Lalu Yadav: लालू यादवांनी सिंगापुरमध्ये केले किडनी ट्रान्सप्लांट, भारतात कायदा काय सांगतो? जाणून घ्या

लालू प्रसाद यादव यांची किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. मात्र, भारतात अवयवदान करण्याची प्रक्रिया काय आहे? याविषयी जाणून घ्या.
Lalu Yadav
Lalu YadavSakal
Updated on

Lalu Yadav Operation: आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहेत. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. लालू प्रसाद यादव यांची लहान मुलगी रोहिणी आचार्य यांनी त्यांना किडनी दान केली आहे. रोहिणी यांनी देखील वडिलांसाठी किडनी दान करणे ही मोठी गोष्ट नसून, माझ्या शरीराच्या एका मांसाचा तुकडा काढून देणार आहे, असे म्हटले आहे. परंतु, किडनी ट्रान्सप्लांटचे नियम नक्की काय आहेत व किती खर्च येतो तुम्हाला माहितीये का? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की काय ?

एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील दोन्ही किडनी काम करणे बंद करतात, त्यावेळी जुन्या किडनीच्या जागी नवीन किडनी ट्रांसप्लांट केली जाते. कोणत्याही जिवंत अथवा ब्रेन डेड व्यक्तीची किडनी ट्रान्सप्लांट करता येते. एखादी व्यक्ती ब्रेन डेड आहे व आयसीयूमध्ये असताना शरीराचे इतर अवयव काम करणे बंद करत असतील, तर अन्य रुग्णांना त्यांची किडनी ट्रान्सप्लांट करता येते. परंतु, यासाठी विशेष परवानगीची गरज लागते.

एका किडनीने जिंवत राहणे शक्य?

अनेक व्यक्तींच्या शरीरात जन्मापासूनच एकच किडनी असते, तरीही ते निरोगीपणे जगत असतात. एक किडनी असल्याने त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. शरीरातील दोन्ही किडन्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. किडनीद्वारेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याची क्रिया पार पडते. परंतु, किडनी खराब झाल्यास ही प्रक्रिया पूर्ण होत नाही. एक किडनी खराब झाल्यास ट्रान्सप्लांट केले जात नाही. कारण, अशावेळी दुसरी किडनी ही प्रक्रिया पार पाडते. परंतु, दोन्ही किडन्या खराब झाल्यास ट्रान्सप्लांटची गरज पडते.

Lalu Yadav
ATM Security: एक चूक अन् बँक खाते रिकामे, एटीएममधून पैसे काढताना अशी घ्या काळजी

अवयवदानाचा कायदा

भारतात किडनी व शरीराचे अवयव दान करण्यासाठी विशेष कायदा आहे. भारतात ट्रान्सप्लांट ऑफ ह्युमन ऑर्गन अॅक्ट १९९४ अंतर्गत अवयवदान करण्याची प्रक्रिया पार पडते. या कायद्यांतर्गत सर्व हॉस्पिटलमध्ये अवयव ट्रान्सप्लांट केले जातात. एखाद्या व्यक्ती अथवा हॉस्पिटलने कायद्याचे पालन न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. या अंतर्गत ब्रेन डेड व्यक्तीचे अवयव गरजू रुग्णांना ट्रान्सप्लांट करतात येतात. परंतु, यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या नातेवाईकांची परवानगी आवश्यक असते. National Organ and tissue Transplant Organization या संस्थेद्वारे भारतात अवयवदानाची प्रक्रिया केली जाते.

कोण करू शकते अवयवदान?

आई-वडील, भाऊ-बहिण, आजी-आजोबा आणि पत्नी हे नातेवाईक रुग्णाला अवयव दान करू शकतात. तसेच, एखादी जिंवत व्यक्ती अवयव दान करत असल्यास त्यामागचे कारण गरजेचे असते. भावनिकदृष्टीने दान करत आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. भारतात पैशांच्या आधारावर अवयवदान केले जात नाही. जिवित व्यक्ती किडनी, यकृत आणि स्वादुपिंड दान करू शकते. ब्रेन डेड व्यक्ती देखील अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकते. परंतु, एखादी व्यक्ती अवयवदान करण्यास योग्य आहे की नाही, हे डॉक्टर वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतरच सांगू शकतात.

अवयव ट्रान्सप्लांटसाठी किती येतो खर्च?

सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये अवयव ट्रान्सप्लांटसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. परंतु, डॉक्टरांची फी, हॉस्पिटलचा खर्च, ओपीडी फी आणि औषध इत्यादी मिळून किडनी ट्रान्सप्लांटसाठी जवळपास ३० ते ३५ लाख रुपयात खर्च येऊ शकतो. परंतु, अनेक सरकारी हॉस्पिटलमध्ये तुम्ही खूपच कमी पैशात अवयव ट्रान्सप्लांट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.