Latest Marathi News Update : दिवसभरातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर

आज ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Sakal
Updated on

वंचितची पाचवी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली.

वंचित बहुजन आघाडीने अबुल हसन खान यांना मुंबई दक्षिण मध्यमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी त्यांना मुंबई उत्तर मध्यमधून उमेदवारी देण्यात आली होती.

मध्य प्रदेशात अग्नितांडव

मध्य प्रदेशातील गेवासमध्ये मोती बंगला परिसरात आग लागल्याची घटना घडली. यामध्ये सुमारे 4-5 झोपड्या जळून खाक झाल्या.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आग

महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आग लागली.

संदेशखळीतील लोकांना दाखल करता येणार ई-मेलद्वारे तक्रारी 

पश्चिम बंगालच्या संदेशखळीतील लोकांना जमीन हडपल्याच्या तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी सीबीआयने sandeshkhali@cbi.gov.in असा ई-मेल आयडी तयार केला आहे.

"भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात जावेच लागेल"

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात जावेच लागेल आणि ते कोणत्याही धमक्यांनी खचून जाणार नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जयपूर येथील सभेत केले.

"बिहारसाठी ५ वर्षात काय करणार हे सांगावे"

देशात काम झाले पाहिजे. पंतप्रधान बिहारमध्ये येत असतील तर त्यांनी बिहारसाठी ५ वर्षात काय करणार हे सांगावे. यावर चर्चा झाली पाहिजे, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले.

"2014 नंतर अदानींंच्या शेअरच्या किमती वाढू लागल्या"

2014 नंतर अदानींच्या शेअरच्या किमती वाढू लागल्या आणि पुढेही त्या वाढतच राहिल्या कारण अदानी आणि पंतप्रधानांचे चांगले संबंध आहेत, अशी टीका राहुल गांधी गांधी यांनी केली आहे.

महायुतीतील वाद मिटवण्यासाठी सहा सदस्यांची समिती 

महायुतीतील वाद मिटवण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये तिन्ही पक्षांतील प्रत्येकी दोन जणांचा समावेश असणार आहे. हे एकत्रितरित्या परस्परांतील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

अतुल देशमुख यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

कल्याण पश्चिममध्ये ट्रान्सफॉर्मर स्टेशनला मोठी आग

कल्याणच्या बारावे परिसरात एका इलेक्ट्रिकल्स ट्रान्सफॉर्मर स्टेशनला शॉर्टसर्कीटमुळं मोठी आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

बीड जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, गरपीटीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान

दोन दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या अवकाळी पावसानंतर आणि गारपीटीनंतर आता मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यातही गारपीट झाली असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

धैर्यशील मोहिते १४ तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

धैर्यशील मोहिते पाटील १४ तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर १६ एप्रिल रोजी ते माढा लोकसभा मतदारसंघातून मविआचे उमेदवार म्हणून अर्ज भरतील असं सांगितलं जात आहे.

Loksabha Election 2024: देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळत आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेसने शेतकऱ्यांना वाईट परिस्थितीत सोडले. पण भाजप सरकार शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. आज देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळत आहे."

Excise policy case: के कविता यांच्या अडचणी वाढल्या; CBI चौकशी होणार

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी BRS नेत्या के कविता यांना CBI ने अटक केली आहे. आता कविता यांची CBI चौकशी होणार आहे. CBI ने काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. कविता सध्या न्यायालयीन कोठडीत असताना CBI ने ताब्यात घेतल्यामुळे कविता यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कविता यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Loksabha Election 2024: आत्ताचे महाराज खरे वारसदार नाहीत संजय मंडलिक यांच वक्तव्य

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर टीका केली आहे. संजय मंडलिक म्हणाले की, आत्ताचे महाराज खरे वारसदार नाहीत

Rahul Gandhi : मीडियामध्ये गरीबांचे प्रश्न न दाखवणं हा भाजपचा अजेंडा 

काँग्रेस नेते राहुल गांधी आज राजस्थानमध्ये आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले, की भाजपला बेरोजगारी, महागाई या गोष्टींवर बोलायचंंच नाहीये. त्यांचं काम फक्त तुमची दिशाभूल करणं आहे. मागासवर्गीय, शेतकरी आणि गरीबांचे मुद्दे माध्यमांमध्ये दिसू नयेत अशी त्यांची इच्छा आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदींनी गेमर्सची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील टॉप गेमर्सची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वतः काही गेम्स खेळूनही पाहिल्या.

के. कविता यांना सीबीआयने घेतले ताब्यात

दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणामध्ये सीबीआयने बीआरएस नेत्या के. कविता यांना ताब्यात घेतले आहे.

विरोधकांच्या प्रचाराची पातळी घसरली- विनोद तावडे

आरजेडी खासदार मीसा भारती यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, "विरोधकांच्या प्रचाराची पातळी इतकी खालावली आहे की ते पाहून यातना झाल्या.

''लालूजींच्या कन्या आणि आरजेडीच्या मिसाजी म्हणाल्या आहेत. मोदीजींना तुरुंगात टाकले जाईल. भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाईल की नाही हे देशाला ऐकायचे आहे. विरोधकांचा प्रचार अशा पातळीवर आहे की कोणी नेत्यांना तुरुंगात पाठवण्याविषयी बोलत आहे तर कोणी मृत्यूबद्दल बोलत आहे..."

खासदार रामदास तडस यांच्यावर सुनेने केले गंभीर आरोप

वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहे. आपल्याला रॉडने मारहाण केली असून घराबाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं.

Shivsena: अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई यांच्यासह २८ शिवसैनिक निर्दोष

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००५ साली शिवसैनिकांनी त्यांची सभा उधळवून लावल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला. खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई आदींसह सर्व २८ शिवसैनिकांची न्या.राहुल रोकडे यांनी निर्दोष सुटका केली.

Sangli Crime : गणेश मंदिरासमोरच तरुणाचा कोयता, चाकूने भोसकून निर्घृण खून

गजबजलेल्या संस्थानच्या गणेश मंदिराच्या दारात तरुणाचा कोयता, चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. राहुल संजय साळुंखे (वय १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात साळुंखे याचा मित्र तेजस प्रकाश कारंडे (२१, रा. जामवाडी) गंभीर जखमी आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai News: कोण असणार दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार? तीन इच्छुकांकडून प्रचार सुरु

दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न विचाला जावू लागला आहे. कारण तीन इच्छुकांकडून प्रचार सुरु झाला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी आपला प्रचार सुरु केला आहे. असे जरी असले तरी यामुळे महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पहायला मिळत आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे लोकसभा उमेदवार सुरेश म्हात्रे संजय राऊतांच्या भेटीला

भिवंडी लोकसभा मतदार संघाचे लोकसभा उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेश म्हात्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. भिवंडी आणि सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमध्ये मोठी नाराजी असल्याची पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यात सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळू मामा ह्यांची ही संजय राऊतांसोबत दुसरी भेट आहे.

मविआचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा प्रचार दौरा

मविआचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांचा प्रचार दौरा सुरू झाला आहे. शिंदे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जात आहे.

क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक

क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली आहे. हार्दिक आणि त्याच्या भावाला फसवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पार्टनरशिप फर्ममधून ४.३ कोटी रुपये वळवण्याचा आरोप करण्यात आला आहे. २०२१ मध्ये तिघांनी मिळून पॉलिमर व्यवसायात गुंतवणूक केली होती.

मराठवाडा, विदर्भात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता

पुणे : विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस कोसळला; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचा परिणाम पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला असून तापमानात चढ-उतार कायम आहे. कमाल तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळ असले; तरीही खेळत्या हवेमुळे पुणेकरांची उकाड्यापासून सुटका झाली.

सातारा आणि नाशिकच्या जागेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

सातारा आणि नाशिक सगळं होईल आपण काळजी करू नका. कारण त्यांचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या फार्महाऊसवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा

बंगळूर : बिदडीजवळील केतगनहळ्ळी येथील माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या फार्महाऊसवर निवडणूक अधिकाऱ्यांनी छापा टाकून तेथे आयोजित केलेला ‘होस तोडकू’ कार्यक्रम रद्द केला.

Elon Musk : टेस्लाचे सीईओ एलन मस्क भारत दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

टेस्लाचे सीईओ एलन मस्क भारत दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी ते भारतात येणार आहेत. एलन मस्क 22 एप्रिलपासून भारत दौऱ्यावर असतील. मस्क नवी दिल्लीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात.

D. K. Shivakumar : लोकायुक्तांकडून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना नोटीस

बंगळूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेले उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना लोकायुक्तांनी दणका दिला असून बेकायदेशीर मालमत्ता मिळवल्याप्रकरणी बुधवारी नोटीस बजावली आहे. बेकायदेशीर संपत्ती मिळवल्याप्रकरणी राज्य सरकारने सीबीआयचा तपास रद्द केला आणि लोकायुक्त चौकशीचे आदेश दिले.

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा

बेळगाव : प्रसिद्ध सिनेअभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Supreme Court : बाबा रामदेव यांचा माफीनामा फेटाळला

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याच्या प्रकरणात पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याच प्रकरणात ‘पतंजली आयुर्वेद’तर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागण्यात आली होती. मात्र हा माफीनामा स्वीकारण्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारपासून (ता. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडून उद्या (ता. ११) अधिसूचना घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, बेळगावला जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात चिक्कोडी तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येईल.

Congress Undalkar Group : काँग्रेसच्या उंडाळकर गटाची आज महत्त्वाची बैठक

कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंक, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेली फसवणूक या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाच्या कऱ्हाड दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह कुंभारगाव व तांबवे जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आज (गुरुवारी) आयोजन करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या अॅड. उंडाळकर गटाची यापूर्वी तीनवेळा झालेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेली बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Ramadan Eid : आज देशभरात साजरी होणार रमजान ईद

Latest Marathi News Live Update : आज ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड जिल्ह्यात सभा होणार आहे, तर शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच डॉ. मोहन भागवतही आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये काँग्रेसच्या उंडाळकर गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. नागरिकांमध्ये भेदभाव करणारे ३७० कलम आम्ही हटविले आणि ‘एक देश, एक राज्यघटना’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केले, असे उद्‍गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्हानमध्ये काढले. सातारा लोकसभेसाठी आमदार शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.