Latest Marathi News Update : दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू, संत्रा पिकांचे मोठे नुकसान झालेय.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान परिसरात वाहतुकीत बदल

पुणे, ता. १० : रमझान ईदनिमित्त गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या परिसरात गुरुवारी (ता. ११) सकाळी सहा ते नमाज पठण होईपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हडपसरकडून गोळीबार मैदानमार्गे स्वारगेटकडे जाणारा रस्ता आणि कोंढव्यातून पुलगेटला जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

"वारंवार खोटे बोलून इतिहास बदलणार नाही"

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची झलक दिसते असे म्हणणाऱ्या भाजपवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, हे जाणून घेतले पाहिजे की, विविध राजकीय व्यासपीठांवर वारंवार खोटे बोलून इतिहास बदलणार नाही.

'ईद-उल-फितर'च्या पूर्वसंध्येला जामा मशिद उजळली

'ईद-उल-फितर' सणाच्या पूर्वसंध्येला जामा मशिदीला रोषणाई करण्यात आली आहे.

PM Modi Live : रामटेक येथे मोदींच्या भाषणाला सुरूवात

रामटेक येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात करताच लोकांनी 'मोदी-मोदी' असा जयघोष केल्याचे पाहायला मिळाले.

पीएम मोदींची रामटेक येथे जाहीर सभा सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील रामटेक येथे जाहीर सभेत भाषणापूर्वी त्यांचा सत्कार केला.

सैनिक शाळांच्या खाजगीकरणाविरोधात काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी सैनिक शाळांचे 'खाजगीकरण' सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे.

सांगलीच्या जागेबाबत पक्षाने विचार करावा- विश्वजीत कदम

सांगली लोकसभेमध्ये काँग्रेसचं वातावरण आहे, सर्व कार्यकर्ते विशाल पाटलांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे पक्षाने अजूनही विचार करावा, असं आवाहन विश्वजीत कदम यांनी केलं आहे.

भाजपने देशामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत- विश्वजीत कदम

भाजपने देशामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये भाजपविरोधात लोक नाराज आहेत, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली

दिल्लीमध्ये जेल का जवाब वोट से... मोहिमेला सुरुवात

दिल्लीमध्ये जेल का जबाव वोट से, अशी मोहीम सुरु झाल्याची माहिती दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि दिल्लीमध्ये प्रचाराला सुरुवात झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

Loksabha Election 2024: निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला जाणार; वसंत मोरेंचे वक्तव्य चर्चेत

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिल्लीला जाणार आहे. निवडून आल्यानंतर शर्मिला ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला जाणार- वसंत मोरे

  • कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुणे शहरात चालेल.

  • भाजपचं चारशे पाच स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

  • माझा फॉर्मुला 30 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल.

  • वसंत मोरे 100% पुणे शहरात आघाडी घेणार.

  • पुणे शहरात ट्राफिक नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनिअर का नाही.

  • पुणे शहरात सगळ्यात मोठा प्रश्न वाहतुकीचा, पाण्याचा, कचऱ्याचा आहे.

  • पुणे शहराचा विकासाची ब्लू प्रिंट माझ्याकडे तयार आहे

Loksabha Election 2024: अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्ली भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केले आंदोलन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्ली भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पोलिसांनी त्यांच्यावर वॉटर कॅननचा वापर केला.

Loksabha Election 2024: एनडीए सरकार 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेवर काम करत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "देशात काँग्रेसचे सरकार असताना राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता आहे? या आधारावर राज्यांमध्ये भेदभाव केला जात होता. मात्र एनडीए सरकार 'सबका साथ, सबका विकास' या संकल्पनेवर काम करत आहे. आम्ही विकसित भारतासाठी तमिळनाडू विकसित केले. म्हणूनच आम्ही गेल्या 10 वर्षांत तामिळनाडूच्या विकासासाठी लाखो आणि करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जानकरांना मराठा आंदोलकांनी प्रचार करण्यापासून रोखलं

महादेव जानकर हे महायुतीतील परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांना मतदारसंघात मराठा आंदोलकांनी प्रचार करण्यापासून रोखल्याची घटना घडली आहे.

सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक

सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. सांगलीची जागा शिवसेनेकडं गेल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या चलबिचल सुरु आहे.

रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच 

जात पडताळणी प्रकरणी काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. त्यांनी हायकोर्टाच्या निकालाविरोधात दाखल केलेली याचिका आज सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली.

सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधातील तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना प्रचार सभेत प्रक्षोभक विधान केलं होतं त्यांच्या या विधानाविरोधात काँग्रेसनं निवडणूक आयोगात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल आयोगानं घेतली आहे, त्यामुळं आता मुनगंटीवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी रामदेव यांनी आज सुप्रीम कोर्टात हजेरी 

Madha Lok Sabha : धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरलं? अकलूजमध्ये हालचालींना वेग..

माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा गेल्या कित्येक दिवसांपासून कायम होता. या सगळ्यात मोहिते पाटलांच्या घरामध्ये बंड होण्याच्या चर्चा सुरू होत्या. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील आता 'राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार' या पक्षात प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

PM Modi in Tamil Nadu : तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा

पंतप्रधान मोदी हे सध्या तामिळनाडूमधील वेल्लोर येथे प्रचारसभा घेत आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, की संयुक्त राष्ट्रांमध्ये देखील मी तमिळ भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरुन संपूर्ण जगाला समजेल की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे.

Rashmi Barve : रश्मी बर्वेंच्या जात पडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जातपडताळणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. कोर्टाला पुढे चार दिवस सुट्टी असल्यामुळे आजच ही सुनावणी पार पडेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

Simon Harris : आयर्लँडला मिळाले आतापर्यंतचे सगळ्यात तरुण पंतप्रधान; मोदींनी केलं अभिनंदन

आयर्लँडचे नवीन पंतप्रधान म्हणून सायमन हॅरिस यांचं नाव घोषित झालं आहे. हे देशाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॅरिस यांचं अभिनंदन केलं आहे.

Nana Patole : भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या गाडीला अपघात

भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या गाडीला अपघात झाल्याचं वृत्त समजत आहे. हा अपघात लहान असून नाना पटोले सुखरुप असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Traffic Update : ठाणे-बेलापूर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी

घणसोली स्टेशन समोरील उड्डाणपुलावर कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल असून वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे.

Sanjay Raut : राज ठाकरेंनी अचानक यू-टर्न घेतलाय, लोक समजून घेतील

राज ठाकरेंच्या भूमिकेवरुन संजय राऊतांनी आज प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंना दिल्लीमध्ये कोणती फाईल दाखवण्यात आली, ज्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच ठाकरेंनी अचानक यू-टर्न घेतला आहे, लोक समजून घेतील असंही ते म्हणाले.

12th Result : बारावीचा निकाल आज जाहीर होणार

बेळगाव : बारावीचा निकाल बुधवारी (ता. १०) जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. एक ते २३ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी विविध केंद्रांवर पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले. तसेच १० एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार शिक्षण खात्याने निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली असून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन शिक्षण खात्याचे अधिकारी निकाल जाहीर करतील. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे.

शरद पवार गटाचे आणखी दोन उमदेवार जाहीर, साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना दिली संधी

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आणखी दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमध्ये रक्षा खडसे विरूध्द श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे.

भाजपकडून आज साताऱ्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर होणार आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील २ ते ३ मतदार संघाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल सह महाराष्ट्रातील उमेदवारांची नाव आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदींची नागपूरच्या कन्हानमध्ये आज सभा, महायुतीच्या उमेदवारांचा करणार प्रचार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नागपूरच्या कन्हानमध्ये सभा होणार आहे. कन्हान नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने रामटेक, नागपूर आणि भंडारा-गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघासाठीची ही मोदींची एकत्रित सभा असणार आहे.

Hatkanangale Lok Sabha : महाविकास आघाडीचा इचलकरंजीत उद्या मेळावा

इचलकरंजी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारार्थ येथील तांबे माळमधील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी दि. ११ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख संजय पवार प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

Chandrahar Patil : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील १६ ला अर्ज भरणार

सांगली : ‘‘शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील मंगळवारी (ता. १६) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत ते अर्ज दाखल करतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित असतील.

Chhattisgarh Accident : छत्तीसगडमध्ये बस खाणीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू

दुर्ग (छत्तीसगड) : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात मंगळवारी बस खाणीत पडून 12 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीये. अधिका-यांनी सांगितले की, कुम्हारी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरी गावाजवळ असणाऱ्या 50 फूट खोल खाणीत बस पडल्याने गाडीतून प्रवास करणाऱ्या अकरा जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 38 जण जखमी झाले.

Latest Marathi News Live Update
Chhattisgarh Bus Accident : दुर्ग जिल्ह्यात 50 फूट खोल खाणीत बस कोसळून 12 जण ठार; 38 प्रवासी जखमी

Weather Update : विदर्भाला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा

पुणे : विदर्भात मंगळवारी (ता. १०) सकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू, संत्रा पिकांचे मोठे नुकसान झाले. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू, लिंबू, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले. खामगाव तालुक्यात गारपीट झाली. मराठवाड्यातही नांदेड, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांत पाऊस झाला आहे.

Sangli Politics : काँग्रेसला सांगलीची जागा न मिळाल्याने विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात

Latest Marathi News Live Update : विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू, संत्रा पिकांचे मोठे नुकसान झालेय. तर चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. केवळ नरेंद्र मोदींसाठी म्हणून आपण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीला पाठिंबा देत आहोत,’’ अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेसला सांगलीची जागा न मिळाल्याने विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याची माहिती आहे. आज याबाबतही बैठक होणार आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.