Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा घेणार आहेत.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

मद्य धोरण हा भाजपचाच घोटाळा- केसीआर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी स्वतःच्या मुलीचा बचाव करत हा भाजपचाच घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये तापमान ४७ अंशांवर

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करणार घरुन मतदान

- माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करणार घरुन मतदान

- ⁠घरुन मतदान करण्याकरीता '१२ ड' हा अर्ज/फॅार्म प्रतिभा पाटील यांनी दिला भरुन

- ⁠८५ पेक्षा जास्त वय असलेले नागरीक आणि ४० टक्कयांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या नागरीकांसाठी यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत घरुन मतदान करण्याची सुविधा निवडणुक आयोगाने आणली आहे.

- ⁠त्याअंतर्गत १२ड हा अर्ज भरुन संबधित निवडणुक अधिकार्यांकडे द्यायचा आहे.

- ⁠याच योजनेअंर्तगत प्रतिभा पाटील यांनी घरुन मतदान करण्यासाठी अर्ज दिला आहे.

- ⁠प्रतिभा पाटील यांचे पुणे लोकसभेसाठी मतदान. कोथरुड विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत त्यांचे नाव आहे.

- ⁠प्रतिभा पाटील यांचे ८९ वय. त्यामुळे त्यांना धरुन मतदान करण्याची सुविधा मिळणार

- ⁠निवडणुक अधिकारी घरी जाऊन टपाली मतदानाप्रमाणे त्यांचे मतदान करुन घेणार.

- ⁠या मतदानाचे चित्रिकरण होणार तसेच, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहु शकणार

मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन 

पुन्हा सत्तेत आल्यास भाजप राज्यघटना फेकून देईल, राहुल गांधी यांचा आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी दावा केला की जर भाजप केंद्रात सत्तेत परतला तर ते गरीब, दलित, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना हक्क देणारी राज्यघटना "फाडून टाकेल" आणि "फेकून देईल".

निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम, गिरीश महाजनांसोबतची चर्चा निष्फळ

नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम असल्याची माहिती आहे. गिरीश महाजनांसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याची चर्चा आहे. निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम आहेत. महायुतीकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांचे मत आहे. येत्या दोन दिवसांत महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटेल असा महाजनांचा दावा आहे.

ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

डोंबिवलीतील उध्दव ठाकरे गटातील पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांची दिली. पदाधिकारी मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याची माहिती आहे.

काँग्रेस जनतेची संपत्ती, व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

लातूरमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप केला की, काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटण्याचा कट रचत आहे.

काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून गुजरात पोलिसांनी काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांचे पीए सतीश आणि एका आप कार्यकर्त्यासह दोघांना अटक केली आहे.

सुषमा अंधारे आज पेणमध्ये

रायगड लोकसभा इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ३०) पेण येथील महात्मा गांधी मंदिर येथे संध्याकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

Modi In Dharashiv: अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान मोदी धाराशिवमध्ये सभा घेत आहे. अर्चना पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर मैदानात आहेत.

Crime News: मालवणी विषारी दारूकांडप्रकरणी चौघे दोषी; न्यायालयाचा निर्णय

मालाड-मालवणी येथे आठ वर्षांपूर्वी घडलेल्या विषारी दारूकांड खटल्याचा निकाल आज (ता. २९) सत्र न्यायालयाने जाहीर केला. या हत्याकांडप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्या. स्वप्नील तवशिकर यांनी चौघांना दोषी ठरवून दहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. राजू तापकर, डोनाल्ड पटेल, फ्रान्सिस डिमेलो आणि मन्सूर खान अशी दोषी ठरवलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रज्वल रेवण्णा  स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. रेवण्णा यांचे पक्षातून निलंबन केले आहे.

अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला!

उपनगर पोलिस ठाण्यात ९९ लाखांच्या फसवणुकीसह एमपीआयडी अंतर्गत दाखल गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कटारिया यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे उपनगर पोलिसांकडून कटारिया यांच्या अटकेची शक्यता असून, दुसरीकडे कटारिया यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याचीही शक्यता आहे.

PM modi: तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस येथील सभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का? काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती वाटणार, असं मोदी म्हणालेत.

PM Modi: 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माळशिरस येथे सभा होत आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली. ६० वर्षात जे झालं नाही ते आम्ही करत आहोत, असं ते म्हणाले.

Mumbai News: दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. फॉरच्युनर कार मधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या static surveillance टीमने ही कारवाई केली आहे.

कार चालक कॅश संदर्भात समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने कारवाई १.१४ कोटी रुपये जप्त करण्यात आले. कॅश लालबागच्या बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे. रक्कम मोठी असल्याने निवडणूक आयोगाने आयकर विभागाला माहिती दिली आहे.

Congress: उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून दोन उमेदवारांची चर्चा

उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून दोन उमेदवारांची चर्चा आहे. भूषण पाटलांना उमेदवारी देण्याची अधिक शक्यता आहे. भूषण पाटील यांच्या सह काळू बुधालिया यांच्या नावाची चर्चा आहे. आजच काँग्रेसचा मुंबई उत्तरसाठी उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Pune News: बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

पुणेकरांना आज पुन्हा ट्रॅफिक जामचा मनस्ताप सहन कराला लागला आहे. बाणेर-पाषाण रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ५ मिनिटाच्या प्रवासासाठी १५ मिनिटे लागत आहेत.

केरळमध्ये भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू, 1 जखमी

पुन्नाचेरी, कन्नूर येथे काल रात्री कार आणि लॉरी यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Lok Sabha: उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. जिजाई बंगल्यावर विजय शिवतारे दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुरंदरमध्ये शरद पवारांची सभा झाली होती. याबद्दल आणि इतर विषयांवर चर्चा करण्याकरता अजित पवारांची भेट घेण्यासाठी विजय शिवतारे आले आहेत.

Accident :  लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला

बिहारच्या भागलपूरमध्ये भीषण अपघातीची घटना घडली आहे, लग्नासाठी जात असलेल्या तीन स्कॉर्पिओवर खडीने भरलेला हायवा उलटला. यामुळे भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये 10 वर्षांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. घोघा पोलीस स्टेशन हद्दीतील अमरपूर गावाजवळ NH 80 वर ही घटना घडली आहे.

Odisha Bus Accident : जगतसिंगपूरमध्ये बस उलटून २० हून अधिक प्रवासी जखमी

ओडिशा : जगतसिंगपूर येथे बस उलटल्याने २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Uday Samant : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

कोल्हापूर : ‘छत्रपतींच्या गादीचा अपमान कुणी केला, संभाजीराजेंवर कसा दबाव टाकण्यात आला. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास कुणी भाग पाडले, या सर्वांचा एक मे रोजी कोल्हापुरात पर्दाफाश करणार असल्याचा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. त्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

Latest Marathi News Live Update
Kolhapur Lok Sabha : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला, उमेदवारी मागं घेण्यास कुणी भाग पाडलं? सामंत आज करणार पर्दाफाश

Kolhapur Lok Sabha : गांधी मैदानावर शरद पवार, उद्धव ठाकरेंची उद्या सभा

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी एक मे रोजी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘शिव-शाहू निर्धार’ सभा होत आहे. गांधी मैदानात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या सभेच्या नियोजनाची पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे यांनी सभा यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन केले.

Srinivas Prasad : माजी केंद्रीय मंत्र्याचं निधन; म्हैसूर, चामराजनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

म्हैसूर (कर्नाटक) : कर्नाटक सरकारने भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही श्रीनिवास प्रसाद यांच्या निधनानंतर आज (मंगळवार) राज्यातील म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर केलीये. बंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 77 वर्षांचे होते.

Satara Lok Sabha : जयंत पाटील, अंधारेंची पुसेगावात आज सभा

पुसेगाव : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भव्य जाहीर सभा आयोजिल्याची माहिती खटाव तालुका महाविकास आघाडीने दिली. आज वडूज रस्ता परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेजारील मैदानात सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे.

Heat Wave : महाराष्ट्रातील काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. 30 एप्रिल रोजी राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींची आज माढा, धाराशिव, लातूरमध्ये सभा

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा घेणार आहेत, तर पंचवीस वर्षानंतर वेल्ह्यात शरद पवारांची सभा होणार आहे. त्याचबरोबर ऐन लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात एक मोठं सेक्स स्कँडल उघडकीस आलंय. माजी पंतप्रधान एच डी दैवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांनी तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना १ मे रोजी चौकशीस उपस्थित राहण्यास सांगितलेय. सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आज भव्य जाहीर सभा आयोजिल्याची माहिती खटाव तालुका महाविकास आघाडीने दिली. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.