लालू प्रसाद यादव पुन्हा मैदानात; मुलायम सिंह यादवांची घेतली भेट

लालू प्रसाद यादव पुन्हा मैदानात; मुलायम सिंह यादवांची घेतली भेट
Updated on

नवी दिल्ली : चारा घोटाळ्यातून जामिनावर सुटका झाल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत आहेत. नवी दिल्लीमध्ये मुलगी मीसा भारती यांच्या घरी जवळपास दोन महिने आराम केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी आता अलिकडेच लोकांना भेटण्यास सुरुवात केली आहे. या दरम्यानच्या काळात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे. आज देखील त्यांनी अत्यंत महत्त्वाची भेट घेतली आहे. सोमवारी त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली. मुलायम सिंह यादव यांच्या घरी जवळपास ४० मिनिटे चर्चा झाली. या दरम्यान मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव देखील उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटरवर या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीचे फोटो ट्विट केले आहेत. या दरम्यान दोघेही चहा पिताना दिसून आले.

लालू प्रसाद यादव पुन्हा मैदानात; मुलायम सिंह यादवांची घेतली भेट
बेरोजगारीमुळे आत्महत्यांचं प्रमाण वाढलं २४ टक्क्यांनी; NCRB ची माहिती

भेटीनंतर लालू प्रसाद यादव यांचंही ट्विट

लालू प्रसाद यादव यांनी देखील या भेटीबद्दल ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, देशाचे ज्येष्ठ समाजवादी साथी आदरणीय श्री मुलायम सिंह यादव यांच्याशी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. शेती-माती, असमानता, निरक्षरता, शेतकरी, गरीब आणि बेरोजगाराबाबत आमची एकत्र लढाई आहे. आज देशाला भांडवलशाही आणि धर्मांधता नव्हे तर लोकसमता आणि समाजवादाची अत्यंत आवश्यकता आहे.

लालू प्रसाद यादव पुन्हा मैदानात; मुलायम सिंह यादवांची घेतली भेट
२०० फूट टॉवरवर १३५ दिवस धरणे आंदोलन; यशस्वी झाल्यावरच उतरला खाली

मिशन यूपीच्या आधी सक्रीय झाले लालू प्रसाद यादव

मुलायम सिंह यांच्या आधी समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी देखील शरद पवार यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. खास गोष्ट अशी आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीआधी ही भेट होत आहे. उत्तर प्रदेशातील या निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. याशिवाय इतर विरोधी पक्ष देखील समाजवादी पक्षाच्या सोबत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.