JDU New President: लल्लन सिंह यांचा अखेर राजीनामा! नितीश कुमार बनले जेडीयूचे अध्यक्ष

जेव्हा नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकतेसाठी पुढाकार घेतला यामध्ये लल्लन सिंह यांनी प्रमुख भूमिका निभावली होती.
JDU_Nitish Kumar
JDU_Nitish Kumar
Updated on

जनता दल युनायटेड या पक्षाचे अध्यक्ष लल्लन सिंह यांनी अखेर आपल्यापदाचा राजीनामा दिला असून नितीश कुमार यांच्याकडं पुन्हा पक्षाची कमान सोपवण्यात आली आहे.

पक्षाच्या बैठकीत दिला राजीनामा

बिहारच्या राजकारणातील बडं व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले लल्लन सिंह ऊर्फ राजीव रंजन यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला. त्यांचा राजीनामा पक्षानं मंजूर केला त्यानंतर नितीश कुमार यांची पुन्हा एकदा जेडीयूच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

JDU_Nitish Kumar
Admirals Epaulettes: शिवरायांची प्रेरणा! भारतीय नौदलात अ‍ॅडमिरल रँकच्या अधिकाऱ्यांचे बॅज बदलले

काँग्रेस-इंडिया आघाडीचं काय होणार?

जेव्हा नितीश कुमार यांनी विरोधकांच्या एकतेसाठी पुढाकार घेतला यामध्ये लल्लन सिंह यांनी प्रमुख भूमिका निभावली होती. पण शेवटी विरोधकांच्या इंडिया आघाडीचं समन्वयकपद नितीश कुमार यांना मिळालं नाही, तर त्यांच्या प्लॅनचा वापरही केला नाही. (Latest Marathi News)

यामुळं नाराज असलेले जेडीयूतील अनेक जण पुन्हा एनडीएच्या मार्गावर जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. याच कारणामुळं लल्लन सिंह देखील जेडीयूतून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चांमधूनच त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.