Latest Marathi Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

मुंबईसह कोकण पट्ट्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

CM Shinde : त्यांनी बाळासाहेबांचे विचार बाजूला सारले- मुख्यमंत्री

महायुतीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'त्यांची' वरून फाxx आहे. याला उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, यावरून कळून येतो की यांची भाषा कशी काँग्रेसची झालेली आहे. बाळासाहेबांचे विचार तर बाजूला ठेवलेलेच आहेत मात्र आता काँग्रेसची भाषाही ते वापरायला लागले आहेत.

Eknath Shide : आपण गाफील राहीलो आता अस चालणार नाही- एकनाथ शिंदे

लोकसभेत आपण गाफील राहीलो विधानसभेत अस चालणार नाही कामाला लागा असे एकनाथ शिंदे म्हणाले

Eknath Shide : ते जिंकले तर EVM चांगले हारले तर EVM वाईट- एकनाथ शिंदे

ते जिंकले तर EVM चांगले हारले तर EVM वाईट, असे आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले.

हा एकनाथ शिंदे संपणार नाही

हा एकनाथ शिंदे संपणार नाही माझ्या सोबत शिवसैनीक आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Uddhav Thackeray: ...तर मी आतंकवादी आहे- उद्वव ठाकरे

जर लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणे आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे असे उध्दव ठाकरे म्हणाले.

मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना धन्यवाद : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  शिवसेनेच्या वतीने सर्व देशभक्त मतदारांना मविआला मतदान करणाऱ्या सर्व देशभक्तांना धन्यवाद देतो असे ठाकरे म्हणाले.

Shivsena: शिवसेना संपणार नाही-संजय राऊत

शिवसेना संपणार नाही ती कोणी संपवू शकत नाही असे संजय राऊत

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर नाशिक शहरात जोरदार पावसाची हजेरी लावली

Shivsena Vardhapan Din 2024 : उद्धव ठाकरे वर्धापन दिन मेळाव्या ठिकाणी पोहोचले

उद्धव ठाकरे वर्धापन दिना निमित्त षण्मुखानंद सभागृहात पोहोचले आहेत

दिल्लीत केक बनवण्याच्या युनिटला आग! अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीतील बदली परिसरात केक बनवणाऱ्या युनिटला आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिल्ली अग्निशमन सेवेकडून देण्यात आली आहे.

PM Modi Live : पीएम मोदी लवकरत जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी 20 आणि 21 जून रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत, जिथे ते 1,500 कोटी रुपयांच्या 84 मोठ्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.

Narayan Rane Live : नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले.... विनायक राऊतांची निवडणूक आयोगाला नोटीस

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, याबाबतची कायदेशीर नोटीस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्या मार्फत पाठवलेली आहे.

lonavala News Live: लोणावळ्यात अवजड वाहनांना प्रवेश बंदी

लोणावळ्यामध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाढलेले अपघात आणि पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

Lakshaman Hake Live: २०० गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना

राज्यसभरात ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. २०० गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला आहे. याठिकाणी लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत.

MPSC Live: सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आणि इतर मागास वर्ग आरक्षणासह MPSC चे सुधारित शुध्दीपत्रक प्रसिद्ध

एमपीएससीच्या माहितीनुसार, जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट अ संवर्गाकरीता सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व इतर मागास वर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

OBC Agitation Live: अंबडमध्ये महामार्गावर टायर जाळले; OBC आंदोलक आक्रमक

अंबडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी ओबीसी आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंबडमध्ये धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता-रोको करून टायर जाळण्यात आला आहे.

Amol Mitkari: सुनील तटकरेंनी अमोल मिटकरींचे कान टोचले!

भाजपने अजित पवारांना टार्गेट केलेलं नाही. त्यांनी माहिती घेऊन बोलावं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमोल मिटकरी यांचे कान टोकले आहेत.

Bachchu Kadu Live: मनोज जरांगे आणि छगन भुजबळांनी एकत्र यावं- बच्चू कडू

मनोज जरांगे आणि छगन भुजबळांनी एकत्र यावं अशी इच्छा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. यावर दोन्ही नेते कशी प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.

Lakshaman Hake Live: मनोज जरागेंची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही; लक्ष्मण हाके

मनोज जरागेंची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. लक्ष्मण हाके ओबीसीच्या मुद्द्यावरुन उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Pune Live News: जवानांचे जनता वसाहत कॅनल भागात रेस्क्यू ऑपरेशन

जनता वसाहत कॅनलच्या समोरील सीमा भिंतीच्या मागील बाजूस अंदाजे 15 ते 20 फूट खोल खड्ड्यात संदीप गणपत शिगवण वय अंदाजे 45 हे इसम जखमी अवस्थेत पडले होते. घटनास्थळी दलाच्या जवानांनी पाहणी करून सदर इसमास स्ट्रेचर व रोपच्या सहाय्याने बांधून रेस्क्यू केले तसेच सदर जखमी इसमास पोलिसांच्या ताब्यात देऊन ॲम्बुलन्सच्या साह्याने पुढील वैद्यकीय उपचाराकरिता ॲम्बुलन्स मधून रवाना करण्यात आले.

Dalai Lama: दलाई लामा यांनी यूएस काँग्रेसच्या शिष्टमंडळाची घेतली भेट

दलाई लामा यांनी आज धर्मशाला येथील त्यांच्या निवासस्थानी यूएस काँग्रेसचे सदस्य मायकल मॅकॉल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय यूएस काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि संवाद साधला.

Shruti Choudhry: माजी काँग्रेस नेत्या किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, हरियाणाच्या माजी काँग्रेस नेत्या किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी म्हणाल्या, "मी पंतप्रधानांकडून प्रेरित आहे, ज्यांनी देशाच्या कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आणि भारताचे नाव जगभरात चमकवले.''

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी, त्यांची बहीण आणि पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले. राहुल गांधी आज 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

PM Modi: PM मोदी आज 1600 वर्ष जुन्या नालंदा युनिव्हर्सिटीच्या नवीन कॅम्पसचे करणार उद्घाटन

नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील राजगीरमध्ये पोहोचले आहेत. नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनासाठी आयोजित या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह १७ देशांचे राजदूत सहभागी होत आहेत.

OBC Reservation: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. आज विरोधी पक्ष नेते विजय वडट्टीवर हाके यांची भेट घेणार आहे. तर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील भेट घेणार आहे.

शिवसेनेच्या स्थापनादिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाचे आज शक्तिप्रदर्शन

शिवसेना आज 58 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. दोन भागात विभागलेले शिवसेनेचे दोन्ही गट (ठाकरे गट आणि शिंदे गट) आज राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता उद्धव गटाकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट मुंबईतील वरळी येथे कार्यक्रम आयोजित करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी ५ वाजता नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

Police Bharti 2024 : राज्यभरात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात

राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती आजपासून सुरू होतेय. यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. दरम्यान, या मेगा भरतीसाठी पुणे पोलिसांनी देखील तयारी केली आहे. पुण्यात पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, कारागृह विभागातील १ हजार २१९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या जागांसाठी तब्बल १ लाख ८१ हजार ७६९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पुण्यात भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे.

Paithan : नृत्यगणांचे नृत्य बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या वाहनांवर दगडफेक

पैठण तालुका (Paithan Taluka) हा संताची भूमी म्हणून राज्यात नव्हे, तर देशात प्रसिध्द असताना या तालुक्यातील हिरापूर-थापटी तांडा ग्रामपंचायत हद्दीतील धुळे-सोलापूर महामार्गावरील (Dhule-Solapur Highway) देवगाव फाटा इथं सुरु झालेल्या कुलस्वामिनी कला केंद्रावर नृत्यगणांचे नृत्य बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या वाहनांवर मंगळवारी (ता. १८) साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी सात ते आठ वाहनांच्या काचा फोडून कारची मोडतोड केल्याची घटना घडलीये.

Jalgaon News : जळगावच्या चोपडा तालुक्यात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा

पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडलीये. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इथे क्लिक करा

Election Commission : विधानपरिषदेसाठी १२ जुलै रोजी मतदान

मुंबई : निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीची आज घोषणा केली. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होईल त्याच दिवशी निकालही जाहीर करण्यात येईल. या निवडणुकीसाठी येत्या २५ जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांना दोन जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्जांची छाननी तीन जुलै रोजी केली जाईल तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज पाच जुलैपर्यंत मागे घेता येईल असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ महामार्ग १२ जुलै पर्यंत रद्द करा'

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग करा, अशी कोणाची मागणी नाही. सामान्य माणसाला या महामार्गाचा फायदा नाही. केवळ कंत्राटदारांना लाभ व्हावा यासाठी राज्य सरकार ६५ हजार कोटींचा चुराडा करणार आहे. शेतकऱ्यांची जमीन महामार्गासाठी गेल्याने भूमिहीन शेतकरी उद्‌ध्वस्त होईल. म्हणून सरकारने १२ जुलै पर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे दिलाय.

High Court : भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन मंजूर

बंगळूर : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या अत्याचार पीडितेच्या कथित अपहरणप्रकरणी उच्च न्यायालयाने भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आमदार एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी भवानी रेवण्णा यांनी सादर केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या एकल सदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने आता जामीन मंजूर केला आहे. भवानी रेवण्णा यांनी म्हैसूर, हसन जिल्ह्यात प्रवेश करू नये, असा आदेश एकल सदस्यीय खंडपीठाने जारी केला आहे. मात्र, विशेष तपास पथक (एसआयटी) त्यांना या जिल्ह्यांमध्ये तपासासाठी घेऊन जाऊ शकते, असेही त्यात म्हटले आहे.

PM मोदी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं आज करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 जून) बिहारमधील राजगीर येथील प्राचीन नालंदा विद्यापीठाजवळील नालंदी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन करणार आहेत. प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या काळात श्रीलंका, थायलंड, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया या बौद्ध धर्माच्या अनुषंगाने प्रमुख देशांमध्ये भारताप्रती सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या विद्यापीठाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

Kiran Chaudhary : हरियाणातील काँग्रेस आमदार किरण चौधरी आज भाजपात प्रवेश करणार

नवी दिल्ली : हरियाणातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार किरण चौधरी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी श्रुती चौधरीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. कालच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पक्षाचा राजीनामा सोपवला आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता चौधरी यांचा भाजप प्रवेश महत्वाचा ठरणार आहे.

Weather Update : मुंबईसह कोकण पट्ट्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज

Latest Marathi Live Updates : मुंबईसह कोकण पट्ट्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. तसेच शिवसेनेचा आज स्थापना दिवस असून शिंदे गट आणि ठाकरे गटाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली. निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होईल, त्याच दिवशी निकालही जाहीर करण्यात येईल. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.