लॅन्सेट अहवाल : प्रदूषणामुळे एका वर्षात ९० लाख मृत्यू

प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम प्रचंड आहेत. कनिष्ठ आणि मध्यम उत्त्पन्न असलेले देश या परिणामांमुळे होरपळून निघत आहेत.
pollution
pollutiongoogle
Updated on

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण मानवप्रजातीच्या जीवावर बेतत आहे. २०१९ या वर्षात जगभरात ९० लाख मृत्यू विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे झाले आहेत. 'दी लॅन्सेट कमिशन ऑन पोल्युशन अॅड हेल्थ'च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

pollution
भीषण ! मुंबईतील 25 हजार नागरिकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू 

जागतिक पातळीवर ९० लाख मृत्यू म्हणजेच सहापैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे झाला आहे. प्रदूषणामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ६.६७ दशलक्ष मृत्यूंना वायू प्रदूषण जबाबदार आहे. १.३६ दशलक्ष अकाली मृत्यू जलप्रदूषणामुळे ओढवले आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या विषारी वायू आणि रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून ८ लाख ७० हजार मृत्यू झाले आहेत.

pollution
हवेच्या प्रदूषणामुळे गुदमरतोय बालजीव; गेल्या वर्षी १.१६ लाख मुलांचा मृत्यू

विषारी रासायनिक प्रदूषित घटकांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २००० साली ०.९ दशलक्ष, २०१५ मध्ये १.७ दशलक्ष, २०१९ मध्ये १.८ दशलक्ष असे वाढते गेले. तसेच २०१९ साली शिसे या प्रदूषकामुळे ९ लाख मृत्यू झाले. आधुनिक प्रकारच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण गेल्या दोन वर्षांत ६६ टक्क्यांनी वाढले आहे.

pollution
प्रदूषणामुळे पंचगंगेची परिस्थितीकी धोक्यात

प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम प्रचंड आहेत. कनिष्ठ आणि मध्यम उत्त्पन्न असलेले देश या परिणामांमुळे होरपळून निघत आहेत. प्रदूषणामुळे आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम होत असले तरी आंतरराष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यावर मात्र प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत आहे, असे लॅन्सेटच्या अहवालाचे मुख्य लेख रिचर्ड फुल्लर यांनी म्हटले आहे.

pollution
नासाने सॅटेलाइटद्वारे दिल्लीतील चित्र काढून सांगितले प्रदूषणा मागील कारण

प्रदूषणामुळे होणारे अतिरिक्त मृत्यू आर्थिक तोट्यालाही कारणीभूत ठरले आहेत. २०१९ मध्ये एकूण ४.६ लाख कोटी यूएस डॉलर्सचे नुकसान झाले. हे प्रमाण जागतिक आर्थिक उत्पन्नाच्या ६.२ टक्के होते. या अहवालातील अभ्यास प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या असमानतेकडेही लक्ष वेधतो. प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी ९२ टक्के मृत्यू आणि आर्थिक नुकसानाचे ओझे देशांमधील कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्न गटावर पडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.