लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; जेलमध्ये रवानगी

RJD chief Lalu Prasad Yadav convicted Fodder scam
RJD chief Lalu Prasad Yadav convicted Fodder scamesakal
Updated on

रांची: आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांना चारा घोटाळा प्रकरणातील (Fodder scam) एका केसमध्ये रांचीच्या सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे. डोरंडा ट्रेजरीमधून (Doranda treasury) अवैधरित्या पैसे काढल्याचे प्रकरण हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण म्हणून ओळखले जाते. या प्रकरणात रांचीच्या सीबीआय (CBI) कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डोरंडा ट्रेजरीमधून 139.35 कोटी रूपये अवैधरित्या काढण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पहिल्यांदा 170 आरोपी निश्चित करण्यात आले होते. यातील 55 आरोपींचा मृत्यू झाला आहे.

तर दिपेश चांडक आणि आरके दास यांच्यासह सात आरोपींना सीबीआयने आपला साक्षीदार बनवले आहे. सुशील झा आणि पीके जैसवाल यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच आपला दोष मान्य केला होता. या प्रकरणातील 6 आरोपी फरार झाले आहेत. या हाय प्रोफाईल प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्या व्यतिरिक्त माजी खासदार जगदीश शर्मा, डॉक्टर आर के राणा, ध्रुव भगत, तत्कालीन पशुपालन सचिव बेक ज्यूलियस, पशुपालन विभागाचे सहाय्यक निदेशक डॉ. केएम प्रसाद यांच्यासहीत 99 आरोपींच्या विरूद्ध आज निकाल लागणार आहे. सीबीआय कोर्ट याबाबतचा निकाल 18 फेब्रुवारीला सुनावणार आहे.

डोरंडा ट्रेजरीमधून (Doranda treasury) अवैधरित्या पैसे काढल्या प्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या व्यतिरिक्त आरके राणा, दगदीश शर्मा, ध्रुव भगत यांना देखील रांचीतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवले आहे. तर बाकीच्या 24 आरोपींना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले आहे. तर 36 आरोपींना दोषी ठरवून त्यांना 3 वर्षाच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र लालू प्रसाद यादव यांना किती शिक्षा द्यायची याबाबतचा निकाल अजून झालेला नाही. तो निकाल 18 फेब्रुवारीला देण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()