Latest Marathi Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

यूजीसी-नेट परीक्षेच्या विश्‍वासार्हतेबाबत तडजोड झाल्याची माहिती मिळाल्याने शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal
Updated on

गुजरातमधील बोगस बियाणांची राज्यात सर्रास विक्री, अंबादास दानवेंचा आरोप

राज्यातील खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी गुजरातमधील बोगस बियाणांची महाराष्ट्रात सर्रास विक्री केली जात आहे. यासाठी राज्याच्या कृषी विभागातील अधिकारी आणि खासगी कंपन्यांचे मोठे लागेबांधे असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी (ता.२०) पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला.

Amit Thackeray: अमित ठाकरे लागले विधानसभेच्या तयारीला

अमित ठाकरेंनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे.त्यांची पहिली बैठक वरळीत झाली आता ते सगळीकडे बैठक घेणार आहेत.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या

मेट्रो २ अ किंवा ७ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा मेट्रो प्रवासाकडे कल वाढला आहे. त्याची दखल घेत एमएमआरडीएने सदर मेट्रो मार्गावर आजपासून २४ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दररोज २८२ मेट्रो फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

Railway : मुंबई - गोरखपुर दरम्यान १२ विशेष ट्रेन सेवा

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते गोरखपुर दरम्यान १२ विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गोरखपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरी वीरा देसाई रोड येथील कार्यालयात चोरी झाली आहे. अकाउंट डिपार्टमेंटमधील पूर्ण सेल्फ चोरांनी फस्त केला आहे. चित्रपटाचे निगेटिव्ह देखील चोरीला गेले आहेत.

कोल्हापुरात एसटी चालकाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण

कोल्हापुरात एसटी चालकाला लोखंडी रॉडनं बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. कारला एसटी घासल्यानं कार चालकानं हा प्रकार केला.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओबीसी आंदोलकांनी रोखला

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्यांविरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या आंदोलकांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

Pune Live : पुण्यात विविध भागात पावसाला सुरुवात

पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

Kolhapur Live : आंबोली घाटात पर्यटकांमध्ये हाणामारी

कोल्हापूरमधून कोकणात जाणाऱ्या आंबोली घाटात पर्यटकांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. काहीतरी किरकोळ कारणावरुन या प्रवाशांमध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यावसन पुढे हाणामारीत झालं.

Pune Live : शरद पवारांनी उद्या पुण्यात बोलावली नवनिर्वाचित खासदारांची बैठक

नवनिर्वाचित खासदारांची शरद पवारांनी उद्या पुण्यात बैठक बोलावली आहे. खासदारांच्या अभिनंदनासाठी ही बैठक बोलावल्याचं सांगितलं जात आहे.

Rahul Gandhi On NEET LIVE: NEET परीक्षेतील अनियमिततेवर राहुल गांधींची PM मोदींवर टीका

NEET आणि UGC-NET चा पेपर लीक झाला आहे. नरेंद्र मोदींनी युक्रेनमधील युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. इस्रायल आणि गाझा यांच्यातील युद्धही नरेंद्र मोदींनी थांबवले होते. पण काही कारणाने नरेंद्र मोदी भारतात पेपर लीक होण्याचे प्रकार थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केली.

UGC-NET Live: नेट परीक्षेतील गैरप्रकाराची सीबीआयद्वारे होणार चौकशी

शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जैस्वाल म्हणाले, "NTA ने 18 जून रोजी घेतलेल्या UGC-NET परीक्षेला 9 लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचे मंत्रालयाने प्रथमदर्शनी पाहिले. मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.''

Vijay Vadettiwar Live: विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाकेंच्या भेटीला

विजय वडेट्टीवार ओबीसी आरक्षणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले आहेत.

Amol Mitkari Live: अजितदादा लवकर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली ; मिटकरींचा रामदास कदमांवर पलटवार

रामदास कदमजी आपण जोरात बोललात, "मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं". माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं. दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असे अमोल मिटकरी म्हणाले.

NET-UGC परीक्षा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जूनला घेतलेल्या NET-UGC परिक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच, ती परीक्षा काल तातडीने रद्द केली. जो घोळ NEET च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची 'कातडी बचाव' हालचाल केंद्राने केली. पण त्याने ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसानच झालं. ९ लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि ह्या परिक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला. मनस्ताप झाला तो वेगळाच. आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.

आंदोलकांनी नांदेड-लातूर महामार्ग रोखला

होकेच्या सर्थनाला ओबेसी समाज बांधव रस्त्यावर आले आहे.

Telangana Live News : सिकंदराबादमध्ये रेल निलयमजवळील स्पेअर पॅन्ट्री कोच आणि एसी कोचला आग

तेलंगणा: सिकंदराबादमधील रेल निलयमजवळील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ ठेवलेला स्पेअर पॅन्ट्री कोच आणि एसी कोचला आग लागली. अग्निशमन दलाच्या बंबांनी लगेच आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद नाही.

डी मोहन राव, स्टेशन फायर ऑफिसर, सिकंदराबाद म्हणाले, "आम्हाला सकाळी 10.50 च्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून आग लागल्याचा कॉल आला. आम्ही तात्काळ येथे धाव घेतली आणि आग विझवली. एक पॅन्ट्री कोच आणि एक एसी कोच जो सुटे होता आणि येथे ट्रॅकवर ठेवण्यात आला होता. आग लागल्याची कोणतीही इजा किंवा जीवितहानी झाली नाही... 5 अग्निशमन गाड्या येथे आल्या..."

Amol Mitkari On Ramdas Kadam Live : अजित पवार आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली; अमोल मिटकरींचा कदमांवर निशाणा

अजित पवार आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाच्या रामदास कदमांवर केली आहे. रामदास कदम यांंनी काल अजित पवारांबाबत भाष्य केलं होतं.

Kalyan Rain Live: कल्याणमधील पिसवली गावात मुसळधार पाऊस, घरांमध्ये पाणी

कल्याणमधील पिसवली गावामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यावेळी २०० ते २५० घरांमध्ये पाणी शिरलं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरात पाणी शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Mumbai bhiwandi Rain Live: भिवंडीमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं, पावसाचा जोर कायम

भिवंडीमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. नाल्यांचे काम व्यवस्थित केले नसल्यामुळे ही वेळ आल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. तूर्तास पावसाचा जोर कायम आहे.

Ajit Pawar Live: शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालण्याचे बळ मिळू दे- अजित पवार

महाराजांना मी अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर चालण्याचे बळ मिळू दे अशी प्रार्थना देवीकडे करतो. मुघलाचे राज्य असो वा अन्य कोणाचे पण शिवाजी महाराज यांचे राज्य कधीच भोसले यांच्या नावाने नाही ओळखले गेले. रयतेचा राजा म्हणून ओळख होती, कधी रयते विरुद्ध त्यांनी राज्य नाही केलं असं अजित पवार म्हणाले.

Mumbai Kalyan Rain Update Live: कल्याण येथील दुर्गाडी भागात साचले पाणी

दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामिण भागात सकाळ पासून पावसाने जोर पकडला आहॆ. तर कल्याणच्या दुर्गाडी परिसरात पाणी साचले आहे. कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिर परिसरात सुद्धा पाणी साचले आहे.

Mumbai Rain Live:  मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला, प्रवाशांना मनस्ताप

अप अँड डाऊन बर जाणाऱ्या धीम्या गतीने धावणाऱ्या सर्व लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिरा आहेत. कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जाणाऱ्या जलद ट्रेन वीस मिनिट उशिरा धावत असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. पावसामुळे सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वे उशिराने धावत असून डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी केली आहे...

Nagpur Live: नागपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

मॉर्निंगवाकला जात असताना नागपुरातील 72 वर्षीय रजनी पनपालिया यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. पहाटे सहा वाजताच्या सुमारास हॉटेल प्राइडजवळ त्यांच्यावर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.

NCP: विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी मुस्लिम, दलित चेहरा देण्याची शक्यता

विधान परिषदेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम आणि दलित चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम, दलित मतदारांचा‌ बसलेला फटका लक्षात घेता हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Karnataka Government : 'पंचहमी' योजना सुरूच राहणार : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळूर : काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या ‘पंचहमी’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण वचनबद्ध आहोत. योजनांसाठी दरवर्षी ६० हजार कोटींची तरतूद केली आहे. यासाठी ‘पंचहमी’ योजना सुरूच राहणार आहेत, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय जम्मू आणि कश्मीर दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय जम्मू आणि कुश्मीर दौऱ्यावर आहेत. २१ जून (उद्या) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर इथं 'एम्पावरिंग यूथ, ट्रांसफॉर्मिंग जम्मू आणि कश्मीर' कार्यक्रमात भाग घेणार आहेत. त्याचबरोबर मोदी 1 हजार 500 कोटी रूपयांच्या कामाचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.

UGC NET : यूजीसी नेट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप

यूजीसी नेट रद्द झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची मागणी केलीये. सायबर गुन्ह्याच्या शक्यतेमुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यूजीसी नेट परीक्षा रद्द केली. विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षेची मागणी त्यांनी केली आहे. देशातील ३१७ शहरात ११ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी यूजीसी नेट ची परीक्षा दिली होती.

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाराऱ्याच्या गाडीवर हल्ला

नाशिकमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला झाला आहे. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असलेल्या गाडीवर केला हल्ला. मोठ्या दगडाने गाडीची काच फोडली. बाळा कोकणे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष आहेत. दोन वर्षांपूर्वी देखील कोकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता.

Central Government : वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराला ‘मोदी पर्व-३’च्या पहिल्याच मंत्रिमंडळबैठकीत मंजुरी देऊन महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास ७६ हजार २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होईल. यातून १२ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

Naveen Patnaik : 24 वर्षे ओडिशाचे मुख्यमंत्रिपद सांभाळलेले बीजेडीचे नेते पटनाईक बनणार विरोधी पक्षनेते

भुवनेश्‍वर : मागील २४ वर्षे ओडिशाचे मुख्यमंत्रिपद सांभाळलेले बीजेडीचे नेते नवीन पटनाईक आता राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावणार आहेत. पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ओडिशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बीजेडीचा पराभव करत सत्ता स्थापन केली आहे.

Tamil Nadu News : विषारी दारू प्यायल्यामुळे 25 जणांचा मृत्यू, 60 जण रुग्णालयात दाखल

तामिळनाडूच्या कल्लाकुरुची जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडलीये. विषारी दारू प्यायल्यामुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६० जणांना रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इथे क्लिक करा

Weather Update : जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज

पुणे : मॉन्सूनची वाटचाल थांबल्याने पावसातही खंड पडला आहे. मॉन्सूनची प्रगती होऊन पाऊस सक्रिय होण्यासाठी काहीशी वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी (९२ टक्क्यांपेक्षा कमी) पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. मात्र उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम असल्याने जूनअखेरीस चांगल्या पावसाची आशा आहे.

Arunachal Pradesh Flood : अरुणाचल प्रदेशात पावसानंतर पूरस्थिती; इटानगरमध्ये काही ठिकाणी कोसळल्या दरडी

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अविरत पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. इटानगरमध्येही काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. इटानगर-युपिया मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. राज्यात आगामी काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Adv. Prakash Ambedkar : 'वंचित'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची भेट घेण्याची शक्यता

Latest Marathi Live Updates : 'वंचित'चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर, रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या शिवाय, राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) घेतलेल्या यूजीसी-नेट परीक्षेच्या विश्‍वासार्हतेबाबत तडजोड झाल्याची माहिती मिळाल्याने शिक्षण मंत्रालयाने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुणाचल प्रदेशातील काही भागांमध्ये मागील काही दिवसांपासून अविरत पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर-गोवा या तब्बल ४९८ किलोमीटर लांबीच्या ‘शक्तिपीठ एक्स्प्रेस-वे’चे काम लटकणार असल्याचे समोर आले आहे. राज्यात सध्या ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.