताची निवड या पवित्र कार्यासाठी केली आहे, असं म्हणत अडवाणींनी मोदींचं कौतुक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.