Landslide at Kedarnath Yatra: केदारनाथ मार्गावर मोठी दुर्घटना; दरड कोसळल्याने महाराष्ट्रातील दोघांसह तिघांचा मृत्यू

landslide accident on Kedarnath Yatra: आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Landslide
Landslide
Updated on

नवी दिल्ली- केदारनाथ मंदिराकडे जात असताना मार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. चिरबासाजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे तीन यात्रेकरुंचा मृ्त्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन यात्रेकरू महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी गौरीकुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलो होते. बचाव पथक देखील दाखल झाले होते. अद्याप बचावकार्य सुरु आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील किशोर अरुण पराटे (वय ३१) नागपूर महाराष्ट्र, सुनील महादेव काळे (वय २४) जालना महाराष्ट्र, अनुराग बिष्ट, तिलवाडा रुद्रप्रयाग यांचा समावेश आहे.

Landslide
Navi Mumbai: अविवाहित असताना गरोदर असल्याचं लपवलं, तरुणीचा बाथरूममध्येच मृत्यू, बाळ सुखरूप

गौरीकुंड ते केदारनाथ असा १६ किलोमीटर अंतराचा पायी मार्ग आहे. यादरम्यान अनेकदा भूस्खलनाच्या घटना घडत असतात. चीरबासा हा भूस्खलन होण्यासाठीच ओळखला जातो. पावसामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असते. मलबा, मोठे दगडं पडल्याने अपघात होत असतात. मागच्या वर्षी अशाच अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच हा मार्ग जोखमीचा म्हटला जातो.

Landslide
Nashik Crime : गुन्हेगाराशी असलेली मैत्री अंमलदाराच्या अंगलट! बजरंगवाडी दंगलीप्रकरणी अटक; मोक्कांतर्गत कारवाईची शक्यता

सदर घटनेप्रकरणी उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणालेत की, पहाडी भागात दरड कोसळल्याने काही यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ही बातमी दु:खद आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्याचे निर्दश देण्यात आले आहे. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची देव शक्ती देवो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.