Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi News Live Update : दिवसभराती ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर....
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

अपक्ष खासदार अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश

लोकसभेतील अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्नाटकातील बेंगळुरू येथे त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

बबनराव घोलप यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. घोलप यांच्या प्रवेशामुळे शिर्डीमध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय.

आमचं सरकार आल्यास महिलांच्या बँक खात्यात एक लाख रुपये- गांधी

आमचं सरकार आल्यास महिलंसाठी नारी न्याय कायदा आणणार असल्याचं राहुल गांधींनी शनिवारी जाहीर केलं. या कायद्यांतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी एक लाख रुपये टाकण्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नायर रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावर आग

नायर रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये PM मोदींचा रोड शो

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. या रोड शोसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित आहेत.

नेपाळमध्ये आंदोलक-पोलिसांमध्ये तुफान राडा

नेपाळ: काठमांडूमध्ये राष्ट्रीय मुक्ती चळवळीचे सदस्य आणि पोलिस यांच्यात एका आंदोलनादरम्यान राडा झाल्याचा प्रकार समोर आला. ते जातीय अस्मितेच्या आधारावर राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

साकीनाका खैराणी रोडवर गुंडेच्या बिझनेस पार्कला मोठी आग

मुंबईतील साकीनाका खैराणी रोडवर गुंडेच्या बिझनेस पार्कला मोठी आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यलये आहेत. ही आग पहिल्या मजल्यावर लागली त्यानंतर ती संपूर्ण इमारतीत पसरल्याचे सांगितले जात आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पाकिस्तानात 4.5 तीव्रतेचा भूकंप!

पाकिस्तानमध्ये आज संध्याकाळी 16:13 वाजता रिश्टर स्केलवर 4.5 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दलची माहिती दिली आहे.

एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये जाणार?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळपर्यंत खडसे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदेंच्या भेटीसाठी हेमंत गोडसे मुंबईला रवाना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी हेमंत गोडसे मुंबईला रवाना झाले आहेत.

विनयभंगाची तक्रार केल्याने दिली जीवे मारण्याची धमकी

लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्याने आरोपीने महिलेचा छळ सुरू केला. तिला ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने घरावर दगडफेक करण्यासह तिच्या बदनामीचाही घाट घातला. या त्रासाला कंटाळून महिलेने पुन्हा पोलिसांत तक्रार दिली.

सायन कोळीवाडा भागात गोळीबार, एकजण जखमी

मुंबईच्या सायन कोळीवाडा भागात गोळीबाराची घटना समोर आली आहे. या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.

बबनराव घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश

शिर्डी लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले बबनराव घोलप आज संध्याकाळी ५ वाजता शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

अश्लील चॅटिंग करणे युवकांच्या आले अंगलट, आरोपींना अटक, कळमेश्वर येथील प्रकार

भावनिकदृष्ट्या अपरिपक्व असलेल्या अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचा मानसिक, शारीरिक छळ करण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी सोशल मीडियाचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्या जात आहे. कळमेश्वर येथे युवकाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अश्लील चॅटिंग करीत तिचे आईवडील आणि बहिणीला जिवानिशी मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे.

नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडून विरोध

नाशिकमधून भुजबळांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला आहे. जर महायुतीनं भुजबळांना उमेदवारी दिली तर त्याविरोधात मराठा समाजाकडून उमेदवार दिला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

संजय शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट; एक तास झाली चर्चा

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांच्यामध्ये तब्बल १ तास चर्चा झाली. आम्ही जुने मित्र आहोत त्यामुळं त्यांची भेट घेतली असंही स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं आहे.

Nagpur विदर्भात उष्णतेची लाट, तापमान ४० अंशांच्या पुढे

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान ४० अंशाच्यावर गेले आहे. दोन दिवस हीट वेवचा अंदाज असून, पहिल्याच दिवशी तापमानाने चाळीशी गाठली आहे.

Amravati: लालगुड्यात पहाटे पाहायला मिळाला दरोड्याचा थरार, नऊ लाखांचा ऐवज केला लंपास

अमरावती शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनीत शुक्रवारी (ता. पाच) पहाटे तीन दरम्यान पाच दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. धारदार चाकूच्या धाकावर घरातील तिघांना बंदी करत तब्बल आठ लाख ५० हजाराचे सोन्याचे दागिने व ४४ हजाराची रोकड लंपास केली.

Kalyan: शिंदेंचा अपप्रचार करून गायकवाडांना जामीन मिळेल, अशा भ्रमात राहु नका

डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अपप्रचार करून गणपत गायकवाड यांना जामीन मिळेल, अशा भ्रमात गायकवाड यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांनी राहू नये, असा इशारा देत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी युतीत घोळ घालणाऱ्या या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी गोपाळ लांडगे यांनी केली आहे.

Mega Block :मुंबईच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ७ मार्च २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

भाजपने पुन्हा वाढवला श्रीकांत शिंदेंचा ताप, कल्याणमधून भाजपचा इशारा

ठाणे पाठोपाठ कल्याण लोकसभा जागेवर भाजपा दावा करत असून या मुद्द्यावरून भाजप व शिवसेनेत धुसफूस सुरू आहे. आताही भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी यांनी कल्याणच्या दाव्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याणची जागा शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंना मिळाली तर भाजपचा एकही कार्यकर्ता काम करणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला असून यासंबंधी एक बैठक देखील कल्याण पूर्वेत पार पडली आहे. यामुळे महायुतील हा वाद पुन्हा एकदा समोर आला असून, आता कल्याणच्या दाव्यावरुन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ताप वाढला असल्याचे बोलले जात आहे. 

Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग वाढवला

पाटण : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे आज सायंकाळी सहा वाजता रिव्हर स्लउईस गेटद्वारे होणारा ५०० क्युसेक विसर्ग वाढवून ९०० क्युसेक करण्यात येणार आला आहे. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० व रिव्हर स्लउईस गेटद्वारे ९०० क्युसेक असा एकूण तीन हजार क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.

Latest Marathi News Live Update
Koyna Dam : 'सांगली पाटबंधारे'कडून मागणी होताच कोयना धरणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवला

नवले पुलाखाली बस-ट्रकचा विचित्र अपघात

पुण्यातील नवले पुलाखाली बस आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला असून यात वाहनांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या अपघातग्रस्त वाहनं रस्त्यातून बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

PM मोदींची सहारनपूरमध्ये आज जाहीर सभा, गाझियाबादमध्ये करणार रोड शो

लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ते सकाळी सहारनपूरमध्ये भाजपला जनसमर्थन मिळवण्यासाठी जाहीर सभेला संबोधित करतील. संध्याकाळी गाझियाबादमध्ये रोड शो होणार आहे. यापूर्वी 31 मार्च रोजी मेरठमध्ये पंतप्रधानांची जाहीर सभा झाली होती.

Board of Education : सीबीएसई ११ वी, १२ वीच्या परीक्षा पद्धतीत होणार बदल

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अकरावी, बारावीच्या परीक्षांमधून आता अभ्यासक्रमातील संकल्पनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये कितपत स्पष्टता आली आहे, हे तपासण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केला जाणार असल्याचे ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले.

Kolhapur Temperature : कोल्हापूरचा पारा चाळीस अंशांवर

कोल्हापूर : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे. कोल्हापूरचा तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियसवर गेला. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहू लागल्या. अंगाला चटके बसणाऱ्या उन्हाच्या झळा बसल्याने काल दुपारपासून सायंकाळपर्यंत शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र होते.

Earthquake in New Jersey : न्यू जर्सीत 4.0 तीव्रतेचा आणखी एक भूकंप

न्यू जर्सीत 4.0 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) नुसार भूकंप 9 किलोमीटर खोलीवर होता, अशी माहिती आहे.

Summer Season : राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा वाढला

Latest Marathi News Live Update : राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पुण्यासह राज्यातील हवामानात शनिवारी (ता. ६) आणि रविवारी (ता. ७) दोन टोकांचे मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. शनिवारी दिवसभर उन्हाच्या तडाख्यासह विदर्भात उष्णतेची लाट असेल; तर रविवारी राज्यातील बहुतेक भागांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलेय. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे काल सायंकाळी सहा वाजता ‘रिव्हर स्लउईस गेट’द्वारे होणारा ५०० क्युसेक विसर्ग वाढवून ९०० क्युसेक करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार-एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्याचबरोबर महायुतीत प्रवेश घेतल्याचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) जागावाटपात मिळाला असल्याची चर्चा शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यात सुरू झाली आहे. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.