''नारायण राणेंनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते भल्याभल्यांनाही जमलं नव्हतं.. एखादा विषय कसा समजून घ्यायचा, तो कसा सोडवायचा याची हातोटी राणेंकडे आहे. त्यामुळे त्यांना निवडून द्या'' असं आवाहन राज ठाकरे यांनी कणकवली येथून केलं.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मोदींनी घ्यावं परंतु त्यांना त्यांनी हिंदूहृदयसम्राट म्हणावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. ज्यामध्ये पाच जवान जखमी झाले आहेत.
कर्नाटकमधील जेडीएसचे नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी बेंगळुरूमधील केआर नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
राज ठाकरे कणकवलीत दाखल झाले आहेत. कणकवलीतील हॉटेल निलम कंट्री येथे थोड्याच वेळाग राज ठाकरे दाखल होणार आहेत. आमदार नितेश राणे तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर स्वागतासाठी उपस्थित आहेत. यावेळी मनसैनिक तसेच भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सिंधुदुर्गातील बांदा शहरात दाखल झाले आहेत. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.
'काँग्रेसमध्ये अशी वेळ आली आहे की ते कोणाचेच ऐकत नाहीत आणि विशेषत: प्रभारी सरचिटणीस किंवा राहुल गांधी म्हणतात की जे चालले आहे, ते जाऊ द्या, त्यांना थांबवू नका' असे वक्तव्य कॉंग्रेसचे माजी आमदार राजकुमार चौहान यांनी केले आहे. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या, "पंतप्रधान मोदी राजवाड्यांमध्ये राहतात, त्यांना शेतकऱ्यांचे हाल समजतील का?" राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधानांवर हल्लाबोल
सलमान खान गोळीबार प्रकरणी आरोपी अनुज थापन कथित आत्महत्या प्रकरण
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
सीबीआय तपासाची केली मागणी
अनूजचा मृत्यू संशयास्पद असल्याचा याचिकेत दावा
मुंबई पोलीस तपास यंत्रणेवर गंभीर आक्षेप
अनुजच्या आईच्या वतीनं दाखल करण्यात आली आहे याचिका
या याचिकेवर लवकरच होणार सुनावणी
दरभंगा येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जेव्हा अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, तेव्हा मी म्हणालो होतो की, आता भारत येत्या 1000 वर्षांचे भविष्य लिहील, कधी कधी इतिहासातील एखादी घटनाही अनेक शतकांचे नशीब ठरवते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलाच असेल. औरंगजेबाने कर लावला होता, त्याचे नाव जिझिया कर होते, आज काँग्रेसही आपल्या जाहीरनाम्यात जिझिया कराबद्दल बोलत आहे. वारसा हक्काचा आदर केला पाहिजे. काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे की ते तुमच्या पूर्वजांनी घेतलेली संपत्ती काढून घेतील. काँग्रेस जिझिया लागू करू इच्छिते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले
भारतीय हवामान खात्याने मुंबईतील नागरिकांना मोठा इशारा दिला आहे. येत्या 36 तासांमध्ये समुद्रात जास्तीत जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
JD(S) नेते HD रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्या घरी SIT टीम पोहोचली आहे. अश्लील व्हिडिओ केस प्रकरणी हे पथक चौकशी करणार आहे. म्हैसूरमध्ये काल HD रेवण्णा यांच्याविरोधात किडनॅपिंगची केस दाखल करण्यात आली आहे.
प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज विशेष तपास पथकाची बैठक बोलावली होती. तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुक प्रचारा दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांनी उदय सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक केली होती. त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
भाजप देशात २०० पार करणार नाही, असं ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ते चिपळून येथील सभेत बोलत होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी कणकवली येथे सभा होणार आहे. मी सभेसाठी विनंती केली आणि त्यांनी मान्य केली असं राणे म्हणाले आहेत.
प्रज्वल रेवण्णा सेक्स टेप प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी पत्र लिहिलं आहे. सदर प्रकरणातील पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्यात यावीत. तसेच दोषींवर कारवाई व्हावी असं ते म्हणाले आहेत.
उत्तर-पूर्व मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या नावाशी मिळते जुळते चार उमेदवारी अर्ज दाखल. संजय पाटील यांना शह देण्यासाठी हे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा.
पुणे महापालिकेच्या शाळेतील भोंगळ कारभार उघडकीस. राज्यस्तरावर इयत्ता पाचवी व आठवी शिषावृत्ती परीक्षा निकाल जाहीर झाला परंतू मनपा शाळेचा निकाल फी न भरल्यानं राखून ठेवण्यात आला आहे. एक हजाराच्यावर मुलांचा निकाल यासाठी राखून ठेवला आहे.
राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं पत्रक काढलं आहे. येत्या शैक्षणिक वर्षात या अनधिकृत शाळा बंद कराव्यात अशा सूचना यातून देण्यात आल्या आहेत. अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापनास एक लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिन दहा हजार रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. ठाण्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या बैठका शिंदेंनी सुरु केल्या आहेत.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून अखेरच्या दिवशी 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांच्या पत्नी सुप्रिया अमोल कीर्तीकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Sambhaji Nagar: किराडपुरा परिसरातील शरीफ कॉलनी भागात एका घरामध्ये शुक्रवारी (ता. तीन) रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात सदफ इरफान शेख (वय तीन) ही चिमुकली जागीच ठार झाली, तर तिच्या कुटुंबातील इतर पाच जण भाजले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, ५ मे २०२४ रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी -वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणातही मेगाब्लॉक नसणार आहे.
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची रविवारी (ता. ५) मिरजेतील किसान चौकात सकाळी दहा वाजता सभा आहे. त्यानिमित्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.
डेहराडून : उत्तराखंडमधील जंगलात भीषण आग लागलीये. कोरड्या हवामानामुळं ही आग वेगाने पसरत आहे. आगीच्या सातत्याने वाढत असलेल्या घटनांमध्ये काल तीन जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीररीत्या भाजला. शुक्रवारी 24 तासांत राज्यात आगीच्या 64 नवीन घटना घडल्या असून त्यात एकूण 75 हेक्टर वनक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या हंगामात आतापर्यंत एकूण 868 घटनांमध्ये 1086 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या रविवारी उत्तर प्रदेशात मेगा रोड शो आणि जाहीर सभा घेऊन भाजप उमेदवारांना पाठिंबा देतील. पंतप्रधान मोदी भाजपच्या नऊ लोकसभा उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. शनिवारी ते कानपूरमध्ये असतील, तर रविवारी इटावा, सीतापूर आणि त्यानंतर अयोध्या येथे त्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातील.
सांगली : भाजप व महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आजपासून (ता. ४) सांगली दौऱ्यावर येत आहेत. त्यांची आज जत येथे प्रचार सभा होणार आहे. रविवारी (५) मिरजेत ‘विकसित भारत @ २०४७’ या विषयावर ते संवाद साधणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेकडून उद्या रविवारी 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं कळतंय.
Weather Update : आजही मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमान कमी होण्यास थोडासा दिलासा मिळू शकेल. दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील.
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या सांगता सभांच्या तोफा आज (शनिवारी) धडाडणार आहेत. यामध्ये खासदार शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीची सांगता सभा खासदार शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे, तर महायुतीची सांगता सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तालीम संघाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
Latest Marathi News Live Update : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या सांगता सभांच्या तोफा आज धडाडणार आहेत. यामध्ये खासदार शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या तोफा धडाडणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला आहे. पदयात्रा, नेत्यांच्या सभा, मेळावे, बैठकांतून जिल्ह्याचा कानाकोपरा दुमदुमून गेला असून, शेवटच्या दोन दिवसांत या प्रचारात आणखी रंग भरला जाणार आहे. ‘‘निवडणुका लक्षात घेता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो,’’ अशी टिपणी सर्वोच्च न्यायालयाने केली. लैंगिक अत्याचार आणि अश्लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांना कोणत्याही क्षणी विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) अटक होण्याची शक्यता आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.