Latest Marathi News Live Update : दिवसभरातील सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवरती

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

यवतमाळ जिल्ह्याला सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पाऊस, चक्रीवादळाचा तडाखा

यवतमाळ जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाची दुसर्‍या दिवशीही यवतमाळच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस, आर्णी, घाटंजी, झरी-जामणी परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाली आहे.

Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

पुणे : भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीची १४ दिवस बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. आरोपीला देण्यात आलेला जामीन रद्द करावा आणि त्याला सुधारगृहात पाठविण्यात यावे, यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले होते.

Rain Torna Fort : किल्ले तोरणा परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वेल्हे (पुणे) : किल्ले तोरणा परिसरात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. दिवसाआड पडणार्‍या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासून उकाड्याचे रूपांतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसात झाले.

Textile Market Sindhi Bazaar : आग्राच्या सर्वात मोठ्या कापड बाजाराला भीषण आग; दुकानदारांचे कोट्यवधींचे नुकसान

उत्तर प्रदेश : आग्रा येथील सर्वात मोठा कापड बाजार असलेल्या सिंधी बाजारला बुधवारी दुपारी अचानक आग लागली. हळूहळू या आगीमुळे अनेक दुकाने जळून खाक झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र दोन तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. प्रथमदर्शनी आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Kalyani Nagar Accident : कोरेगाव पार्कमधील पब जमीनदोस्त

कल्याणीनगर येथील अपघातामध्ये (Kalyani Nagar Accident) दोघांचा बळी गेल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाला (Pune Municipal Corporation) जाग आली आहे. कोरेगाव पार्क, मुंढवा, घोरपडी, पुणे स्टेशन, विमाननगर येथील एकूण ५४,३०० हजार स्केअर फुटाचे बांधकाम आणि पत्राचे शेड हटविण्यात आले.

Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती धनखर यांनी तेहरानमध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांना वाहिली श्रद्धांजली

उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी तेहरानमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांना श्रद्धांजली वाहिली.

Delhi Police : 'द्वारका'ला बॉम्बचा धोका नाही; दिल्ली पोलिसांकडून स्पष्टीकरण

द्वारकामध्ये बॉम्बचा धोका नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. द्वारका येथील मॉलमधील दुकानाला अपघाती आग लागल्याची घटना घडली, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

महाबळेश्वरातील रुग्णालयाच्या सोयी सुविधांसाठी निधी देणार - राज्यपाल बैस

सातारा : आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात गरजू व गरीब जनतेवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. या रुग्णालयाच्या सोयी सुविधा व औषधांसाठी निधी उपलब्ध करुन देणार, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली.

Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांनी घेतला रेड क्रॉस सोसायटीच्या कार्याचा आढावा

सातारा : रेड क्रॉस सोसायटीच्या पाचगणी येथील रुग्णालयासाठी २८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींनी राज्यपाल रमेश बैस यांचे आभार मानले. महाबळेश्र्वर येथील राजभवन येथे आज रेड क्रॉस सोसायटीच्या प्रतिनिधींसोबत राज्यपाल बैस यांनी बैठक घेतली, त्यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी आभार व्यक्त केले.

Kaveri River : २.५ टीएमसी पाणी तमिळनाडूला सोडा; कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाचे निर्देश

बंगळूर : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने कर्नाटकला तमिळनाडूला २.५ टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले. झालेल्या बैठकीत प्राधिकरणाने मे महिन्यात २.५ टीएमसी गाळ काढण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी कावेरी जल नियंत्रण समितीनेही २.५ टीएमसी पाणी सोडण्याची शिफारस केली होती. राज्याच्या अनेक भागांत पूर्व मॉन्सून बरसत आहे. कोडगूच्या त्रिवेणी संगमात पावसाचा जोर वाढला असून, कावेरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे केआरएस धरणात आवक वाढली आहे.

अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडली! उन्हाचा त्रास झाल्याची माहिती

अभिनेता शाहरुख खानची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उन्हाचा त्रास झाल्यानं त्याला हा त्रास झाल्याची माहिती मिळते आहे.

केंद्रीय गृहमंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी! फोन कॉलनं खळबळ

मविआचे नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

मविआच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर मुंबईत मतदानाच्यादिवशी झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीची तक्रार दाखल केली अन् यावर काय तोगडा काढता येईल याबाबत चर्चा केली.

भुसावळ तापलं! सर्वाधिक 46 डिग्री तापमानाची नोंद

भुसावळमध्ये यंदा महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. या ठिकाणचं तापमान हे ४६ डिग्रीवर पोहोचलं असून नागरिकांची लाही लाही होत आहे.

संभाजीनगरमध्ये १५ जून पर्यंत मोठ्या बांधकामांना बंदी

संभाजीनगरमध्ये १५ जून पर्यंत मोठ्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. इथला पाणी प्रश्न बिकट बनल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये जोरदार वारे अन् खराब हवामान; मच्छिमारांना इशारा

Pune Porsche Accident: पुणे हिट अँड रन प्रकरणात असीम सरोदे यांची हस्तक्षेप याचिका

  • असीम सरोदे यांची हस्तक्षेप याचिका

  • पुणे नायायलायात सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणी असीम सरोदे यांनी केला हस्तक्षेप 

  • या प्रकरणी २ वेगळ्या एफ आय आर का दाखल केल्या? असीम सरोदे यांनी केली याचिका

Pune Porsche Accident: पुणे हिट अँड रन प्रकरणी सरकारी वकीलकांडून युक्तिवाद

सरकारी वकीलकांडून युक्तिवाद

ड्रायव्हरने जबाब दिला आहे की त्याने गाडी चालवायला मागितली होती पण अल्पवयीन तरुणाने तू शेजारी बस असं सांगितलं. गाडीचे रजिस्ट्रेशन झालं नव्हतं मग गाडी रस्त्यावर आलीच कशी?

Pune Porsche Accident: विशाल अग्रवाल यांच्या वकिलाचा युक्तिवाद; आरोपीला पोलीस कोठडीची आवश्यकता नाही

विशाल अगरवाल यांच्या वकिलाचा युक्तिवाद

  • आरोपी फरार नव्हता, ४१ A ची नोटीस दिली नव्हती

  • पुण्यातील ते पब हे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले आहेत पोलिसांनी नाही

  • तिथे जप्त केलेल्या सर्व सामग्री सुरक्षित आहेत

  • आरोपीला पोलीस कोठडी ची आवश्यकता नाही

Pune Porsche Accident: सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली

पुणे हिट अँड रन प्रकरणी सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांची ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली

Pune Porsche Accident: 'साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या, मुरलीधर मोहोळ यांची रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार टीका

  • 'साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या, मुरलीधर मोहोळ यांची रवींद्र धंगेकर यांच्यावर जोरदार टीका

  • मोहोळ आणि धंगेकर हे पुणे लोकसभा निवडणुकीचे प्रमुख दावेदार

  • पुणे हिट अँड रन प्रकरणी धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती

  • यावर उत्तर देताना आता भाजप चे मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत धंगेकर यांना उत्तर दिलंय

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात कोर्ट देणार  साडेचार वाजता निकाल

पुणे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. पोलीस आज मुलाच्या वडिलांना कोर्टात घेऊन जात आहेत.

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क कोर्टाने राखून ठेवला निकाल

पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

Pune Porsche Accident: 'पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागायचा नाही?' अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका

पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागायचा नाही? अशी टीकाअनिल देशमुखांनी फडणवीसांवर केली आहे. त्यांनी Xवर पोस्ट करत म्हटले की, ''देवेंद्रजी काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील... आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली अन् तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला (तो पण रविवारी). देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा''

Pune Post Accident: अल्पवयीन मुलाच्या वकिलांचा युक्तीवाद संपला

पुणे अपघात प्रकरणी बालहक्क न्यायालयात अल्पवयीन आरोपीची सुनावणी होत आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपला युक्तीवाद संपवल्याची माहिती आहे.

Amruta Fadanvis: पुण्यातील अपघाताप्रकरणी अमृता फडणवीस यांचं ट्वीट

पुण्यातील अपघाताप्रकरणी अमृता फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी पीडित कुटुंबाबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. शिवाय आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.

Pune Accident Case: विशाल अग्रवालची पुन्हा पोलिसांकडून चौकशी सुरू

बिल्डर विशाल अग्रवालची पुन्हा पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे. पोलीस विशाल अगरवालला घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. पोलीस आयुक्तालयात कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. पुणे पोलीस विशाल अग्रवालची चौकशी करणार आहेत. साधारणता दुपारी अडीच पर्यंत पुणे पोलीस विशाल अग्रवालला कोर्टासमोर हजर करणार आहेत.

Pune News: पुण्याचा पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बंद

पुण्याचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Raj Thackeray: रोज बॅडमिंटन खेळतो त्यातून 470 कॅलरी कमी होतात- राज ठाकरे

मी रोज बॅडमिंटन खेळतो त्यातून 470 कॅलरी कमी होतात. त्यामुळे मी योग्य मार्गांवर आहे . .लठ्ठपणा आजार आहे हे पालकांना कळायला मार्ग नाही. बाहेरचे फास्ट फूड आल्यावर हे सगळं वाढलंय. जिभेला वाईट ते चांगलं चांगलं ते वाईट असं झालं, असं राज ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

पुणे पोलीस दारू पिल्याचे बिल आणि सीसीटिव्ही कोर्टात सादर करणार आहेत. दुसरीकडे ब्लड रिपोर्ट आलेला नाही. त्यामुळें कोर्ट काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे

Pune Porsche Accident: कल्याणी नगर अपघातातील अल्पवयीन बाल हक्क कोर्टात दाखल

Pune Porsche Accident :  कल्याणी नगर अपघातातील अल्पवयीन बाल हक्क कोर्टात दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन आई देखील कोर्टा आली आहे.

कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर

कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे. 2 अवैध पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे. वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली. नियम न पाळल्याने पालिकेचा कारवाई केल्याचे सांगितले. तर शहरातील इतर सर्व पब आणि बारला देखील पुणे महानगरपालिका नोटीसा पाठवणार आहे.

मतदानासाठी मुंबईत आलेल्या होम गार्ड अन् पोलिसांमध्ये बाचाबाची

मतदानासाठी मुंबईत आलेल्या होम गार्ड अन् पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोप होम गार्डने केला. मतदानाच्या दिवशी बंदोबस्ताकरिता मुंबईत आले असता मतदानानंतर वेळीच घरी जाण्याची सोय न झाल्याने होम गार्ड अस्वस्थ होते. निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

Ujani Dam: उजनी धरणात बुडालेली बोट सापडली, ६ प्रवासी दगावल्याची भीती

उजनी धरणात बुडालेली बोट सापडली आहे. बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली. बोटीतील ६ प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

APP ON BJP : भाजपने हरियाणामधे दिल्लीच पाणी अडवलं, दिल्लीकरांना त्रास देण्याचा प्लॅन;आपचा आरोप

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात षडयंत्र रचल जात आहे. भाजपने स्वाती मालीवाल यांचा उपयोग केला. भाजप दिल्लीच पाणी अडवण्याच षडयंत्र करत आहे. पाणी हरियाणामधे अडवल जात आहे, दिल्लीकरांना त्रास द्यायचा भाजपचा प्लॅन आहे. महागाई, बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त आहे. यावर भाजपचे नेते काहीही बोलत नाहीत, अशी टीका दिल्ली सरकार मंत्री अतिशी यांनी केली आहे.

Mira Bhindar: मिरा-भाईंदरमध्ये शुक्रवारी पाणी कपात

मिरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून बारवी येथे पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यासाठी शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. २३) रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी (ता. २४) रात्री १२ वाजेपर्यंत असा एकूण २४ तासांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

KDMC: कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन शुक्रवारी (ता. २४) घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल

Congress Mla: आमदार पी. एन पाटील यांना अतिदक्षता विभागात हालवले

Congress Mla: आमदार पी. एन पाटील यांना अतिदक्षता विभागात हालवले करवीरचे काँग्रेसच आमदार पी. एन. पाटील त्यांच्या डोक्याला जबर दुखापतही झाली होती. पी. एन. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत.

Mumbai News: सीएसएमटीहून शेवटची कसारा लोकल रात्री १२.१४ वाजता

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेने आजपासून बुधवारी ते शुक्रवारीपर्यत रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला घेण्यात आलेला आहे.या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी - विद्यूतीकरणा संबंधित इंटरलॉकिंग कामे पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. 

Ghatkopar: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर

घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर पोहचला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.

Pune Water Supply: शुक्रवारी पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

देखभाल दुरुस्तीची कामे, विद्युतविषयक कामांमुळे शुक्रवारी (ता. २४) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

Climate: पुढील पाच दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असून, त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे.

SSC Result: 'या' तारखेला जाहिर होऊ शकतो दहावीचा निकाल

नुकतेच राज्यातील बारावीचे निकाल जाहिर झाले आहेत. आता यानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीचे निकाल 27 मे रोजी जाहिर होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Latest Marathi News Live Update : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कारच्या अपघातानंतर, याप्रकरणाशी संबंधित नवनवे खुलासे रोज होत आहेत. दरम्यान या प्रकरणी नागरिकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे सरकारनेही कडक पाऊले उचलत कारवाई केली. दरम्यान येत्या 27 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल लागणार असल्याची माहीती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.