Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Politics Live Update in Marathi: दिवसभरातील देश, विदेश आणि राज्यातील घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

अपघात प्रकरणात माझी नाहक बदनामी- आमदार टिंगरे

पुण्यातील दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरवातीला दुर्लक्ष केलं परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत आहे, असा आक्षेप आमदर सुनिल टिंगरे यांनी घेतला आहे.

अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

खामगाव तालुक्यातील पळशी बु येथील शेतकऱ्याच्या अंगावर आकाशातून अचानक वीज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेत शेतकऱ्याचे शरीर भाजल्या गेले होते. सदर घटना २० मे रोजी सायंकाळी घडली . तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह जोरदार पावसाने हजेरी लावली. प्राप्त माहिती नुसार घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव भगवान भास्कर धनोकार वय (५०) असे आहे.

पुढील दहा दिवसांत केजरीवालांवर खोटे आरोप होणार- आतिशी

पुढील 10 दिवसांत भाजपकडून दररोज आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप केले जातील, पण दिल्ली आणि पंजाबच्या जनतेने या लोकसभा निवडणुकांमध्ये आपले मन बनवले आहे. भाजप जात आहे आणि इंडिया आघाडी सरकार स्थापन करत आहे.. 4 जूननंतर भाजपच्या घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असं प्रतिपादन दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी केलं.

Deepali Kulkarni : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच पैसे वाटप

भाजप नगरसेविका दिपाली कुलकर्णी यांच्या कार्यालयात पैसे वाटताना शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले आहे.

फरार आरोपी साजिद पठाणच्या जामीन अर्जावर 24 रोजी सुनावणी

अकोला : शहरातील मौलाना हाफीज नजीर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरणारा फरार आरोपी साजिद खान पठाण यांच्या जामीन अर्जावर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात, ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला. करमाड, शेकटा आणि करंजगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.

Mandi MP Candidate Kangana Ranaut : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

हिमाचल प्रदेश भाजपने काझाच्या लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या मंडी खासदार उमेदवार कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप करत काँग्रेसविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्त्यावर मैलायुक्त पाण्याचा पूर; दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक त्रस्त

कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावर मैलायुक्त पाण्याचा पूर आल्याचे चित्र सोमवारी (ता. २०) दिवसभर दिसून आले. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील श्री स्वामी समर्थनगर गल्ली क्रमांक १मध्ये ड्रेनेज तुंबल्याने हे पाणी वाहत मुख्य रस्त्यावर येत होते. मुख्य रस्ता रहदारीचा असल्याने आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्याने दिवसभर नागरिकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याने नाहक त्रास सहन करावा लागला.

Koyna Dam : कोयना धरणातील विसर्ग घटला

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या विमोचक द्वार आणि पायथा वीज गृहातून एकूण २६०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या २५.८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

Ramtekdi Rain : सिंहगड, रामटेकडीमध्ये प्रचंड वादळासह पाऊस सुरू

रामटेकडीमध्ये प्रचंड वादळासह पाऊस सुरू झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे स्मशानभूमीमधील, तसेच इतर ठिकाणाची झाडे पडलली आहेत, तर झोपडपट्टी भागातील काही रहिवाशांच्या घरावरील छत उडून गेले आहे. तर, सिंहगड रस्ता परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

Tamil Nadu Rain : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

तामिळनाडू : कोडाईकनालच्या डोंगराळ भागात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Manjunath School : डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय केंद्रावर मतदानासाठी वाढवून दिला वेळ

डोंबिवली मंजुनाथ विद्यालय या मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी ईव्हीएम मशीन बंद पडली होती. यामुळे मतदारांचा एक तास वाया गेला होता. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी या केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आला आहे.

Sharad Pawar : शरद पवार पोहचले दिल्लीत, उद्या पक्षाच्या उमेदवाराचा करणार प्रचार

शरद पवार आज दिल्लीत पोहचले आहेत. उद्या करनालमध्ये प्रचारसभा करणार आहेत. शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असून मराठा वीरेंद्र यांचा ते प्रचार करणार आहेत.

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

राजापूर : दुचाकी चोरून कोल्हापूरच्या (Kolhapur) दिशेने पळून जाताना पोलिसांना पाहून अणुस्कुरा घाटातील जंगलात (Anuskura Ghat) लपलेल्या अन्य दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर अखेर यश आले आहे. सुमारे तीस पोलिसांचा समावेश असलेल्या चार पथकांमार्फत गेले दोन दिवस रात्रंदिवस राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेमध्ये आज (ता. 20) सकाळी जंगलातून रस्त्यावर येवून कोल्हापूरच्या दिशेने जाण्याच्या प्रयत्नांत असलेल्या दोन्ही संशयित चोरट्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

कोल्हापुरात मान्सूनपूर्व पावसाचे धुमशान; विजांचा गडगडाटासह पावसाने लावली हजेरी

कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढले आहे. आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. जोतिबा डोंगरावर देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर रस्त्यावर झाडं कोसळली आहेत. जोतिबा रोडवरील हॉटेल साम्राज्य इथं चारचाकीवर भलमोठं झाड कोसळलं आहे. चारचाकी वाहनातील दोघजण जखमी झाले आहेत.

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय - उध्दव ठाकरे

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय असं उध्दव ठाकरे म्हणालेत तर मतदान केंद्रावर दिरंगाई होत आहे, तिथे मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर भाजपकडून सुरू असल्याचंही उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांच्या भेटीदरम्यान ठाण्यातील कळवा परिसरात ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मदत केली.

उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी पत्रकार परिषद; कोणत्या मुद्यावर करणार भाष्य?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Covaxin च्या दुष्परिणामांबाबत मोठे अपडेट, ICMR ने BHU अहवालावर उपस्थित प्रश्न केले

कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांवर नुकतेच BHU मध्ये संशोधन झाले आहे. हे संशोधन एका परदेशी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यानंतर, Covaxin च्या दुष्परिणामांबद्दल मीडियामध्ये अनेक अहवाल आले आहेत. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कोवॅक्सिन लस देण्यात आलेल्या 30 टक्के लोकांना काही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले आहेत. यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR ने या संशोधनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी अभ्यासाचे लेखक आणि जर्नलच्या संपादकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हे संशोधन पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित असल्याचे लिहिले आहे. याचा ICMR शी काही संबंध नाही. यासाठी तांत्रिक किंवा आर्थिक सहाय्य दिलेले नाही, असे ICMR ने म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी आयसीएमआरचे नाव काढून टाकण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

मीरा भाईंदर शहरात मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक दौरा केला आहे. CM शिंदे कार्यकर्त्यांच्या धावत्या भेटी घेत आहेत. सोबत आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के आहेत. मुख्यमंत्री आल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे.

मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

मुंबईतील मतदान केंद्रांवर पुरेशा सुविधा नाहीत. त्यांना पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळं अनेकांना चक्कर आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मतदारांच्या समस्या मांडल्या आहेत.

शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

नाशिक - शांतीगिरी महाराज यांनी ईव्हीएम मशिनला हार घातल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे हे प्रत्येक मतदान केंद्रावर जाऊन सुरक्षेचा आढावा घेत आहेत. आज दुपारी त्यांनी वाशी येथील सेंट मेरी हायस्कूल मधील मतदान केंद्राला भेट देत तेथील सुरक्षा व सर्व मतदान यंत्रणेची माहिती घेतली. यावेळी संपूर्ण नवी मुंबई शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्कता बाळगण्यात येत असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

नाशिकमध्ये फरांदे-गितेंचे कार्यकर्ते भिडले

नाशिकमध्ये भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे सेनेचे माजी आमदार वसंत गीते यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. भद्रकाली हद्दीत हे एकमेकांसमोर आल्यानं ही घटना घडली आहे. यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळं घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावं लागलं.

उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

उद्या राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल जाहीर होणार आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणी महिला कार्यकर्त्या घेणार पुणे पोलीस आयुक्तांची भेट 

पुणे हिट अँड रन प्रकरणी साडे बारा वाजता पुण्यातील महिला कार्यकर्त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार. तर दुपारी एक वाजता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,भाजपचे लोकसभा उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं सोपवण्यात आली आहे. यापूर्वी सीआरपीएफचे जवान संसद भवनाची सुरक्षा सांभाळत होते.

Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक, नागरीकांचा जिव धोक्यात

पंढरपूर शहरा बाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने शहरातील केबीपी कॉलेज चौक ते नवीन कराड नाका या लिंक रोड वरून अहोरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

 सारंगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतचे दर्शन

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तर, दुसरीकडे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सारंगगाव मतदान केंद्रावर कोळी आगरी संस्कृतीचे दर्शन घडले.

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराजांचा सहकाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

शांतीगिरी महाराजांच्या सहकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मतदान केंद्रावर शांतीगिरी महाराजांच्या चिठ्ठ्या वाटत होता. म्हसरूळ पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई केली जात आहे.

सुनील राऊत पोलिसांवर भडकले

शिवसेना उबाठा गटाचे नेते सुनील राऊत पोलिसांवर भडकल्याचे पहायला मिळाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात मतदान केले यावेळी संपुर्ण कुटुंब त्यांच्या सोबत होत.

पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Mumbai News: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि.२० मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे.पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

Akhilesh Yadav: ED-CBI बंद व्हायला पाहिजे- अखिलेश यादव

ईडी आणि सीबीआय बंद करायला पाहिजे. यांची गरज काय? असा सवाल समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले आहेत. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

PM Modi: विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. आज देशात पाचव्या टप्ट्यातील मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी एक्सवर पोस्ट केली आहे.

PM Modi: पंतप्रधान मोदींचा ओडीशाच्या पुरीमध्ये रोड-शो, पाहा व्हिडिओ

पंतप्रधान मोदी यांनी आज ओडिशाच्या पुरीमध्ये रोडशो घेतला. भाजप उमेदवार संबित पात्रा पुरी मतदारसंघातून उभे आहेत. त्यांच्यासाठी हा रोडशो होता.

iranian president ebrahim raisi: इराणचे अध्यक्ष अद्याप बेपत्ताच, प्रतिकूल वातावरणामुळे मदतकार्यात अडथळा

इराणचे अध्यक्ष इब्राहित रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. प्रतिकूल वातावरणामुळे अपघातग्रस्त हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचण्यास अडथळा येत आहे.

Mumbai Temperature News: मुंबई, ठाण्यात आजही उष्मा कायम राहणार

मुंबई, ठाणे आणि परिसरामध्ये उष्मा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा जाणवणार आहे. तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. देशातील ४९ तर राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. राज्यात आज ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय मुंबई, ठाणे आणि परिसरात उष्मा कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.