बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेशी संपर्क साधून मुलाला मदत करा, असे सांगितले होते. त्यांच्यात मोठा आर्थिक व्यवहारही झाला. पोलिसांचा तपास भरकटण्याच्या उद्देशाने अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्याचा कट रचण्यात डॉ. तावरे हाच मास्टरमाईंड असल्याची माहिती एका अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पुणे पोलिसांकडून अजय तावरेच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे.
कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपींनी हा अर्ज केला आहे. त्यावर बुधवारी (ता. २९) सुनावणी होणार आहे.
अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), कोझी पबचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्म विलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर), ब्लॅक पबचे मालक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा), कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि ब्लॅकच्या बार काउंटरच व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. या सर्वांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर अग्रवाल यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुंबळ गर्दी झाली आहे. उन्हाळी सुट्टयांमुळे देवदर्शन आणि वर्षाविहारासाठी आलेल्या भाविकांसह पर्यटक भिमाशंकरला गर्दी झाली आहे. भिमाशंकर मंचर मार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलीमीटर पर्यत रांगा आहे. भिमाशंकर परिसरात भाविकांचे वाहतुक कोंडीमुळे हाल झाले. भिमाशंकर परिसरातील चारही पार्किंग फुल होऊन रस्त्यावर वाहनांची पार्किंग करण्यात आली. भिमाशंकर मार्गावरील नागमोडी वळणं बेशिस्त वाहतुकीमुळे झालेल्या वाहतुककोंडीत भाविकांनी पायी चालणं पसंद केलं आहे. वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची दमछाक झाली.
अल्पवयीन मुलाचा मित्र याचा जबाब पुणे पोलीस सध्या नोंदवत आहेत. अल्पवयीन मुलाबरोबर त्याच्या गाडीत असणाऱ्या मित्राचा जबाब त्याच्या आई समोर नोंदवला जात आहे. पार्टीच्या दिवशी काय झालं अपघात कसा घडला याची चौकशी केली जात आहे.त्याच्या जबाबातून अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवत असून येथे तापमान वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, विदर्भात पुढील 5 दिवस कोरडे हवामान राहील आणि काही शहरांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तसेच उष्णतेची लाट कायम राहील.
पुणे अपघात प्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. याच्या माध्यमातून ते या अपघात प्रकरणासंबंधी आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यत आहे
आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल माहिती अद्याप मिळू शकली नाही.
पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे.
पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या पोलीस कोठडीत ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मॉन्सूनपूर्व कामांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय आणि सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्यंमत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना याची माहिती दिली. या बैठकीत NDRF आणि SDRF चे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.
- भूस्खलन सारख्या घटना कशी टाळता येईल याचा आढावा घेतला
- झिरो कॅज्युएल्टी नुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले
- अन्नधान्याचा साठा, गावांशू संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना इतर राज्यांशी संपर्क करण्याबाबत इथं चर्चा झाली.
- लोकांना आपत्तीच्या संकेताबाबत जागृत करण्याचा प्रयत्न कसा करता येईल यावर चर्चा
- धोकादायक इमारतीतील लोकांचे स्थलांतरण कसे करता येईल याचा आढावा घेतला
- दुष्काळाबाबत चर्चा झाली, मदत व पंचनामा यावर चर्चा झाली
- जनतेच्या जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या
- आपल्या यंत्रणा सज्ज आहेत
- या बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल
- संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल
- लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे
- तात्काळ रेकसयू ऑपरेशन कसे करता येईल, तुकड्या वाढवण्यासाठी चर्चा झाली
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या भाजप सरकारकडे मांडल्या, पण त्यांनी मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात किमान 750 लोक मारले गेले. एमएसपी हमी देण्यासाठी आम्ही कायदे लागू करू."
पीएम मोदींच्या मुलाखतीवर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "पंतप्रधान नेहमी खोटे बोलतात. ही पंतप्रधानांच्या पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी चांगली गोष्ट नाही. राहुल गांधींनी जातीवर आधारित जनगणना करण्याची मागणी केली तेव्हा तुम्ही ती का केली नाही? ओबीसी, दलित आणि आदिवासींना तुम्ही खोटे आश्वासन देत आहात? देशात 60 वर्षे काँग्रेसची सत्ता होती, तर काँग्रेसने देशाची संवैधानिक व्यवस्था सांभाळली त्यामुळे तुम्हाला (पीएम मोदी) काँग्रेसवर हे आरोप करण्याचा अधिकार नाही."
पापुआ न्यू गिनीला भूस्खलनातून सावरण्यासाठी भारताने USD 1 दशलक्ष ची तात्काळ मदत मदत जाहीर केली आहे.
पश्चिम बंगालमधी हावडा येथे एक रिकामी लोकल ट्रेन रुळावरून घसरली आहे.
नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी खंडपीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामिन वाढवून देण्याच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.
मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी सांगितलं की, राज्यातील चक्रीवादळ रेमलमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना 15 कोटी रुपयांची मदत करण्यात यावी, तसेच नातेवाईकांना 4 लाख रुपयांची सानुग्रह अनुदान मिळेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. सध्या मिझोरममध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
मिझोरामची राजधानी आयझॉल जवळ मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे एक खाण कोसळल्याने ही दुर्घटना झाली आहे. आतापर्यंत या घटनेत 10 कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी काही लोक यात अडकल्याचा अंदाज आहे. सध्या पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर आज झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने ईडीच्या वकिलांना १० जूनपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलंय. आता या प्रकरणाची सुनावणी १० जून रोजी होणार आहे.
नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून झटका बसला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीसाठी अंतरिम जामीन सात दिवसांनी वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला आहे.
Gurmeet Ram Rahim : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रणजित सिंग यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने अन्य चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले होते. सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला राम रहीमने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
Fire incident at New Born Baby Care Hospital in Vivek Vihar : शाहदरा डीएम ऋषिता गुप्ता या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 25 मे रोजी येथे भीषण आग लागून त्यात 6 नवजात बालकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
बंगळूर : कल्याण कर्नाटक रोड ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनची (केकेआरटीसी) बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील एका अल्पवयीनासह तीन जण जागीच ठार झाले. सर्व मृत दुचाकीवरून जात होते. किण्णी सडक गावातील चंद्रकांता निंगाप्पा होलकुंडी (वय १७), विशाल संजयकुमार (वय २०) आणि समीर साब (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. गुलबर्गा जिल्ह्यातील कमलापूर तालुक्यातील डोंगरगाव क्रॉसजवळ रस्त्यावर हा अपघात झाला.
यवतमाळमध्ये पाऊस आणि वादळामुळे दिग्रस तालुक्यातील दिग्रस-पुसद रस्त्यावर 132 केव्ही टॉवर जमिनीवर कोसळले. विजेचे टॉवर कोसळल्याने दिग्रस तालुक्यातील अनेक भागात वीज पुरवठा बंद झाला आहे.
खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबलचक लांब रांगा लागल्या आहेत, तर वाहनचालक उलट्या दिशेने बोगद्यामार्गे जात असल्याने दोन्हीकडची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, महामार्गावरील ट्रक व मोठी वाहने रस्त्याच्या बाजूला केल्याने महामार्ग पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे.
आरक्षण संपवण्याचं विरोधकांनी पाप केलं. दलित, आदिवासी, ओबीसींच्या अधिकारासाठी माझी लढाई सुरु राहणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी एका विशेष मुलाखतीत सांगितले.
रियासी, जम्मू-काश्मीर : नदीचा प्रवाह वाढल्याने आणि धरणात गाळ साचल्यामुळे चिनाब नदीवरील सालाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
काँग्रेसचे नेते आणि कसब्याचे आमदार कल्याणीनगर येथे झालेल्या अपघाताप्रकरणी चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी पुणे पोलिसांना धारेवर धरले आहे. आज ते पुणे विद्यापीठात आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यामध्ये दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील विविध ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे.
नाशिकमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिसिद्वारे ते बैठक घेतील.
मुंबईत धारावीमधील एका गोदामाला भीषण आल लागली होती. सध्या आग विझवण्यात आली असून यात ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे देशातील जनतेसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे.
नवी मुंबईत आज सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. भोकरपाडा जलशुद्धिकरण प्रकल्प दुरुस्तीसाठी आल्याने हा पुरवठा बंद करण्यात आला आहे,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.