Maharashtra News Updates : हाथरसमध्ये मृत्यूतांडव तर महाराष्ट्र विधानसभा गाजली, दिवसभरात काय घडलं?

Breaking Marathi News Updates 2 July 2024: लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलीये.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live Update Esakal
Updated on

hathras stampede: बैलगाडा शर्यतीतील वादातून जीव गमवावा लागलेल्या निंबाळकर कुटूंबाला मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा हात

मुंबई :- पुणे जिल्ह्यातील निंबुत गावात बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या 'सुंदर' बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांना आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाखांची आर्थिक मदत करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून या शेतकरी कुटूंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

हाथरसची घटना तासाभरापूर्वी कळली तरी मोदी बोलले नाहीत - अमर काळे

हाथरस घटनेबाबत खासदार अमर काळे यांचा गंभीर आरोप. आधी चिठ्ठी येऊन देखील मोदी १ तासानं चेंगराचेंगरीच्या घटनेवर बोलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ; 'या' अटी केल्या शिथील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा प्रतिसाद पाहता. या योजनेला आता सरकारनं दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता १५ सप्टेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तसंच यातील काही अटी देखील शिथिल करण्यात आल्या आहेत. यामध्ये डोमोसाईलचा पर्याय काढून टाकण्यात आला आहे. तसंच ज्यांच्याकडं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही. तसंच या योजनेची वयोमर्यादा ६० वरुन ६५ करण्यात आली आहे.

Sangli Live : पलूसमध्ये पोषण आहारात आढळला मृत साप

पलूस येथे माता-बालक पोषण आहारात आढळला चक्क मृत वाळा साप. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आला होता आहार. पलूस येथील अंगणवाडीमधून वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात सापडला मृत वाळा साप. डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणाऱ्या पॅकेटमध्ये आढळून आला वाळा साप. गर्भवती माता व सहा महिने ते तीन वर्षे लहान बालकांना शासनाच्यावतीने देण्यात येतो पोषण आहार. पोषण आहारात वाढ सापडल्याने आंगणवाडी सेविकांना आहार वाटप न करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील एकाच ठेकेदाराकडं पोषण आहार वाटप करण्याची जबाबदारी आहे.

Mumbai Live : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५ कोटींचा गांजा जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५.३४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) ही कारवाई केली. बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून सुरू होती गांजाची तस्करी. एनडीपीएस कायद्याअंतर्गत गांजाची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत पाच कोटी रुपये असल्याचा दावा डीआरआयनं केला आहे.

Mumbai Live : मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न, महिलेनं हाताची कापली नस

एका महिलेनं मुख्यमंत्र्यांना विधानभवनात भेटण्याचा प्रयत्न केला. भेट होऊ शकत नसल्यानं या महिलेनं आपल्या हाताची नस कापून घेतली. वैयक्तिक कारणांमुळं ही महिला त्रासलेली होती, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भेटून तिला आपली व्यथा मांडायची होती.

Vidhan Parishad Election Live : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १४ उमेदवारांनी भरला अर्ज

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १४ उमेदवारांनी अर्ज भरला आहे. भाजपकडून ५, शिंदे गट २, अजित पवार गटाकडून २, ठाकरे गटाकडून १, काँग्रेसकडून १, शरद पवार गटाचा जयंत पाटील यांना पाठिंबा आणि दोन अपक्षांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अरुण जगताप आणि अजय सिंह सेंगार ह्या अपक्षांनी देखील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणते तीन उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूण १४ उमेदवार असल्याने सध्या कोणत्याही परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

Kolhapur Crime Live : कोल्हापूरच्या पुरातन कात्यायनी मंदिरात चोरी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुरातन कात्यायनी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये साडेतीन लाख रुपयांची पाच किलो वजनाची चांदीची नक्षीकाम केलेली प्रभावळ चोरीला गेली आहे. मंदिराचे पुजारी रामचंद्र विष्णू गुरव यांची पोलिसात तक्रार दिली आहे. यानंतर करवीर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत चोरी केली. अज्ञात चोरट्याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mazi ladki bahin yojana 2024 Live : माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी महिलांची सातऱ्यात झुंबड

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केल्यानंतर सातारा शहरातील तलाठी कार्यालयामध्ये अक्षरच्या महिलांची झुंबड उडाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला भर पावसामध्ये तलाठी कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत. यामुळे येथील कामकाजावर मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकूणच झालेली प्रचंड गर्दी आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ पाहता महिलांनी या योजनेला मुदतवाढ मिळावी अशा प्रकारची मागणी महिला करत आहेत.

Uttar Pradesh Live : उत्तर प्रदेशात धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी; २७ जणांचा मृत्यू

एटा, उत्तर प्रदेश: हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला आहे. सीएमओ एटा, उमेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितलं की , "आतापर्यंत 27 मृतदेह पोस्टमार्टम हाऊसमध्ये आले आहेत, ज्यात 25 महिला आणि 2 पुरुष आहेत. अनेक जखमींनाही दाखल करण्यात आले आहे. तपासानंतर अधिक तपशील समोर येईल. प्राथमिक कारण म्हणजे एक धार्मिक कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी सांगितले जात आहे. ."

Eknath Shinde Live : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काम सुरू आहे - मुख्यमंत्री

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी काम सुरु आहे. आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. त्यासाठी कमिटी केली आहे. पाठपुरावा सुरू आहे. मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय लवकर घेऊ, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना केले.

Eknath Shinde Live : जे काम तुम्हाला जमलं नाही ते आम्ही पटापट केलं - मुख्यमंत्री

मोदींनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल. तसेच, जे काम तुम्हाला जमलं नाही ते आम्ही पटापट केलं असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केले.

Milind Narvekar Live : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर ह्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच महाविकास आघाडीचे इतर नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Zika Virus Update Live : पुण्यात आढळला झिकाचा सातवा रुग्ण, PMC कडून काळजी घेण्याचं आवाहन

पुण्यात झिकाचा सातवा रुग्ण आढळला आहे. पुण्यातील डहाणूकर कॉलनीत 45 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. घरामध्ये 5-6 दिवस पाणी साठवून न ठेवण्याचे आरोग्य विभागाचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray Live : निलंबनाचा एकतर्फी निर्णय लोकशाहीसाठी घातक - उद्धव ठाकरे

आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडाव्यात म्हणून निलंबन. मित्रपक्ष आणि मविआचे उमेदवार निवडून आणू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

Shrikant Shinde Live : राहुल गांधींनी सगळ्या हिंदू समाजाचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे - डॉ. श्रीकांत शिंदे

राहुल गांधी यांनी सगळ्या हिंदू समाजाचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे विधान शिवसेना खासदार डॉ. श्रीकांता शिंदे यांनी केले आहे.

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी गरज असेल तर वेळ नक्कीच वाढवून दिला जाईल -  डॉ. श्रीकांत शिंदे

राज्यातील महिलांसाठी असणाऱ्या लाडकी बहिण योजनेसाठी गरज असेल तर वेळ नक्कीच वाढवून दिला जाईल, अशी माहिती शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी दिली आहे.

Raju Shetti : 40 रुपये दर द्या, अन्यथा मुंबईला जाणारा दूध पुरवठा रोखू... राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा

दुधाला किमान 40 रुपये दर देण्याचा निर्णय घ्या. सोमवार नंतर स्वस्थ बसणार नाही. अन्यथा मुंबईला जाणार दूध पुरवठा रोखू. असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारचं नाक दाबल्याशिवय तोंड उघडत नाही असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Ambadas Danve Suspended live : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ५ दिवसांसाठी निलंबित

आमदार प्रसाद लाड यांना सबागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

NCP Ajit Pawar: राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उद्या परळी बंदची हाक

आमदार रोहित पवार यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीतील बापू आंधळे खून प्रकरणात आमदार रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा, अजित पवार गटाने आता निषेध व्यक्त केला आहे. 29 जून रोजी परळी शहरात सबंध बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना घडली. धनंजय मुंडे समर्थक व मरळवडीचे सरपंच असलेले बापूराव आंधळे यांची डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच आणखी एक तरुण गोळीबारात जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून ते तपास करत आहेत.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना स्वतःची व आपल्या पक्षाची कातडी वाचवायची इतकी घाई झाली आहे की, ते मयत बापू आंधळे व त्याच्या कुटुंबाविषयी सहनुभीती दाखवायचे सोडाच, उलट या निर्घृण हत्येतील आरोपीची पाठराखण करत आहेत. धनंजय मुंडे यांची व परळीची बदनामी करत सुटले आहेत. त्यांचे हे वर्तन अत्यंत असंवेदनशील व निषेधार्ह आहे. असं प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं असून उद्या परळी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

Bhushi Dam Live: भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, परिसरातील टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

भुशी डॅम परिसरातील धबधब्यावर एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमजवळील अनधिकृत टपऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. भुशी डॅप दुर्घटनेनंतर लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

MLC Election Live: विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून गरजे, विटेकरांचे अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राजेश विटेकर आणि पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गरजे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री अनिल पाटील उपस्थित होते.

Jitendra Awhad Live: "मी पहिल्यांदाच भाजपसमोर एक आक्रमक विरोधी पक्षनेता उभारलेला पाहतोय"

"मी पहिल्यांदाच भाजपसमोर एक आक्रमक विरोधी पक्षनेता उभारलेला पाहतोय. भाजप म्हणजे हिंदू नाही, आम्हा हिंदूंना त्यांचे हिंदुत्व मान्य नाही," अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी यांच्या लोकसभेतील भाषणावर दिली.

Kalammawadi Dam Live: काळम्मावाडी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू

काळम्मावाडी धरणातील दूधगंगा नदीपात्रात काल निपाणी शहरातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यातील एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, दुसरा अजूनही बेपत्ता आहे. त्यासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

Alaknanda River Live: अलकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, भाविकांना प्रशासनाचे आवाहन

उत्तराखंडमधील बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, प्रशासनाने भाविकांसह पर्यटकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Kolhapur News Live: कोल्हापुरात रिक्षाचालकांचे जेल भरो आंदोलन; विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी

रिक्षा चालक आणि वाहक यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर चौक इथं रिक्षा चालकांच्या वतीने जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रिक्षा पासिंगचा 50 रुपयांचा विलंब आकार रद्द करावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात जेलभरो आंदोलन करण्यात आलं.

Vijay Wadettiwar Live: राहुल गांधी हिंदू धर्माबाबत काहीही वाईट बोलले नाहीत- विजय वडेट्टीवार

राहुल गांधी यांनी हिंदू धर्माबाबत काही वाईट बोललं नाही. उलट, संभाजी भिडे हे राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपने निषेध करायला हवा, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Maharashtra Assembly Session Live: राहुल गांधी, अंबादास दानवेंविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी

राहुल गांधी आणि अंबादास दानवेंविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली जात आहे. माफी मांगो अशी मागणी महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केली होती.

Corp Insurance Live: पिक विम्यासाठी मासेगावात उपोषण ग्रामस्थांकडून विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी

मासेगाव ता घनसावंगी येथील तळ्यातील मारुती या देवस्थानात ग्रामस्थांनी पीक विम्यांची रक्कम मिळेना या मागणीसाठी दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. सन 2018 चा पिक विमा तत्काळ मिळावा, 2017 पासून शेतकऱ्यांच्या पिक विमा तक्रारीचे निवारण करणे, शेतकरी सन्मान निधीतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ दुरुस्त करणे , पिक विमा योजना माहीतीआधीकारात समावेश करणे, 2023 च्या पैसेवारीनुसार पिक विमा मिळण्यात यावा आदी मागण्याकरीता उपोषण सुरु आहे

Pankaja Munde Live: पंकजा मुंडे यांचं सुरेश धस यांच्याकडून स्वागत

पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. वरळीतील त्यांच्या कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. सुरेश धस यांनी त्यांचे स्वागत केले.

Thane-Nashik NH Live: ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या जवळपास एक तासापासून ही वाहतूक कोंडी आहे. पावसामुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

Nashik Rain Live : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरु, धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. आज सकाळीही पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावलीये. जोरदार पावसाने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

Dombivli News Live : 'नो क्लोजर ओन्ली बुलडोझर'; मुख्यमंत्र्यांचे डोंबिवलीत बॅनर

अनधिकृत बार, पब, ढाबे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यानंतर डोंबिवलीमध्ये देखील अनधिकृत बार ढाबे याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. डोंबिवलीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचे स्वागत करत कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांचे नो क्लोजर ओन्ली बुलडोझर असे बॅनर शहर प्रमुख राजेश मोरे यांच्याकडून लावण्यात आले आहे.

Barbados Cyclone Live : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अजूनही उत्तर अमेरिकेतच; बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे कर्फ्यू लागू

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अजूनही उत्तर अमेरिकेतच आहे. उत्तर अमेरिकेतल्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे कर्फ्यू लागू आहे. वीज आणि पाण्याची मोठी समस्या असून भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच आहे. माध्यमांचे प्रतिनिधी आणि भारतीय संघ अडकून पडला. कर्फ्यू लावल्याने सगळ्या विमानांची उड्डाण रद्द केली आहेत.

Buldhana News Live : शेतकरी आई-वडिलांनी नवरी मुलगीची घोड्यावर बसवून काढली गावभर मिरवणूक

लग्न म्हटलं की, डीजेच्या तालावर वाजतगाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते.. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. वरातीच्या वेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर, रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात. जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा ठेका घेतलाय. ही मक्तेदारी मोडीत काढत शेतकरी कुटुंबाने आपल्या नवरी मुलीची चक्क मिरवणूक घोड्यावर काढल्याचे हातनी येथे पहावयास मिळाले. बुलडाणा जिल्ह्यातील हातनी येथील शेतकरी संजय जाधव यांनी आपली मुलगी नववधू निकिता हिची गावातून घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली.

Hippargi Dam Live : 'हिप्परगी'चे सर्व दरवाजे खुले

सांगली-कोल्हापूर : कालपर्यंत हिप्परगी बॅरेजचे २२ पैकी १६ दरवाजे बंद केले होते. याबाबत सांगली कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने जलसंपदा विभागाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परिणाम म्हणून हिप्परगी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे खुले करण्यात आले.

Radhanagari Dam Live : राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे, तर इतर तालुक्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणातील ८.३६ टीएमसीपैकी २.५८ टीएमसी धरण भरले असून, धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे, तर शिंगणापूरसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Chakan Crime Live : खालुंब्रेत सराईत गुंड गणेश तुळवेचा खून

चाकण : चाकण-तळेगाव मार्गावर खालुंब्रे (ता. खेड) गावच्या हद्दीत एचपी चौकापासून काही अंतरावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून चाललेल्या गणेश अनिल तुळवे (वय 31, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) या तरुणावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार केले. डोक्यात दोन वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भावकीतील संशयित आरोपी व त्याचा एक साथीदार असे दोघे फरारी आहेत. इथे क्लिक करा

Bhimashankar Sanctuary Live : भिमाशंकर अभयारण्यात पर्यटनाला बंदी; लोणावळ्यातील घटनेनंतर प्रशासन सतर्क

भिमाशंकर देवदर्शनानंतर भाविक वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जात असतात. अभयारण्यातील अंतर्गत निसरडे, रस्त्यांचा धोका लक्षात घेऊन पर्यटकांचे अपघात रोखण्यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत भिमाशंकर अभारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांसाठी धोकादायक ठिकाणांवर बंदी असताना प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे भिमाशंकर अभारण्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेय.

पर्यटन बंदीची ठिकाणे..

  • - कोंढवळ धबधबा

  • - चोंडीचा धबधबा

  • - खोपीवली क्षेत्र,

  • - पदरवाडी न्हाणीचा धबधबा नारीवाली सुभेदार धबधबा,

  • - घोंगळ घाट नाला खांडस ते भिमाशंकर मार्ग

  • - पदरवाडी शिडी घाट ते काठेवाडी इथे क्लिक करा

Nashik Teachers Constituency Live : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा, किशार दराडेंचा दणदणीत विजय

विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे, महायुतीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवरा विवेक कोल्हे यांच्यात जोरदार लढत पहायला मिळाली पण अखेर दराडे यांनी विजय मिळवला. इथे क्लिक करा

Maratha Reservation Live Update : मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला संसदेत उत्तर देणार आहेत. तसेच मराठा आरक्षणविरोधी याचिकांवर आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. या शिवाय, युपीएससीच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलीये. नर्मदा बचाओ आंदोलनातील कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहानीच्या प्रकरणात पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.