बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी गुरुवारी आपल्या एक्स अकाउंटवर एकापाठोपाठ तीन पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण इतकं पेटलं आहे की नीतीश कुमार यांनी रोहिणी यांच्या पोस्टनंतर माहिती मागवली आहे. आरजेडी आणि जेडीयू यांच्यात वादाची चर्चा सुरू असताना रोहिणी यांनी ही पोस्ट केली आहे. दरम्यान यामुळे चर्चेला उधाण आलेले असताना रोहिणी आचार्य यांनी कुठलाही खुलासा न करता पोस्ट डिलीट केली आहे.
रोहिणी आचार्य या सिंगापूर येथे राहातात आणि अनेकदा आपल्या कुटुंबाची आक्रमकपणे बाजू घेताना दिसतात. मात्र गुरुवारी त्यांनी पोस्ट केल्या नंतर आरजेडी आणी जेडीयू यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहिणी यांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती लगेच डिलीट करण्यात आली होती.
दरम्यान भाजपच्या गोटातून देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीतीश कुमारांशी त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरच जुळवून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान रोहिणी यांच्या पोस्ट नंतर नीतीश कुमार मोठा निर्णय घेऊ शकतात आणि विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात.
नेमक्या पोस्ट काय होत्या?
रोहिणी यांनी तीन पोस्ट केल्या होत्या त्यामध्ये त्यांनी पहिल्या पोस्टमध्ये लिहीले होते की, समाजवादी असल्याचा दावा करणारे हवा बदलते तसे विचारधारा बदलतात. दुसऱ्या पोस्टमध्ये रोहिणी यांनी लिहीलं होतं की, जेव्हा स्वतःची वर्तुवणूक चांगली नसेल तर वाईट वाटून उपयोग नसतो. नशीबात असलेल्या गोष्टी कोणी टाळू शकत नाही.
तसेच आपल्या तीसऱ्या पोस्टमध्ये रोहिणी म्हणाल्या होत्या की, बऱ्याचदा लोकांना आपले दोष दिसून येत नाहीत, मात्र दुसऱ्यांवर हे बेशरम लोक आरोप करत राहतात. रोहिणी आचार्य यांनी या पोस्टच्या माध्यमातून नाव न घेता नीतीश कुमार यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी म्हणाले की, नीतीश कुमार यांना देखील माहिती आहे की पीएम मोदी यांच्यासोबत बिहारचा विकास होऊ शकतो, जर सोबत आले तर चांगलं आहे. नीतीश कुमार यांच्यावर लालू यादव हे तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी दबाव टाकत आहेत. नीतीश ही अट कधीच मान्य करणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.