देशासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून 50 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी राज्यात 63 हजारांच्यापुढे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यात आज थोडी घट पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 51 हजार 751 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे सोमवारी कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 52,312 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रविवारी (ता.११) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज (ता. १२) त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही त्यांनी कळवले आहे. निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, त्या प्रचार करु शकणार नाहीत.
Pune Corona: जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी अन्य सुविधा तोकड्या पडत आहेत. पाणी, स्वच्छतेकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. वाचा सविस्तर-
Corona Update: सुखद! राज्यात आज बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त. वाचा सविस्तर-
मुंबई- मागील अनेक दिवसांपासून मुंबईतून परप्रांतीय मोठ्या संख्येने स्वगृही जात असल्याने सीएसएमटी, दादर, एलटीटी येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. कोरोना काळात या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोजना करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर-
देश- निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, त्या प्रचार करु शकणार नाहीत. वाचा सविस्तर-
मुंबई: मागच्या २४ तासात मुंबईत ६,९०५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ५ लाख २७ हजार ११९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९० हजार २६७ आहे. वाचा सविस्तर-
मुंबई- केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. त्यानुसार 14 एप्रिलला जबाब नोंदण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. वाचा सविस्तर-
नागपूर- दिवसाला ९०० ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होऊ शकेल या क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट शहरामध्ये स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. वाचा सविस्तर-
Share Market: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याचा प्रभाव शेअर मार्केटवरही पडल्याचं पाहायला मिळालं. लोकांमध्ये असलेल्या भीतीमुळे सोमवारी शेअर मार्केट सुरु होताच मोठी घसरण (stock market saw a big fall) पाहायला मिळाली. वाचा सविस्तर-
मनोरंजन- 'द फॅमिली मॅन 2' पाहायचायं; मग ही बातमी तुमच्यासाठीच. वाचा सविस्तर-
देश- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी भारताने एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझीलला मागे टाकले आहे. वाचा सविस्तर-
देश- एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. भारत सरकारने रशियाच्या 'स्पुटनिक' लशीच्या वापराला परवानगी दिली आहे. वाचा सविस्तर-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.