Amartya Sen : नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्या सुरक्षेत वाढ; मोदी सरकारकडून Z+ सुरक्षा, काय आहे कारण?

आज सकाळपासून अमर्त्य सेन यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलीये.
Nobel Laureate Amartya Sen
Nobel Laureate Amartya Senesakal
Updated on
Summary

घराबाहेर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात आहेत.

विश्व भारती विद्यापीठ (Visva Bharati University), शांतिनिकेतन आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन (Amartya Sen) यांच्यात सुरू असलेल्या जमिनीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, त्यांना आज (रविवार) झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलीये.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी विद्यापीठ आणि अमर्त्य सेन यांच्यात सुरू असलेल्या जमिनीच्या वादात हस्तक्षेप करत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. यानंतर आज त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. दरम्यान, अमर्त्य सेन आज दिल्लीला रवाना झाले आहेत.

Nobel Laureate Amartya Sen
Terrorist Attack : पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर अंदाधुंद गोळीबार; दोन महिलांसह आठ जण जखमी

आज सकाळपासून अमर्त्य सेन यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आलीये. अमर्त्य सेन यांच्या 'प्रचिती' निवासस्थानाला Z+ सुरक्षेनं वेढा घातला आहे. घराबाहेर अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर्त्य सेन 16 किंवा 17 फेब्रुवारीला शांतीनिकेतनला परतणार आहेत.

Nobel Laureate Amartya Sen
Chandrapur : चंद्रपूरच्या इतिहासात नव्यानं भर; खोदकाम करताना सापडली बाराव्या शतकातील श्रीकृष्णाची मूर्ती!

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात झेड प्लस सुरक्षा फक्त दोनच लोकांकडं होती. एक स्वत: मुख्यमंत्री आणि दुसरे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याकडं. आता राज्यात झेड प्लस सुरक्षा मिळवणारे अमर्त्य सेन हे तिसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.