मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवस्थान वर्षा येथे दाखल झाले आहे. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराव चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज पुढील ३ तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
"अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. जागतिक हितासाठी भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे," असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी वाराणसी येथे #PMKISAN योजनेचा 17 वा हप्ता जारी करणार आहेत.
भाईंदरमध्ये दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सिलीगुडीतील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेजला भेट दिली आणि कांचनगंगा एक्सप्रेस ट्रेन अपघातातील जखमींची भेट घेतली.
नागपूर शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला असून दिवसा काळोख दाटल्यानं वाहनांचे दिवे लावावे लागल्याचे पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसान विना छत्री निघाल्याने नागरिकांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले.
नागपूरात विजांचा कडकडाटसह जोरदार पावसाला जोरदार सुरवात झाली असून हवामान विभागकडून यलो अलर्ट देण्यात आला होता. हा मॉन्सूनचा पाऊस नसून लोकल परिस्थिती मुळे तयार झालेले पाऊस आहे. हवामान विभागाचा माहितीनुसार मॉन्सूनला पोषक वातावरण तयार झाले नसल्यानं अजून पूर्व विदर्भात मॉन्सूनचा पाऊस नाही. नागपुरात मागील काही दिवसांपासून 41 अंशाचा घरात तापमान होते, आज झालेला पाऊस हा नक्कीच उकाड्यापासून दिलासा देणारा आहे..
बहुप्रतिक्षित असलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या दोन महिन्यात रेल्वे रुळावर धावणार आहे. ऑगस्ट महिन्यात वंदे भारत ट्रेनची स्लीपर ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे. यशस्वी चाचणीनंतर देशाची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली ते मुंबई दरम्यान धावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून नियोजन सुद्धा सुरु झाले असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळला दिली.
भाजपची उद्या दिल्लीमध्ये कोर कमिटीची होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस आमित शहांची भेट घेवू शकतात.
ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर : भडकाऊ रिल्स बनवणाऱ्या टोळ्यांवर कोल्हापूर पोलिसांची करडी नजर असणार आहे. एकमेकांना धमकवणारे रिल्स टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात विशेष मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिल्स बनवणाऱ्या गुन्हेगारांवर सायबर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. जिल्ह्यात आजपासून भडकाऊ रिलीज करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2024 रोजी वाराणसी येथे PM-KISAN योजनेचा 17 वा हप्ता जारी करतील, ज्यामध्ये 9.26 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे लाभ मिळतील. पॅरा एक्स्टेंशन वर्कर्स म्हणून काम करण्यासाठी कृषी सखी म्हणून प्रशिक्षित झालेल्या 30,000 हून अधिक बचत गटांनाही पंतप्रधान प्रमाणपत्रांचे वितरण करतील.
दिल्लीत सध्या प्रचंड पाणी टंचाई असून इथं महाराष्ट्र सदनातही त्याचा फटका बसला आहे. या ठिकाणी अधिकारी वर्गाला बिसलेरीच्या पाण्यानं आंघोळ करावी लागत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अश्विनी वैष्णव आणि भुपेंद्र यादव यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या हालचाली आता वेगानं सुरु झाल्या आहेत.
आषाढी वारीसाठी 'शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने'नं घेतला पुढाकार घेतला असून १० पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पंढरपूरच्या पुजेचा मान दिला आहे. साम टीव्हीनं आपल्या सुत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.
वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मुलभूत सुविधांचं वाटप शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेद्वारे दिल्या जाणार आहेत. या वारीत १०० ते १५० अध्यात्मिक सेनेचे सेवेकरी वारकऱ्यांची सेवा करणार आहेत. यावेळी निवारा शेड उभारणार, औषध उपचार, छत्री इतर सर्व मूलभूत गरजांचीही व्यवस्था केली जाणार आहे.
त्याचबरोबर वारकऱ्यांना कापडी बुट व पायाची मसाज करण्यासाठी विशेष उपकरणं हाताळणारी १० व्यक्तींची टीम तैनात असणार आहे.
दार्जिलिंग ट्रेन अपघातावर रेल्वे बोर्डच्या अध्यक्षा जया वर्मा सिन्हा यांची पत्रकार परिषद घेतली.
बचावकार्य पूर्ण झाल आहे. पाच प्रवासी आणि तीन रेल्वे कर्मचारी यांचा मृत्यू झाला.... एकूण 8 लोकांचा आतापर्यंत अपघातात मृत्यू झाला आहे.
पन्नास लोक जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिग्नल कडे दुर्लक्ष झालं अशी प्राथमिक माहिती समोर आली.
मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमध्ये 5.38 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईला 20 ते 22 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईत पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.
अप्पर वैतरणा आणि भातसा जलाशयात शून्य टक्के पाणीसाठा
कोणत्या जलाशयात किती पाणीसाठा उपलब्ध-
अप्पर वैतरणा -0 टक्के
मोडक सागर - 15.73 टक्के
तानसा - 22.05 टक्के
मध्य वैतरणा - 9.64 टक्के
भातसा - 0 टक्के
विहार - 17.92 टक्के
तुळसी- 24.46 टक्के
आज जलाशयात म्हणून एकूण 77,851 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होतो. यामध्ये दहा ते पंधरा टक्के पाणी कपात सध्या करण्यात आली आहे
लोकसभेत राष्ट्रवादीने मोठ मन दाखवून सेनेला जास्त जागा दिल्या. आता विधानसभेत मविआने राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात. आमचे ८५ आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे… त्यासाठी काम करु द्यावे. जागावाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, असे रोहित पवार म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट केले की, "पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झालेल्या रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीचे वृत्त अत्यंत दुःखदायक आहे. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि मदत यशस्वी होण्यासाठी प्रार्थना करते
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तातडीने पश्चिम बंगालला रवाना झाले आहेत. दार्जिलिंग मधील घटना स्थळाला भेट देणार आहेत. अपघात स्थळाची पाहणी करणार आहेत. जखमींची रुग्णालयात जाऊन घेणार भेट घेणार आहेत.
NFR झोनमध्ये दुर्दैवी अपघात झाला आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, NDRF आणि SDRF जवळच्या समन्वयाने काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील रुईधासा येथे कांचनजंगा एक्स्प्रेस ट्रेनने मालगाडीने धडक दिल्यानंतर सियालदह पूर्व रेल्वेने रंगपाणी स्थानकावर नियंत्रण डेस्क उभारला. वरिष्ठ तिकीट कलेक्टर, राजू प्रसाद यादव म्हणाले, "आम्हाला अद्याप कोणताही फोन आलेला नाही. दोन महिला चौकशीसाठी आल्या होत्या..."
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात ट्रेनचा अपघात झाल्याची घटना घडली. मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरून अपघात झाला. मालगाडीने धडक दिल्याने आग लागल्याची माहिती मिळत आहे. बचाव कार्यासाठी आपत्ती पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आज संध्याकाळी 4 वाजता होणार बैठक मणिपूरचे मुख्यमंत्री आणि मणिपूर पोलीस दलातील उच्च अधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत. कालच राज्यपाल अनुसया उईके यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व
राज्यभरात मुस्लिम बांधवांकडून ईद उत्सव साजरा केला जात आहे. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळ मात्र काहीसे तणावाचे वातावरण पहायला मिळाले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिंदे व ठाकरे गटात विभागली गेली असली तरी गेल्या 38 वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनासाठी दोन्ही गट एकत्र आल्याचे दिसून आले. आंदोलन दरम्यान काही शिवसैनिकांनी बॅरिकेट्स ओलांडून किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
मुसळधार पावसामुळे गुवाहाटीतील अनिल नगर आणि चांदमारी भागात रस्त्यावर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (IMD) गुवाहाटीमध्ये या संपूर्ण आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकने प्रत्यार्पण केले आहे. फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन्सच्या वेबसाइटनुसार, गुप्ता यांना अमेरिकेला पाठवण्यात आले आहे. अमेरिकन प्रशासनाच्या विनंतीवरून निखिल गुप्ताला गेल्या वर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली होती. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग बन्नूच्या हत्येचा कट रचण्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे.
कोलकाता पोलिसांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या पुतण्याविरुद्ध गुन्हेगारी कट आणि बलात्काराच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. एका ओडिसा डान्सरनं राज्यपाल आणि त्यांच्या पुतण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जानेवारी 2023 मध्ये दिल्लीतील एका हॉटेलमध्ये तिचं शोषण झाल्याचं तिनं म्हटलंय.
कल्याणमधील लालचौकी परिसरात ठाकरे गटाकडून घंटा नाद आंदोलन केले जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर, दुसरीकडं ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी घंटा वाजवत आंदोलनाला सुरवात केलीये. दरवर्षी बकरी ईदच्या दिवशी समस्त हिंदूंची अस्मिता जपण्यासाठी.. हिंदू भाविकांवरील अन्यायाविरोधात हिंदू बांधवांना दुर्गाडी देवीच्या मंदिरात प्रवेश बंदी घालण्यात येते, त्यामुळे हे आंदोलन करण्यात येते.
वाई : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे व माहिती देऊन बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेने कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतरांविरोधात सीबीआयकडे केली होती. त्यानुसार याबाबतचा गुन्हा सीबीआयकडे पुणे येथे नोंदविण्यात आला आहे. इथे क्लिक करा
दिल्ली : भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ईदनिमित्त दर्गाह पंजा शरीफ येथे नमाज अदा केली.
जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २२ व २३ जूनला बारामतीत होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे चिंतन आणि शेतकरी प्रश्नांवर आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे.
उष्णतेचा कहर केवळ भारताच्या उत्तर-पश्चिम भागातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळत आहे. सौदी अरेबियात हज यात्रेसाठी आलेल्या 19 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यंदा तापमानात मोठी वाढ झाली असून उष्णतेने कहर केला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नृसिंहवाडी : महापूर येऊ नये म्हणून अद्याप महाराष्ट्र पूरनियंत्रण समिती नाही ही बाब खेदजनक आहे. अलमट्टी धरणाबरोबर हिप्परगे बॅरेजही (बंधारा) महापुरासाठी कारणीभूत आहे, असा सूर येथे पूर परिषदेत व्यक्त झाला. यावेळी विविध दहा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आले. आंदोलन अंकुश, कृष्णा महापूर नियंत्रण समिती व स्पंदन प्रतिष्ठानतर्फे तिसरी पूर परिषद येथील विठ्ठल मंदिर परिसरात झाली.
Latest Marathi Live Updates : महाराष्ट्रात आल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या सहा दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झाली नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली. तर, राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ‘एमएचटी-सीईटी-२०२४’चा निकाल आज जाहीर झाला आहे. ‘ईव्हीएम’ हॅक करणे शक्य असल्याने त्याचा वापर बंद करण्याची गरज उद्योगपती एलॉन मस्क यांनी व्यक्त केलीये. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.