ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी महत्त्वाचे; 'या' कामासाठी शेवटची संधी

last date of apply driving license online driving license apply last date know details
last date of apply driving license online driving license apply last date know details
Updated on

जर एखाद्या व्यक्तीकडे जुने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) असेल आणि त्यांनी अद्याप ऑनलाइन रजिस्टरेशन केले नसेल, तर त्यांनी ती लवकर करून घ्यावे लागणार आहे. अशा लायसन्स धारकांना परिवहन विभागाकडून शेवटची संधी दिली जात आहे. हस्तलिखित ड्रायव्हिंग लायसन्स (DL) लवकरात लवकर ऑनलाइन करण्याचे निर्देश परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्ह्यांच्या डीटीओंना (DTO) दिले आहेत. 12 मार्चपासून भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर बॅकलॉक एंट्री करता येणार नाही, त्यामुळे ही शेवटची संधी असणार आहे.

मिळालेल्या सरकारी सूचनांनंतर, ज्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स (DL) बुकलेट किंवा हाताने लिहून जारी केले गेले होते, अशा सर्व लोकांनी त्वरित ऑनलाइन नोंदणी करावी, कारण हे सर्व आता ऑनलाइन होणार आहे. त्यासाठी 12 मार्च सायंकाळी 4 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत मूळ ड्रायव्हिंग लायसन्स (DL) घेऊन परिवहन कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी परिवहन विभागाने राज्यातील सर्व आरटीओंना सूचनाही दिल्या आहेत.

last date of apply driving license online driving license apply last date know details
'रेड हार्ट इमोजी' ठरु शकते धोकादायक! होऊ शकतो कारावास अन् दंडही

ऑनलाईन DL चे फायदे

या डिजिटल युगात परिवहन विभाग देखील डिजिटल होत आहे आणि त्यामुळेच ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हाताने लिहिलेले ड्रायव्हिंग लायसन्स (DL) घेऊन जाणे ही एक मोठी समस्या होती.

प्रवासादरम्यान कुठेतरी तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स (DL) हरवले किंवा चोरीला गेले, तर तुमच्यासाठी मोठी अडचण येत असे, परंतु, जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स (DL) काही मिनिटांत इंटरनेटवर मिळून जाईल, त्यामुळे तुम्हाला अशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. तुमच्या मोबाईलमध्येही ते सहज उपलब्ध होईल. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स (DL) ची संपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध असेल आणि वाहन मालकाला ती सहजतेने वापरता येईल, तीही कोणतीही भीती न बाळगता.

last date of apply driving license online driving license apply last date know details
दररोज 3GB डेटा, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह सर्वात स्वस्त प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.