Latest Marathi News Live Update: दिवसभरातील ताज्या घडमोडी वाचा एका क्लिकवर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

EVM-VVPAT प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

EVM-VVPAT पडताळणीसाठीच्या याचिका सुनाववणीसाठी उद्या सूचीबद्ध करण्यात आल्या आहे.

"मोदीजींना 'मंगळसूत्र'चे महत्त्व कळले असते तर..."

"मोदीजींना 'मंगळसूत्र'चे महत्त्व कळले असते तर त्यांनी अशा गोष्टी बोलल्या नसत्या. जेव्हा नोटाबंदी झाली तेव्हा त्यांनी महिलांची बचत हिरावून घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान, 600 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला, मणिपूरमध्ये एका महिलेची धिंड काढण्यात आली तेव्हा मोदीजी का गप्प बसले होते? असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा म्हणतात,

बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचे यशस्वी प्रक्षेपण

23 एप्रिल 2024 रोजी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या नेतृत्वाखाली मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या नवीन प्रकाराचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील प्रचार सभेचे ठिकाण बदलले असल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार बच्चू कडू यांना धक्का

अमरावती येथे प्रचार सभेसाठी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला दिलेल्या मैदानाची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

...अन्नातही विष कालवण्याचं काम मोदी सरकार करतंय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर एख व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्ला चढवण्यात आला आहे. अव्वाच्या सव्वा तिकीट दर ठेवूनही वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना असे अन्न मिळत असेल तर, देशातील ८० कोटी जनतेला किती निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत असेल याचा विचार करा! अक्षरशः अन्नातही विष कालवण्याचं कामच मोदी सरकार करत आहे!

पुण्यात २७ तारखेला मनसेचा महामेळावा! मोहोळ यांच्या विजयासाठी थोपटणार दंड

27 तारखेला मनसेचा पुण्यात महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून महायुतीचे पुणे मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयासाठी मनसे दंड थोपटणार आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराची दिशा दिली जाणार आहे. या मेळाव्याला महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ व मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

अकोल्यात अमित शाहांच्या सभेला सुरूवात

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्रात आहेत. विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंधातील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपने लडाखमध्ये लोकसभेचा उमेदवार बदलला

भाजपने लडाख मतदारसंघातून ताशी ग्याल्सन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याआधी भाजपकडून येथीव विद्यमान खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना उमेदवारी जाहीर कऱण्यात आली होती. मात्र आता भाजपने ऐनवेळी येथील उमेदवार बदलला आहे.

Bachhu Kadu : सायन्सकोर मैदानावरुन बच्चू कडू अन् पोलिसांमध्ये वाद

प्रचारसभेसाठी सायन्सकोर मैदानावरुन नवणीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यात आज बच्चू कडू हे मैदानाची पाहणी करण्यासाठी गेले. त्याठिकाणी जाण्यापासून पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यामुळे पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

Pune Water Crisis : पुण्यातील पुरंदर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई; लोकांवर गाव सोडण्याची वेळ

राज्यातील अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी खाजगी टँकर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे विभागात जवळपास 350 हून अधिक गावात 391 खाजगी टँकरने पाणीपुरवठा केलं जात आहे. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाण्याची टंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागत असून, गाव सोडण्याची वेळ आत्ता या नागरिकांना आली आहे.

Galaxy Apartment Firing : सलमानच्या घराबाहेर गोळीबार केलेलं पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात

सलमान खानच्या घराबाहेर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आला होता. यासाठी वापरण्यात आलेली दोन पिस्तुलं मुंबई क्राईम ब्रांचच्या ताब्यात आली आहेत. सूरतच्या तापी नदीमध्ये ही पिस्तुलं मिळाली.

Tamil Nadu Farmers : हाडं अन् कवट्या घेऊन तामिळनाडूचे शेतकरी बसले आंदोलनाला

दिल्लीच्या जंतरमंतरवर तामिळनाडूचे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. हाडं आणि कवट्या घेऊन ते विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.

Loksabha Election 2024: केंद्रीय मंत्री नारायण राणे ठाकरे गटाच्या नेत्याच्या भेटीला

  • केंद्रीय मंत्री नारायण राणे ठाकरे गटाच्या नेत्याच्या भेटीला

  • नारायण राणेंनी माजी आमदार गणपत कदम यांची घेतली भेट

  • राणेंनी विचारपूस केल्याने कदम यांना अश्रू अनावर

  • पाच दिवसांपूर्वी गणपत कदम अपघातात बचावले होते

  • राजापूर मतदारसंघात कदम यांचे वर्चस्व

  • ऐन निवडणुकीत कदम व राणेंच्या भेटीनंतर राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा

Delhi Excise Policy Case: केजरीवाल आणि कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

दिल्लीच्या दारू धोरणाच्या बाबतीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बीआरएस नेते के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वाशीममध्ये 42.2 तापमानाची नोंद

राज्यात अवकाळी पावस जरी होत असला तरी मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे. मुंबईत 33 °C,ठाण्यात 36°C तर वाशीममध्ये 42.2 °C कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

इगतपुरी यार्डमध्ये रेल्वेची मॉकड्रील; कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका!

रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, पूल कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देत असते. सोमवारी मध्य रेल्वेने,इगतपुरी अप यार्डमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल केली.

Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहात गोंधळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहात गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजी आणि चपातीच्या दर्जावरून विद्यार्थ्यांनी काल गोंधळ घातला होता. भाजी-चपाती आंबट लागत असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला. यावेळी भोजनगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील भोजनगृहात सोमवारी विद्यार्थी जेवण करीत होते. यावेळी, चपातीची चव आंबट लागत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी जेवण अर्धवट सोडून ताट तसेच ठेवून निघून गेले. काही विद्यार्थ्यांनी तत्काळ मेसमधील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने दिले विद्यापीठ प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.

सलमान खान गोळीबार प्रकरणी दोन पिस्तूल  शोधण्यात गुन्हे शाखेला आले यश

सलमान खान गोळीबार प्रकरणी तापी नदीतून दोन पिस्तूल , तीन मॅगझिन आणि १३ जिवंत कडतूस जप्त करण्यात आली.दोन दिवसांच्या सर्च ऑपरेशन नंतर हत्यार शोधण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले.

Mumbai Airport: मुंबई विमानतळावरुन २ कोटी ६ लाख प्रवाशांचा विमान प्रवास

मुंबई विमानतळावरुन आर्थिक वर्ष २०२३-२४मध्ये तब्बल ५ कोटी २ लाख प्रवाशांची प्रवास केला आहे. तर या प्रवाशांसाठी ३ लाख २४ हजार ९७२ विमानांचे आगमन आणि उड्डाण झाले आहे.आर्थिक वर्ष २०२२-२३च्या तुलनेत प्रवासी संख्येत १६ टक्यांनी वाढ झाली आहे.

मंत्रालयातून ४७ लाख ६० रूपयांची चोरी

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शासनाच्या शालेय शिक्षणाच्या विभागातून ४७ लाख ६० हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी द्वारे ४ टप्प्यात ४७ लाख ६० हजार रूपये काढल्याची माहिती समोर आली आहे.

Baramati Loksabha: बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला मिळाले तुतारी चिन्ह

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी काल (सोमवारी) उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आली. यावेळी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना तुतारी वाजवणा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर दुसऱ्या एका उमेदवाराला 'तुतारी' हे चिन्ह देण्यात आले आहे.

Nashik Crime News : आयुक्तालय हद्दीत 612 टवाळखोरांविरोधात कारवाई!

आगामी लोकसभा निवडणूक व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली.

Sanjay Raut : अटकेच्या भीतीमुळे फडणवीसांनी शिंदेंवर दबाव टाकला- संजय राऊत

फोन टॅपिंग प्रकरणात अटकेची शक्यता असल्यानेच देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला, असा दावा संजय राऊत यांनी केलाय. दरेकर, फडणवीस, शेलार हे भाजप नेते कायद्यापेक्षा मोठे आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

Nilesh Lanke: निलेश लंके कसलंही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल करणार

शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके कसलंही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नगरमधून त्यांची लढत महायुतीचे सुजय विखे यांच्यासोबत आहे.

'Jail ka Jawaab Vote Se' : दिल्लीची जनता मतदानातून भाजपला उत्तर देईल- आतिषी

दिल्लीची जनता अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला मतदानातून उत्तर देईल असं आपच्या नेत्या आतिषी म्हणाल्या आहेत. त्या 'जेल का जवाब वोट से'संकल्प यात्रेत बोलत होत्या.

Mumbai-Pune expressway: मुंबई- पुणे महामार्गावर दोन तास वाहतूक बंद

पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण महामार्ग आज दोन तास बंद ठेवला जाणार आहे. रस्तेकामामुळे महामार्गावरील वाहतूक दुपारी १२ ते २ या काळात बंद ठेवण्यात येईल.

Amit Shah : अमित शहा यांची आज अकोल्यात सभा

केंद्रीय मंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांची अकोल्यात सभा आहे. ते महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी सभा घेत आहेत.

Sharad Pawar Raigad Sabha : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार शरद पवारांची तोफ; रायगडात आज 'मविआ'ची जाहीर सभा

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये आज शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केलीये.

Sheel Dam Ratnagiri : शीळ धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

शीळ धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे कोंड गावात सोमवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास घडली. तनिष्क अक्षय आंबेकर (वय ८) आणि स्मित वासुदेव आंबेकर (वय ७) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलचा टँकर उलटला

पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झालीये. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे काम सुरू असून या टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावरती सांडलेले आहे.

Latest Marathi News Live Update
Pune Accident: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटला; परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Jyotiba Temple Kolhapur : दख्खनच्या राजाचा आज चैत्रोत्सव, जोतिबा डोंगरावर लाखभर भाविक दाखल

जोतिबा डोंगर : येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज (ता. २३) मुख्य दिवस आहे. यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यंदा यात्रेत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. सुमारे दहा लाखांवर भाविक येतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

Mumbai-Pune Route : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक

Latest Marathi News Live Update : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक असणार आहे, तर उद्धव ठाकरेंची परभणीत आज जाहीर सभा होणार आहे. दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महाआघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारार्थ रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे शरद पवार आज सभा घेणार आहेत. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.