Narendra Modi: 'रेवडी संस्कृती'वर पंतप्रधान मोदींचं मोठं विधान; म्हणाले देशातील...

 Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi saskal
Updated on

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील रेवडी संस्कृतीवर पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. मध्य प्रदेशच्या सटाण्यात पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना संबोधित करताना मोदी म्हणाले की, देशातील एका मोठ्या वर्गाला रेवडी संस्कृतीपासून मुक्ती हवी आहे. ( Narendra Modi News in Marathi)

 Prime Minister Narendra Modi
Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

मोदी म्हणाले की, पूर्वी गरिबांना घर वाटप केल्यानंतर स्वतंत्रपणे शौचालये बनवावी लागत होती. पाणी आणि गॅससाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. शिवाय घरे मनासारखी नसायची. त्यामुळे अनेकांनी घरांमध्ये प्रवेशच केला नाही. मात्र आपण घरमालकाला घर कसं हवं, याचं स्वतंत्र्य दिलं. त्यामुळे आज पंतप्रधान आवास योजना मोठ्या सामाजिक-आर्थिक बदलाचे माध्यम बनत असल्याचं मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, PMAY अंतर्गत घरांमध्ये वीज, पाणी कनेक्शन आणि गॅस कनेक्शन यासारख्या सर्व सुविधा आहेत. यामुळे लाभार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे बळ मिळेल. गरिबी हटवण्याचे आधीच्या सरकारांचे प्रत्येक आश्वासन आणि प्रत्येक दावा, केवळ राजकीय नौटंकी होता. ते कोणाच्याही कामी आले नाहीत.

 Prime Minister Narendra Modi
OYO रुममध्ये छुपा कॅमेरा लावून जोडप्यांचे खासगी क्षण केले रेकॉर्ड, त्यानंतर...

मोदी पुढं म्हणाले की, करदात्याला जेव्हा वाटतं की त्याचा पैसा योग्य ठिकाणी जात आहे, तेव्हा तो आनंदाने कर भरत राहतो. मात्र देशातील मोठ्या वर्गाला आता रेवडी संस्कृती नकोय, असंही मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.