कोझिकोड : केरळमधील चेलान्नूर खेड्यातील बहात्तरवर्षीय जानकी अम्मा हिंदीचे नव्यानेच शिकलेले धडे गिरवीत आहेत. ‘इक थंडी अंधेरी रात’, ‘सडक पे जा रहा है’ सारखी छोटी वाक्ये त्या उच्चारत आहेत. दक्षिणेकडील राज्यांचा हिंदीविरोध पुन्हा उफाळून आला असताना केरळमधील हे चिमुकले खेडे १०० टक्के हिंदी साक्षर होण्याच्या वाटेवर आहे. खेड्यात स्थलांतरितांची संख्या मोठी असल्याने हिंदी शिकविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यातूनच जानकी अम्मांसारखे ज्येष्ठ नागरिकही हिंदीची बाराखडी शिकत आहेत.
पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनापर्यंत चेलान्नूरला संपूर्ण हिंदीसाक्षर ग्रामपंचायत जाहीर करण्याचा हेतूही या कार्यक्रमामागे आहे. तसे झाल्यास ती केवळ केरळमधीलच नव्हे तर अख्ख्या दक्षिण भारतातील पहिली अशी ग्रामपंचायत ठरू शकते, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. या अनोख्या उपक्रमाची मर्यादित निधीत व ग्रामपंचायतीचे ठराविक मनुष्यबळ वापरण्याला अधिकारी प्राधान्य देत आहेत.
मात्र, मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरित कामगारांमुळेच हिंदी साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले. यापूर्वी अनेक वर्षांपूर्वीच संसदीय समितीने उच्च शिक्षणसंस्थांत हिंदीची शिफारस करण्याला तमिळनाडू, केरळसारख्या राज्यांनी तीव्र विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर चेलान्नूर ग्रामपंचायत संपूर्ण हिंदी साक्षर होत आहे. या खेड्यातील जानकी अम्मांसारखे अनेक रहिवासी वय, लिंग, शैक्षणिक पात्रतेसारख्या अडथळ्यांवर मात करत हिंदी शिकत आहेत. चेलान्नूरमध्ये ईशान्येकडील स्थलांतरित रहिवाशांसाठी संवाद साधण्यासाठी हिंदी शिकावे लागत आहे.
चेलान्नूर ग्रामपंचायतीचे सरपंच नौशीर पी.पी. म्हणाले की खेड्यातील २० ते ७० गटातील प्रत्येकाला हिंदीसाक्षर बनविण्याच्या दृष्टिने हा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, त्यांचा हिंदीसंदर्भातील सध्याच्या वादाशी काही संबंध नाही. उपक्रमाची संकल्पना आणि इतर मूलभूत कामे गेल्या वर्षी सुरू झाली.
त्यापूर्वी हिंदीचे ज्ञान नसणाऱ्या व ही भाषा शिकण्यात रस असलेल्यांच्या शोधासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी नऊ हजार लोक हिंदी लिहू शकत नसल्याचे व तितकेच बोलू शकत नसल्याचे आढळले. तर १५ हजार जणांना हिंदी बोलता येत नव्हती. त्यानंतर इच्छुकांना शिकविण्यासाठी हिंदी शिक्षकांची समिती नेमून कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यासाठी अस्खलित
हिंदी येणारे माजी सैनिक,
आखाती देशातून परतलेले लोक व गृहिणी यांचीही मदत घेण्यात येत आहे.
असा राबविला जातोय उपक्रम
गावातील महिलांच्या ‘कुडुंबश्री’ या गटाच्या साप्ताहिक बैठकांची मदत
मनेरगातील जेवण, चहाच्या वेळांचाही हिंदी शिकविण्यासाठी वापर
घरांचे अंगण व गावातील इतर सार्वजनिक जागांमध्ये हिंदीचे वर्ग सुरू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.