Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रवि राणा यांच्यात बैठक.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव

दिल्लीच्या मंत्री आणि आप नेत्या आतिशी यांनी ट्विट करुन अरविंद केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचं सांगितलं. ''सर्वोच्च न्यायालयाने आज रात्रीच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी आम्ही केली आहे." असं त्या म्हणाल्या.

ईडी कार्यालयाबाहेर कलम १४४ लागू

अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ईडीच्या कार्यालयाबाहेर कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित

सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

अरविंद केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता

केजरीवाल यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. केजरीवाल यांना अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.

केजरीवाल यांची लीगल टीम सुप्रीम कोर्टात पोहोचली

अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची लीगल टीम सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली आहे.

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक

दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचलानालयाचे पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवसस्थानी दाखल झाले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये आठवले यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

पिंपरी-चिंचवडमध्ये गोदामाला भीषण आग

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील त्रिवेणीनगर परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यात आली असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला रवि राणा

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार रवि राणा नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले आहेत.

 सागरी सरावात दिसणार INS Tir आणि INS Sujata ची जादू

INS Tir आणि INS Sujata भारत, मोझांबिक आणि टांझानिया यांच्यातील ट्राय-लॅटरल संयुक्त सागरी सरावात सहभागी होणार आहेत. हा सराव 21 ते 29 मार्च दरम्यान होणार आहे.

पंतप्रधानांवर टीका करणे म्हणजे देशद्रोह - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे देशद्रोह असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Latest Marathi News Live Update : शिवेंद्रसिंह राजे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

शिवेंद्रसिंह राजे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. सातारा लोकसभा जागेसंदर्भात महायुतीचा तिढा अद्याप कायम आहे.

केजरीवालांना सक्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार

दिल्ली हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तीच्या कारवाईपासून कोणतेही अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला आणि या टप्प्यावर आम्ही अंतरिम सवलत देण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.

Electoral Bonds: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, SBI ने इलेक्टोरल बाँड नंबर्ससह सर्व डेटा निवडणूक आयोगाला दिला

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले की अल्फान्यूमेरिक नंबरसह इलेक्टोरल बाँड्सचे सर्व तपशील निवडणूक आयोगा समोर उघड केले आहेत. 21 मार्च 2024 रोजी, SBI ने भारतीय निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडचे सर्व तपशील दिले आहेत.

Electoral Bond: इलेक्टोरल बाँड चोरीमध्ये भाजप आघाडीवर; सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे वक्तव्य

''इलेक्टोरल बाँड चोरीमध्ये भाजप आघाडीवर असल्याने विरोधकांची खाती गोठवली जात आहेत. ही खंडणी आहे. देशातील जनतेला लस टोचणाऱ्या कंपन्यांकडूनही पैसे उकळल्याचे समोर आले आहे'' सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे वक्तव्य

AhamadNagar News : हप्तेखोरी’ची तत्काळ चौकशी करा; प्राथमिक शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना फर्मान

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांकडून कोण पैसे गोळा करीत आहे, याची चौकशी करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अहवाल सादर करा. पगारबिल काढण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांचीच आहे. त्यांनी इतरांवर ही जबाबदारी ढकलू नये, असे फर्मान शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काढले आहे.

अहमदनगर पोलीस ‘ॲक्शन मोड’वर, ८७० आरोपींची तडीपारी प्रस्तावित

लोकसभेसाठी अहमदनगर व शिर्डी मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. १३ मे रोजी मतदान पार पडणार असल्याने प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. जिल्ह्यातील १७ हजार ९२९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे स्तरावर कारवाईस सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती बाबतच्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या

निवडणूक आयोगाच्या नव्या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती बाबतच्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या.यावेळी त्यात कुठलाही हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला.

फेसबुकवर ओळख अन् मैत्री, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

फेसबुकवरून ओळख झालेल्या मित्राने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर लग्नाला नकार दिला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अश्विन चिंचुलकर (३०, रा. दत्तवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

राज ठाकरेंना महायुतीत योग्य स्थान मिळेल - बावनकुळे 

राज ठाकरेंना महायुतीत योग्य स्थान मिळेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वंचितची मविआत येणाची शक्यता मावळली, संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

वंचित बहुजन आघाडी मविआत सामील होणार की नाही, याबाबत अजूनही तिढा कायम आहे. अशातच संजय राऊत यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वंचितला सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार, असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी दाखल

महायुतीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हॉटेल ताज लँड्स या ठिकाणी दाखल झाले आहेत.

महायुतीच्या नेत्यांची बैठक, राज ठाकरेही उपस्थित

हॉटेल ताज लँड्समध्ये महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज ठाकरे यांनी देखील हजेरी लावली आहे.

राजू पारवे शिंदे गटात प्रवेश करणार?

आमदार राजू पारवे आज शिंदे गटात प्रवेश करु शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांना रामटेक मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.

जागावाटपाचा तिढा सुटणार? थोड्याच वेळात मुंबईत मविआची बैठक; जागावाटपावर होणार चर्चा

थोड्याच वेळात मुंबईत मविआची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. या बैठकासाठी अनेक नेते उपस्थित आहेत.

अमरावतीत आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा दाखल

आचारसंहिता भंग केल्याचा अमरावतीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची परवानगी न घेता नियम धाब्यावर बसवून अमरावतीच्या ओसलवाल भवनात महिलांच्या हळदी कुंकवाचा मेळावा घेतला आहे. हळदी कुंकवाच्या मेळाव्यात 200 पेक्षा अधिक महिलांचा सहभाग होता, महिलांना भेटवस्तू वाटल्या. युवा स्वाभिन पक्षाचे पदाधिकारी सूरज मिश्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sanjay Raut: भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि शरद पवार गटाचा दावा- संजय राऊत

एक-दोन जागेवर आमच्यात आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरु आहे. भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि शरद पवार गटाने दावा केला आहे. कोल्हापूरची जागा आम्ही हसत हसत सोडली आहे. जागावाटपाबाबत आमच्यात मतभेद नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

बांधकाम सुरू असताना दोन मजली इमारत कोसळली

देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी दुर्घटना घडली आहे. बांधकाम सुरू असलेली जुनी इमारत अचानक कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले कीबांधकाम सुरू असलेली दोन मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्री २:१६ च्या सुमारास घडली.

निवडणुकीत दहशत पसरवण्याचा कट उधळला; ISIS च्या भारतातील प्रमुखाला आसाममधून घेतलं ताब्यात

आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (STF) कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) च्या दोन दहशतवाद्यांना भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचे हे मोठे यश मानले जात आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, धुबरी जिल्ह्याजवळील बांगलादेशातून ISIS दहशतवादी भारतात घुसले आणि राज्यात काहीतरी मोठे करण्याचा त्यांचा विचार होता. पोलिसांनी सांगितले की, अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये ISIS इंडियाचा प्रमुख हॅरिस फारुकी आणि त्याच्या एका सहाय्यकाचा समावेश आहे.

Tata Power Golavli : देशमुख होम्स परिसरात भंगाराच्या गोडवूनला भीषण आग

डोंबिवली : टाटा पावर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात असलेल्या भंगाराच्या गोडवूनला भीषण आग लागली आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कापडाच्या चिंध्या, प्लास्टिक बॉटल, पिशव्या, लाकडी सामान मोठ्या प्रमाणात असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गेल्या एक तासापासून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

Marathwada Earthquake : मराठवाड्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; नागरिकांत भीतीचं वातावरण

नांदेड : मराठवाड्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोलीत 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. 

Karnataka Congress : काँग्रेसची दुसरी यादी आज शक्य, 17 उमेदवार निश्चित

बंगळूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रलंबित असलेल्या मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत बैठकांची मालिका सुरूच ठेवली आहे. १७ उमेदवारांची नावे निश्चित झाली असून, चार मतदारसंघाचा पेच अजूनही कायम आहे. आज उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली येथे पत्रकारांना सांगितले.

Arunachal Pradesh Earthquake : अरुणाचल प्रदेशात आज पहाटे 3.40 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग येथे आज पहाटे 3.40 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असून नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.

Delhi : कबीर नगरात दोन मजली जुनी इमारत कोसळली, दोन कामगारांचा मृत्यू

दिल्ली : कबीर नगर, वेलकम येथे आज पहाटे 2:16 च्या सुमारास दोन मजली जुनी इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अर्शद (३०) आणि तौहीद (२०) या दोन कामगारांना जीटीबी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं, तर दुसरा कामगार रेहान (२२) गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Samajwadi Party : लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून 6 उमेदवारांची यादी जाहीर

लखनौ : समाजवादी पक्षाने बुधवारी संध्याकाळी लोकसभा निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची आणखी एक नवीन यादी जाहीर केली. या यादीत संभल, बागपत, गौतम बुद्ध नगर, पिलीभीत, घोसी आणि मिर्झापूर लोकसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाने संभलमधून झियाउर रहमान बुर्के, बागपतमधून मनोज चौधरी, गौतम बुद्ध नगरमधून राहुल अवाना, पीलीभीतमधून भागवत सरन गंगवार, घोसीमधून राजीव राय आणि मिर्झापूरमधून राजेंद्र एस यांना उमेदवारी दिली आहे. ही यादी एसपीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जाहीर केली.

Madha Loksabha : रामराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांचा कौल घेणार

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यास रामराजे नाईक निंबाळकर यांनी टोकाचा विरोध केला. दरम्यान, माढा मतदारसंघात काय भूमिका घ्यायची, यासाठी रामराजे यांनी आज फलटण, माण, खटाव व कोरेगाव (उत्तर) तालुक्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी चारला कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज शाहू महाराजांची घेणार भेट

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (ता. २१) महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता नवीन राजवाडा येथे ही भेट होईल. ठाकरे यांची मिरज (जि. सांगली) येथे आज सायंकाळी जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते कोल्हापुरात विमानतळावर येतील.

Sharad Pawar : महाविकास आघाडीची शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज बैठक

Latest Marathi News Live Update : लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या उमेदवारीबाबत खासदार उदयनराजे भोसले हे अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेल्याचं सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे घोडे वंचित बहुजन आघाडीसोबतच्या तसेच आघाडीतंर्गतच्या वादामुळे अडले आहे. यावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता नवीन राजवाडा येथे ही भेट होईल. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.