Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News | Maharashtra Politics दिवसभरातील देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही याठिकाणी वाचू शकता.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

जम्मू काश्मीरच्या डोडा भागात भूकंपाचा धक्का

जम्मू काश्मीरच्या डोडा भागामध्ये सोमवारी रात्री साडेनऊ वाजता ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

मुंबई महापालिकेवर बुधवारी काँग्रेसचा मोर्चा

स्वच्छतेचे कंत्राट एकाला देऊन मुंबईतील हजारो स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करण्याच्या पालिकेच्या निर्णयाला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. याविरोधात ६ मार्च रोजी पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांचा राजीनामा

अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार घालण्याच्या आपल्या पक्षाच्या निर्णयाचा निषेध करत गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अंबरीष डेर आणि आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमध्ये येण्यासाठी केवळ तीन दिवस बाकी असताना या दोन मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डांनी दिला खासदारकीचा राजीनामा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींनी स्वीकारला आहे.

मोहुआ मोईत्रा यांना ईडीने पाठवलं दुसरं समन्स

ईडीने 11 मार्च रोजी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट प्रकरणात TMC नेत्या मोहुआ मोईत्रा यांना दुसरे समन्स जारी केले.

ब्राझीलच्या पर्यटकावर झालेल्या अत्याचाराची कोर्टाने स्वतः घेतली दखल

झारखंड उच्च न्यायालयाने दुमकी जिल्ह्यात ब्राझीलच्या पर्यटकावर झालेल्या सामूहिक बलात्काराची स्वतःहून दखल घेतली आहे.

इलेक्टोरल बाँडचा तपशील जाहीर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत मागितली

स्टेट बँक ऑफ इंडियाने राजकीय पक्षांच्या इलेक्टोरल बाँडचा तपशील जाहीर करण्यासाठी ३० जून २०२४ पर्यंत मुदत वाढवून मागितली आहे. सर्व तपशील देण्यासाठी वेळ लागणार असल्याचं बँकेचं म्हणणं आहे.

इतका विश्वासघातकी मित्र असूच शकत नाही- आशिष शेलार

देशाच्या राजकारणात इतका विश्वासघातकी मित्र असूच शकत नाही, त्यांनी आम्हाला धोका दिल्यामुळे आम्ही त्यांचा पक्ष फोडला, अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते 'एबीपी माझा'वर बोलत होते.

राष्ट्रीय लोक दलाकडून दोन उमेदवार घोषित 

राष्ट्रीय लोक दलाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणूक 2024 साठी एक उमेदवार देखील घोषित केला.

वन्य प्राण्यांचे माणसांवरील हल्ले वाढणे चिंतेची बाब; केरळच्या मंत्र्यांचे वक्तव्य

केरळचे राज्यमंत्री पी राजीव यांनी मानुष्य आणि वन्य प्राण्यांमधील वाढत्या संघर्षावर चिंता व्यक्त केली. त्यांनी हे वक्तव्य इडुक्की जिल्ह्यात हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर केलं.

गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोधवाडिया यांनी सोडला पक्ष

गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोधवाडिया यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा दिला असून त्यांनी राजीनामा देताना काँग्रेसने मलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं म्हटलं.

Ranji Trophy 2024 : मुंबईने रणजी ट्रॉफीची फायनल गाठली.

मुंबईने सेमी फायनल सामन्यात तमिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्या हंगामात रणजी ट्रॉफीची गाठली आहे. त्यांचा सामना आता विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे.

आपचं दिल्लीतील कार्यालय रिकामं करण्याचे आदेश

पत्नीवर जबरदस्ती करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा

आपली पत्नी मुलगा देऊ शकत नाही याचा राग असलेल्या पतीने स्वतःच्याच पत्नीवर वेळोवेळी जबरदस्ती करत मानसिक, शारीरिक छळ केल्याची घटना सुधागड पालीमध्ये घडली आहे. या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने अखेर कायद्याची मदत घेत आरोपी पतीला गजाआड केले आहे. दरम्यान, आरोपी पती हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सदस्य असल्याचं समोर आलं आहे.

पंजाबच्या विधानसभेत मुख्यमंत्री विरोधीपक्ष नेत्यावर भडकले, हमरीतुमरीवर येता येता राहिले

आशिष शेलारांची काँग्रेसवर टीका

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "काँग्रेसकडे ना कोणता नारा आहे, ना कोणतं व्हिजन."

तिन्ही पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार- प्रकाश आंबेडकर

महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीत सामील व्हावी, यासाठी तिन्ही पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करणार, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आली आहे.

हर्षवर्धन पाटलांचं थेट गृहमंत्री फडणवीसांना पत्र, इंदापुरात फिरू न देण्याची धमकी

इंदापुरात फिरु देणार नाही, अशी धमकी हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आली आहे. याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Samir Wankhede: समीर वानखेडेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

समीर वानखेडे यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांना २७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे.

शाहू महाराज छत्रपती लोकसभेची निवडणूक लढवणार

शाहू महाराज छत्रपती लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. महाविकास आघाडीकडून ते निवडणूक लढवतील.

प्रकाश आंबेडकरांकडून लोकसभेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर

प्रकाश आंबेडकर यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अकोला, वर्धा आणि सांगली मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Navneet Rana: मी भाजपसोबत होते, आहे आणि राहणार- नवनीत राणा

भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना नवनीत राणा म्हटल्या की, 'पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम राहील. मी भाजपसोबत होते, आहे आणि राहणार. '

Crime news:  धक्कादायक! पुण्यात शाळेच्या व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

पुण्यात शाळेच्या व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोली भागात ही घटना घडली आहे. स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला तेव्हा व्हॅनच्या काचा फुटल्या. व्हॅनमध्ये विद्यार्थी असताना हा प्रकार घडला. पूर्वीच्या वादातून चालकावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Pune Traffic: जड वाहनांना पुणे शहरात उद्यापासून नो एंट्री

जड वाहनांना पुणे शहरात उद्यापासून नो एंट्री असणार आहे. पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना उद्यापासून बंदी असणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या पोलीस प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. पुणे नगर ,पुणे सोलापूर, पिंपरी चिंचवड पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे.

Amit Shah: अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर 

गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध बैठका घेणार आहेत.

Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूरच्या विमानतळावर आगमन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूरच्या विमानतळावर आगमन झाले. यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले.

Farmers Protest: शेतकरी आंदोलन पेटणार! १० मार्च रोजी देशभरात रेल रोको

शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली चलो' मोर्चाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. देशभरातील शेतकऱ्यांना 6 मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. शेतकरी नेत्यांनी 10 मार्च रोजी 'रेल्वे रोको' आंदोलनाची घोषणाही केली आहे. तसेच सीमाभागातील शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.

USA: वॉशिंग्टन डीसीमध्ये  डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

निक्की हेलीने वॉशिंग्टन डीसीमध्ये केला डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. यावेळी त्यानी पहिला विजय मिळवला

Nagpur News: जे पी नड्डा यांचा नागपूरचा दौरा रद्द 

दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार असल्याने जे पी नड्डा यांचा नागपूरचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज उद्घाटन

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण होणार आहे. भरवीर ते इगतपुरी या दरम्यानच्या रस्त्याचे उद्घाटन केले जाणार आहेत.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची आज मावळमध्ये जनसंवाद सभा

उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मावळमध्ये जनसंवाद सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच दुपारी एक वाजता महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे.

Nashik News: नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस

नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. अद्याप तोडगा निघालेला नाही. तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांनी जेलभरोचा इशारा दिला आहे.

Ajit Pawar: मंचरमध्ये आज अजित पवारांची प्रत्युत्तर सभा

पुण्यातील मंचरमध्ये आज अजित पवारांची प्रत्युतर सभा होणार आहे. त्यामुळे ते शरद पवारांना काही उत्तर देतात का, हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी चार वाजता ही सभा होईल.

Nagpur News: नागपूरमध्ये आज नमो संकल्प मेळावा, जेपी नड्डा राहणार उपस्थित

नागपूरमध्ये आज नमो संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहे. यासाठी जय्यत तयार करण्यात येत आहे.

Delhi Budget 2024-25: दिल्लीमध्ये आज रामराज्याच्या थीमवर आधारित बजेट

दिल्लीमध्ये आज बजेट मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे हा बजेट रामराज्य थीमवर आधारित असणार आहे.

नागपूरमध्ये आज नमो संकल्प मेळावा पार पडणार आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस इत्यादी नेते उपस्थित राहणार आहे. यासाठी जय्यत तयार करण्यात येत आहे. दिल्लीमध्ये आज बजेट मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे हा बजेट रामराज्य थीमवर आधारित असणार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी ६ मार्चला दिल्लीकडे कूच करतील. तसेच १० मार्चला रेल्वे रोको करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.