नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाची (coronavirus in india) दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, आता तिसरी लाट कधी येईल? याचा काही नेम नाही. त्यामुळे देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच तिसऱ्या लाटेला (third wave of corona) तोंड देण्यासाठी आपली आरोग्यव्यवस्था (health system in india) मजबूत करणे गरजेचे आहे. याबाबत 'लँन्सेट'च्या २१ तज्ज्ञांनी ८ महत्वाच्या उपाययोजना सुचविल्या आहेत. (lancet report on 8 urgent action needed to covid resurgence in india)
लँन्सेटच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय -
अत्यावश्यक आरोग्यसेवेच्या संघटनेचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार कोरोना रुग्णांची संख्या आणि आरोग्य सेवेची गरज बदलत असते. त्यामुळे एकाच ठिकाणाहून सर्व आरोग्यसेवा सांभाळणे कठीण आहे.
अॅम्बुलन्स, ऑक्सिजन, अत्यावश्यक औषधं, रुग्णालय सेवा या सर्व अत्यावश्यक आरोग्यसेवांवर एक पारदर्शक मूल्य असणे गरजेचे आहे. तसेच याबाबत एकच राष्ट्रीयकृत धोरण असावे. रुग्णालयाचा दर सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जायला नको आणि सर्व खर्च हा इन्शुरन्सद्वारे केला जावा, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
कोरोनाबाबत अधिकृत पुरावा असलेल्या माहितीचा प्रचार-प्रसार करून अंमलात आणावी. यामध्ये आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचा समावेश असावा. तसेच घरगुती उपचार, प्रथमोपचार, स्थानिक पातळीवर जिल्हा रुग्णालयातील उपचारासंबंधी सर्व स्थानिक भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध करून द्यावी.
खासगी क्षेत्रासह आरोग्य यंत्रणेमधील सर्व मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच त्यांना पीपीई कीट, आरोग्यसेवेसंबंधी मार्गदर्शन, विमाकवच आणि मानसिक धीर देणे गरजेचे आहे.
राज्य सरकारने लसीकरण करताना उपलब्ध डोसचा वापर योग्यरित्या करण्यासाठी कोणत्या गटाला लस द्यायची हे पुराव्याआधारीत ठरवावे. तसेच पुरवठा वाढल्यानंतर लसीकरण वाढवावे. लसीकरण हे सार्वजनिक आहे. त्याचे बाजारीकरण करू नका, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे.
देशातील कोरोना परिस्थिती सुधारण्यासाठी लोकसहभाग वाढवा. आरोग्यसेवेत आणि इतर कामासाठी सोसायटीतील लोकसहभाग वाढवावा, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच मुंबईचे उदाहरण देखील देण्यात आले आहे.
सरकारच्या माहिती संकलनामध्ये पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात येणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत जिल्ह्यांना आधीच तयारी करण्यास सोयीस्कर होईल. रुग्णाचे वय, लिंग यासंबंधी कोरोना रुग्णांची माहिती, रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूदर, लसीकरणाची स्थिती, उपचाराचा प्रोटोकॉल आणि त्याचे परिणाम ही सर्व माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना असणे गरजेचे आहे.
रोजगारासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या तसेच कोरोनाकाळात बेरोजगार झालेल्या लोकांच्या खात्यात राज्य सरकारने पैसा जमा करणे गरजेचे आहे. इतर क्षेत्रातील कंपन्यांनी कॉन्ट्रॅक्टचा विचार न करता कामगारांना कामावर ठेवणे गरजेचे आहे. तसेच अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर सरकारने या कंपन्यांना त्यांची नुकसानभरपाई भरून द्यावी, असे आश्वासन देणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.