Latest Marathi News Update: दिवसभरातील बातम्या वाचा एका क्लिकवर

माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जाहीर सभेला उपस्थित लावली.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

माजी मंत्री केटी रामाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

माजी मंत्री आणि बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांच्याविरोधात हणमाकोंडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर आरोप केल्याप्रकरणी काँग्रेस नेते बाथिनी श्रीनिवास राव यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. काँग्रेस नेत्याने तक्रारीत म्हटले आहे की केटीआरकडून दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत आणि शांतता आणि सुरक्षितता भंग होत आहे. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीवरून केटीआर विरुद्ध शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे

चुकीच्या आधारावर परस्पर माहिती दिल्यास बाल हक्क आयोगाकडून होणार थेट कारवाई

बाल हक्क आयोगाकडून देण्यात आलेल्या आदेश अथवा जारी केलेल्या पत्रांच्या आधारावर कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी अथवा संघटनांच्या प्रतिनिधींनी चुकीचा अर्थ काढून परस्पर माहिती अथवा वृत्त प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेतल्यास अशांवर आयोगाकडून थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठीची माहिती राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अॅड. सुशीबेन शहा यांनी दिली.

क्रिकेटपटू युसूफ पठाण यांची जाहीर सभा

बेरहामपूर मतदारसंघातील टीएमसी उमेदवार, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जाहीर सभेला उपस्थित लावली.

कमलनाथ यांना धक्का

कमलनाथ यांचा बालेकिल्ली असलेल्या छिंदवाडा येथील काँग्रेसचे आमदार कमलेश शाह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे

15 कोटींची देणगी घेतल्याच्या आरोपावर, माजी राज्यपाल कोश्यारी यांचे स्पष्टीकरण

एका शाळेच्या नावावर 15 कोटी रुपयांची देणगी घेतल्याच्या आरोपावर, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, मी महाराष्ट्राचा राज्यपाल होतो आणि सर्वसामान्यांसाठी माझे दरवाजे नेहमीच खुले असायचे. सामाजिक कार्याकडे माझा नेहमीच कल होता.

एके दिवशी मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी माझ्याकडे आला. आम्ही एकमेकांशी बोललो. मी अखिल भारतीय संस्थान विद्या भारती विषयी बोललो. जी भारतभरात २०,००० हून अधिक शाळा चालवते.

नैनितालमध्ये पार्वती प्रेमा जगती सरस्वती विहार आहे, जी गेली 40 वर्षांपासून सुरू आहे आणि एक नामांकित निवासी शाळा आहे. लोकांच्या मागणीनुसार, आणखी शाळा उघडल्या जात आहेत. मी अनंत अंबानी यांना सांगितले की, शाळेसाठीही निधी द्या, ज्याचा फायदा ग्रामीण भागालाही होईल आणि त्यांनंतर त्यांनी १५ कोटी रुपये दिले.

"ते भाजपला मदत करत आहेत" 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अनेक वेळा चर्चा केल्या. PM मोदींना विरोध करणाऱ्यानी आपली मतं विभाजित करू नयेत अशी आमची मनापासून इच्छा आहे कारण त्याचा फायदा PM मोदींना होतो. मला वाटतं जर प्रकाश आंबेडकर MVA मध्ये सामील झाले नाहीत तर ते भाजपला मदत करत आहेत.

युपीत कायद्याचं राज्य राहिलेलं नाही; ओवैसींचं अन्सारीच्या मृत्यूवर भाष्य

अमोल किर्तीकर यांना ईडीचं दुसरं समन्स  

ठाकरे गटाचे मुंबईतील लोकसभेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना ईडीनं दुसरं समन्स पाठवलं आहे.

विजय शिवतरे उद्या घेणार पत्रकार परिषद, स्पष्ट करणार भूमिका

विजय शिवतरे उद्या पत्रकार परिषद घेणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, ते स्पष्ट करणार आहेत.

कल्याणचा उमेदवार उद्या जाहीर होणार

कल्याणचा उमेदवार उद्या जाहीर होणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ठाकरे गटाने ठाण्याचा उमेदवार जाहीर केला आहे. मात्र कल्याणच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता.

हर्षवर्धन पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

शिर्डीची जागा मिळायला पाहिजे होती- रामदास आठवले

महायुतीकडून आम्हाला शिर्डीची जागा मिळायला पाहिजे होती. मी पवारांना भेटलो असतो तर त्यांनी मला जागा दिली असती, असं विधान केलंय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी.

Lok Sabha Election 2024: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून भाजपमध्ये प्रवेश करणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2024: साताऱ्यात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊ: शरद पवार

श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर साताऱ्यात उमेदवार कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे. यातच  शरद पवार यांनी साताऱ्यात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊ अशी माहिती दिली आहे. शशिकांत शिंदे, सुनिल माने आणि बाळासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

Lok Sabha Election : माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकरांच्या सूनेने घेतली फडणवीस यांची भेट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या उद्या मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.


 Lok Sabha Election : काँग्रेस 5 एप्रिल रोजी जारी करणार आपला जाहीरनामा

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस 5 एप्रिल रोजी दिल्लीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध करेल अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यांसंबंधी माहिती दिली आहे.

मुंबईत वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

माजी मनसे नेते वसंत मोरे यांनी व्हीबीएचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत भेट घेतली. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे सोडली असून ते पुण्यातून लोकसभेच्या तिकीटासाठी इच्छुक आहेत.

ग्रीसमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप

5.8 तीव्रतेचा भूकंप ग्रीसला बसला. या भूकंपाचे केंद्र फिलियाट्राच्या 30 किमी उत्तर-पश्चिमेला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भूकंपामुळे किती नुकसान झालं याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणात सर्व 7 आरोपींना दोषी

बसपा आमदार राजू पाल हत्या प्रकरणात सीबीआय न्यायालयाने सर्व 7 आरोपींना दोषी ठरवले. गुन्हेगारी जगतातून राजकारणाकडे वळलेला अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते. लवकरच या प्रकरणात सजा सुनावली जाईल

Lok Sabha Election 2024 : बिहारमध्ये इंडिया आघाडीचं जागावाटप जाहीर;  लालू प्रसाद यादव यांचा RJD ठरला मोठा भाऊ

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत . यादरम्यान आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा केली आहे. पूर्णिया आणि हाजीपूरसह 26 जागांवर RJD आपले उमेदवार उभे करणार आहे. तर किशनगंज, पाटणा साहिबसह 9 जागांवर काँग्रेस आणि 5 जागांवर डाव्या पक्षांचे उमेदवार असणार आहेत.

'केजरीवाल को आशीर्वाद'; व्हॉट्सॲप नंबर जारी करत 'आप'ने सुरू केलं अभियान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले आहे. यावेळी त्यांनी लोकांसाठी व्हॉट्सॲप नंबर जारी केला आहे. आम्ही आजपासून अभियान सुरू करत आहोत - केजरीवाल को आशीर्वाद. तुम्ही या नंबरवर केजरीवाल यांना तुमचे आशीर्वाद आणि प्रार्थना पाठवू शकता... असे सुनीता केजरीवाल म्हणाल्या.

छ. संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत मोठा वाद

छ. संभाजी नगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत मोठा वाद पाहायला मिळाला. यावेळी बैठकीत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.

रिलायन्सने खरेदी केले अदानी पॉवरचे 5 कोटी शेअर्स

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गौतम अदानी यांच्या मध्य प्रदेशातील पॉवर प्रोजेक्टमध्ये 26 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात पहिल्यांदाच व्यावसायिक भागिदारी झाली आहे.

Sharad Pawar : शरद पवार आज सातारा दौऱ्यावर 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर जात आहे.

कल्याण आणि ठाण्याची जागा आम्हीच जिंकणार - संजय राऊत 

कल्याण आणि ठाण्याची जागा आम्हीच जिंकणार आहोत असा विश्वास शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पालघरची जागा पण आम्हीच जिंकू असेही सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये टॅक्सी दरीत कोसळली

जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Khanapur Ghat : खानापूर घाटमाथ्यावर उष्णतेची लाट

खानापूर : नेहमी थंड असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर सध्या उष्णतेची लाट आली आहे. काल सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळपर्यंत तीव्र उन्हाळा जाणवत आहे. आज उष्णतेचा पारा ३८ अंशावर गेला. यामुळे उष्ण हवा होती. याचा परिणाम शेती व दैनंदिन जीवनावर चांगलाच झाला आहे.

Satej Patil : प्रदेश काँग्रेस प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती अध्यक्षपदी सतेज पाटील

कोल्हापूरः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रसिद्धी आणि प्रकाशन समिती अध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने महाराष्ट्रासाठी २३ सदस्यांची समिती बनविण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. गुरुवारी या समिताची आणि अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली.

जन्मभूमी एक्स्प्रेसमधील प्रवाशाकडून 30 किलो गांजा जप्त, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

आंध्र प्रदेश : रेल्वे सुरक्षा दलाने आज जन्मभूमी एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाकडून 16 किलो गांजा जप्त केला. बॅगेत 30 किलो गांजा सापडला असून हा गांजा विशाखापट्टणम येथून विजयवाडामार्गे दिल्लीला नेला जात असल्याचं आढळून आलं.

Lok Sabha Elections : दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात १३ राज्यांमधील ८९ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे.

Tamil Nadu Rain : तामिळनाडूत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

सध्या देशातील वातावरणात बदल पहायला मिळत असून तामिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये पुन्हा ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप

आज (शुक्रवारी) पहाटे ५.११ वाजता अफगाणिस्तानमध्ये ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप जमिनीपासून 110 किमी खालीवर होता.

कडेकोट बंदोबस्तात मुख्तार अन्सारीचा मृतदेह पोहोचला शवागारात

मुख्तार अन्सारीचा मृतदेह शवागारगृहात पोहोचला आहे. कडेकोट बंदोबस्तात मुख्तारचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या शवागारगृहात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. 5 डॉक्टरांच्या समितीद्वारे शवविच्छेदन केले जाईल.

माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांचा तुरुंगवास

बनासकांठा (गुजरात) : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने ही शिक्षा जाहीर केलीये. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील सत्र न्यायालयाने बुधवारी माजी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी संजीव भट्ट यांना 1996 च्या खटल्यात दोषी ठरवले.

कोल्हापूर विमानतळावर उभारलेले नवे टर्मिनल भवन आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार

शाहू नाका : कोल्हापूर विमानतळावर उभारलेले नवे टर्मिनल भवन आज (ता. २९) पासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. प्रशासनाने काल दिवसभर याबाबतचे नियोजन पूर्ण केले. कोल्हापूरच्या वैभवशाली परंपरेत भर घालणाऱ्या या टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा मार्चला ऑनलाईन पद्धतीने उद्‍घाटनाने झाले होते.

Gangster Mukhtar Ansari Dies : कुख्यात गँगस्टर-राजकीय नेता मुख्तार अन्सारीचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू

Latest Marathi News Live Update : तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारीचा तीव्र हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. समाजवादी पार्टीनं ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचं वृत्त दिलंय. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीची मुदत सत्र न्यायालयालयाने येत्या १ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तसेच लष्कर भरतीसाठीच्या बहुचर्चित ‘अग्निवीर’ योजनेमध्ये गरज भासल्यास सुधारणा करण्याची तयारी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दर्शविलीये. कोल्हापूर विमानतळावर उभारलेले नवे टर्मिनल भवन आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. शिंदे गटाने लोकसभेसाठी आठ उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच देशातील विविध राज्यांत वातावरणात बदल जाणवत असून काही ठिकाणी पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.