तीन वर्षांत 3.9 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं, 48 लोक गेले पाकिस्तानात!

लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.
Indian Citizenship Report
Indian Citizenship Reportesakal
Updated on
Summary

लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.

नवी दिल्ली : लोकांनी भारताचं नागरिकत्व (Indian Citizenship) सोडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. गेल्या तीन वर्षांत सुमारे 4 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय. सरकारच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी संसदेत ही माहिती देण्यात आलीय. गेल्या 3 वर्षात 3.9 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं असून हे लोक जगातील 103 देशांमध्ये स्थायिक झालं आहेत, असं सरकारकडून सांगण्यात आलंय.

अमेरिकेला (America) सर्वाधिक भारतीयांची पसंती आहे. 2021 बद्दल बोलायचं झालं तर, 1.63 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय. केंद्रीय गृह मंत्रालयानं (Union Ministry of Home Affairs) शेअर केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी 78,000 हून अधिक लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. 2019 मध्ये 61683 लोक, 2020 मध्ये 30828, 2021 मध्ये 78284 लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलंय. त्याच वेळी कॅनडा (Canada) अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथं भारतीयांनी नागरिकत्व घेतलंय.

Indian Citizenship Report
NCP : महाराष्ट्रात सत्ताबदल होताच राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

कॅनडा, ऑस्ट्रेलियात हजारो लोकांनी नागरिकत्व स्वीकारलं

कॅनडा : 2019 मध्ये 25381, 2020 मध्ये 17093, 2021 मध्ये 21597 लोकांनी नागरिकत्व घेतलंय. तर 2019 मध्ये 21340, 2020 मध्ये 13518 आणि 2021 मध्ये 23533 जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. यानंतर यूके, इटली, न्यूझीलंड, जर्मनीचा क्रमांक लागतो, जिथं सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व घेतलं आहे. 2019 मध्ये 1.44 लाख भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे, तर 2020 मध्ये 85256 लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय.

Indian Citizenship Report
Share Market : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

बसपा खासदार हाजी फजलुर रहमान (Haji Fazlur Rahman) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी संसदेत ही माहिती दिलीय. त्यांनी सांगितलं की, या लोकांनी वैयक्तिक कारणास्तव भारताचं नागरिकत्व सोडलंय. आकडेवारीनुसार, 7046 लोकांनी सिंगापूर, 3754 लोकांनी स्वीडन, 170 लोकांनी बहरीन, 2 जणांनी अंगोल, 21 जणांनी इराण आणि 1 जणांनी इराकचं नागरिकत्व स्वीकारलंय. याशिवाय, 1400 हून अधिक लोकांनी चीनचं नागरिकत्वही घेतलं आहे. तसेच भारताच्या 48 लोकांनी पाकिस्तानचं (Pakistan) नागरिकत्व स्वीकारलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.